25 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (25 FEBRUARY)
25 फेब्रुवारी 1510: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
25 फेब्रुवारी 1818: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
25 फेब्रुवारी 1935: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
25 फेब्रुवारी 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
25 फेब्रुवारी 1945: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
25 फेब्रुवारी 1968: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
25 फेब्रुवारी 1986: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
25 फेब्रुवारी 1996: स्वर्गदारा तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.
जन्म (25 FEBRUARY)
25 फेब्रुवारी 1940: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)
25 फेब्रुवारी 1894: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
25 फेब्रुवारी 1938: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
25 फेब्रुवारी 1943: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
25 फेब्रुवारी 1948: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.
25 फेब्रुवारी 1974: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)
मृत्यू (25 FEBRUARY)
25 फेब्रुवारी 1599: संत एकनाथ यांचे निधन.
25 फेब्रुवारी 1924: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.
25 फेब्रुवारी 1964: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.
25 फेब्रुवारी 1978: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)
25 फेब्रुवारी 1980: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.
25 फेब्रुवारी 1999: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)
25 फेब्रुवारी 2001: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
25 फेब्रुवारी 2016: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987