MahaNMK > Dinvishesh > 1 FEBRUARY DINVISHESH

1 FEBRUARY DINVISHESH

1 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


1 FEBRUARY DINVISHESH

महत्वाच्या घटना (1 FEBRUARY)

1 फेब्रुवारी 1689: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
1 फेब्रुवारी 1835: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
1 फेब्रुवारी 1884: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
1 फेब्रुवारी 1893: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
1 फेब्रुवारी 1941: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
1 फेब्रुवारी 1946: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
1 फेब्रुवारी 1956: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1 फेब्रुवारी 1964: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1 फेब्रुवारी 1966: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
1 फेब्रुवारी 1979: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
1 फेब्रुवारी 1981: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर
1 फेब्रुवारी 1992: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.
1 फेब्रुवारी 2003: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
1 फेब्रुवारी 2004: मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
1 फेब्रुवारी 2013: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.

जन्म (1 FEBRUARY)

1 फेब्रुवारी 1864: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
1 फेब्रुवारी 1884: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
1 फेब्रुवारी 1901: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
1 फेब्रुवारी 1912: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
1 फेब्रुवारी 1917: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
1 फेब्रुवारी 1927: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)
1 फेब्रुवारी 1929: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
1 फेब्रुवारी 1931: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
1 फेब्रुवारी 1960: अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म.
1 फेब्रुवारी 1971: क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.
1 फेब्रुवारी 1982: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.

मृत्यू (1 FEBRUARY)

1 फेब्रुवारी 1976: क्‍वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
1 फेब्रुवारी 1981: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)
1 फेब्रुवारी 1995: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन. (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
1 फेब्रुवारी 2003: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९६१)
1 फेब्रुवारी 2012: संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन.

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

1 FEBRUARY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728
1 FEBRUARY DINVISHESH

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

दिनांक : 9 फेब्रुवारी 1951

पुणे विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 10 फेब्रुवारी 1948

डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

दिनांक : 28 फेब्रुवारी 1928

संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

दिनांक : 12 फेब्रुवारी 1824

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

दिनांक : 19 फेब्रुवारी 1630

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

दिनांक : 16 फेब्रुवारी 1944

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

दिनांक : 26 फेब्रुवारी 1966

विश्व कर्करोग दिन

दिनांक : 4 फेब्रुवारी 2000

नीती आयोगाची पहिली बैठक

दिनांक : 8 फेब्रुवारी 2015

मराठी राजभाषा दिन

दिनांक : 27 फेब्रुवारी 1987

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.