21 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (21 FEBRUARY)
21 फेब्रुवारी 1842: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
21 फेब्रुवारी 1848: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
21 फेब्रुवारी 1878: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
21 फेब्रुवारी 1915: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
21 फेब्रुवारी 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
21 फेब्रुवारी 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
21 फेब्रुवारी 1975: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
21 फेब्रुवारी 2013: हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.
जन्म (21 FEBRUARY)
21 फेब्रुवारी 1875: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)
21 फेब्रुवारी 1894: वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९५५)
21 फेब्रुवारी 1896: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१)
21 फेब्रुवारी 1911: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९९७)
21 फेब्रुवारी 1942: अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८)
21 फेब्रुवारी 1943: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
21 फेब्रुवारी 1970: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.
मृत्यू (21 FEBRUARY)
21 फेब्रुवारी 1829: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)
21 फेब्रुवारी 1965: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
21 फेब्रुवारी 1975: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
21 फेब्रुवारी 1977: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९०३)
21 फेब्रुवारी 1991: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९३६)
21 फेब्रुवारी 1998: चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९१९)
21 फेब्रुवारी 2011: अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.दिनांक : 9 फेब्रुवारी 1951
पुणे विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 10 फेब्रुवारी 1948
डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.दिनांक : 28 फेब्रुवारी 1928
संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)दिनांक : 12 फेब्रुवारी 1824
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)दिनांक : 19 फेब्रुवारी 1630
भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)दिनांक : 16 फेब्रुवारी 1944
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)दिनांक : 26 फेब्रुवारी 1966
विश्व कर्करोग दिनदिनांक : 4 फेब्रुवारी 2000
नीती आयोगाची पहिली बैठकदिनांक : 8 फेब्रुवारी 2015
मराठी राजभाषा दिनदिनांक : 27 फेब्रुवारी 1987