18 April Dinvishesh

18 April Dinvishesh (१८ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 18 April 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१८ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
१८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.
१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
१९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.
१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.
१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.
१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.

१८ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)
१८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड)
१९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)
१९५८: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)
१९६२: हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.
१९९१: डॉ. वृषाली करी यांचा जन्म.

१८ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.
१८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा. (जन्म: २४ जून १८६९)
१९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८४९)
१९५५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन.
१९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ – डभई, गुजराथ)
१९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)
१९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.
१९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)
२००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.
२००२: नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.