२० मे दिनविशेष


20 May Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

२० मे महत्वाच्या घटना

५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.

१४९८: पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.

१५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.

१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.

१८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले

१९०२: क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.

१९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.

१९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.

२०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

२००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

२० मे जन्म

१८१८: अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १८८१)

१८५०: केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १८८२)

१८५१: ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९२९)

१८६०: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१७)

१८८४: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९२२)

१९००: छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर १९७७)

१९१३: हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००१)

१९१५: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९८१)

१९४४: रेड बुल चे सहसंस्थापक डीट्रिख मत्थेकित्झ यांचा जन्म.

१९५२: कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म.

२० मे मृत्यू

१५०६: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन.

१५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.

१७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १६९३)

१८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.

१९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)

१९६१: कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.

१९९२: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)

१९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०९)

१९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.

२०१२: भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९२३)

२०१२: रिमोट कंट्रोल चे शोधक यूजीन पॉली यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)

मे महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
दिनांक : १ मे १९६०
NMK
थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९१५)
दिनांक : ९ मे १८६६
NMK
समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
दिनांक : २२ मे १७७२
NMK
क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
दिनांक : २८ मे १८८३
NMK
देवेंद्रनाथ टागोर ह्याचा जन्मदिवस
दिनांक : ८ मे १८१७
NMK
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
दिनांक : ११ मे १९९८