5 June Dinvishesh

5 June Dinvishesh (५ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 5 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

५ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
१९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९७७: सेशेल्समधे उठाव झाला.
१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
१९७४: जागतिक पर्यावरण दिन
२०२२: राफेल नदाल यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले
२०२२: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.
२०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.
२००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.
२००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) - अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान झाले.
१९९७: काँगो - देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.
१९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट - पहिल्यांदा तयार केले गेले.
१९८४: ऑपरेशन ब्लू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.
१९८१: पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले.
१९६७: इस्रायलच्या सीमेवर इजिप्शियन सैन्याच्या जमावाला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इजिप्शियन हवाई क्षेत्रांवर अचानक हल्ले केले.
१९४९: ओरापिन चैयाकन यांची थायलंड देशामध्ये संसदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड झाली.
१९४७: शीतयुद्ध - मार्शल योजना: अमेरिकेच्या राज्य सचिवांनी युद्धग्रस्त युरोपला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
१९४५: मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council) - औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.
१९४४: दुसरे महायुद्ध - डी-डे: १ हजार हून अधिक ब्रिटीश बॉम्बर्सनी नॉर्मंडी किनाऱ्यावर जर्मन तोफांच्या बॅटरीवर ५ हजार टन बॉम्ब टाकले.
१९४३: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने बल्गेरिया, हंगेरी आणि रोमानियावर युद्ध घोषित केले.
१९४१: दुसरे महायुद्ध - चोंगकिंग बॉम्बस्फोट: या बॉम्बहल्ल्यामुळे ४ हजार चोंगकिंग रहिवासी गुदमरले.
१९४०: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन फॉल रॉट ("केस रेड"): सुरु.
१९१६: लुई ब्रँडीस - यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत.
१९१६: पहिले महायुद्ध - ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध अरब उठाव सुरू झाला.

५ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडॅम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)
१८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९५५)
१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)
१८८३: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
१९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.
१९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म.
१९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.
१९६१: भारतीय लेखक आणि राजकारणी, ओडिशाचे आमदार बिष्णू सेठी यांचा जन्म (मृत्यू : १९ सप्टेंबर २०२२)
१९१५: इंग्लिश बॅरिस्टर आणि बायोकेमिस्ट, मेन्सा कंपनीचे सह-संस्थापक लान्सलॉट वेअर यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट २०००)
१९३५: न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला एलिझाबेथ मॅककॉम्ब्स यांचे निधन (जन्म: १९ नोव्हेंबर १८७३)

५ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर २०११)
१९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३)
१९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.
२००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.