14 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (14 JULY)
14 जुलै 1789: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
14 जुलै 1867: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
14 जुलै 1958: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
14 जुलै 1960: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
14 जुलै 1969: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
14 जुलै 1976: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
14 जुलै 2003: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
14 जुलै 2013: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
जन्म (14 JULY)
14 जुलै 1856: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)
14 जुलै 1862: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
14 जुलै 1884: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
14 जुलै 1893: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)
14 जुलै 1910: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
14 जुलै 1917: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
14 जुलै 1920: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
14 जुलै 1947: मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.
14 जुलै 1967: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.
मृत्यू (14 JULY)
14 जुलै 1904: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.
14 जुलै 1936: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
14 जुलै 1963: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
14 जुलै 1975: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)
14 जुलै 1993: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
14 जुलै 1998: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
14 जुलै 2003: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
14 जुलै 2003: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)
14 जुलै 2008: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
मुंबई विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 18 जुलै 1857
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.दिनांक : 26 जुलै 1999
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)दिनांक : 23 जुलै 1856
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)दिनांक : 31 जुलै 1865
वसंतराव नाईक जयंतीदिनांक : 1 जुलै 1913
FRBM कायदा २००३ अमलात.दिनांक : 5 जुलै 2004
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.दिनांक : 5 जुलै 2017
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.दिनांक : 7 जुलै 1854
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.दिनांक : 10 जुलै 1800
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.दिनांक : 11 जुलै 1989
जागतिक युवा कौशल्य दिनदिनांक : 15 जुलै 2014
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनदिनांक : 18 जुलै 1969
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.दिनांक : 20 जुलै 1924
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.दिनांक : 22 जुलै 1947
१४ बँकांचे राष्ट्रीयकरणदिनांक : 19 जुलै 1969
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.दिनांक : 26 जुलै 1902
कारगिल विजय दिवसदिनांक : 26 जुलै 1999