24 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (24 APRIL)
24 एप्रिल 1674: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
24 एप्रिल 1717: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
24 एप्रिल 1800: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
24 एप्रिल 1967: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
24 एप्रिल 1968: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
24 एप्रिल 1970: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
24 एप्रिल 1990: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
24 एप्रिल 1993: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
24 एप्रिल 2013: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
जन्म (24 APRIL)
24 एप्रिल 1889: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)
24 एप्रिल 1896: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
24 एप्रिल 1910: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
24 एप्रिल 1929: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)
24 एप्रिल 1942: अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.
24 एप्रिल 1970: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
24 एप्रिल 1973: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
24 एप्रिल 1993: ७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
मृत्यू (24 APRIL)
24 एप्रिल 1942: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)
24 एप्रिल 1960: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
24 एप्रिल 1972: चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)
24 एप्रिल 1974: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
24 एप्रिल 1994: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)
24 एप्रिल 1999: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
24 एप्रिल 2011: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
24 एप्रिल 2014: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.दिनांक : 1 एप्रिल 1935
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.दिनांक : 2 एप्रिल 1870
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.दिनांक : 6 एप्रिल 1930
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.दिनांक : 7 एप्रिल 1948
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.दिनांक : 13 एप्रिल 1919
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.दिनांक : 16 एप्रिल 1853
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.दिनांक : 17 एप्रिल 1952
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.दिनांक : 18 एप्रिल 1950
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.दिनांक : 19 एप्रिल 1975
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.दिनांक : 22 एप्रिल 1970
होम रुल लीगची स्थापना झाली.दिनांक : 28 एप्रिल 1916
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)दिनांक : 9 एप्रिल 1828
: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)दिनांक : 11 एप्रिल 1827
समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)दिनांक : 23 एप्रिल 1858
मंगल पांडे ह्यांना फाशी झालीदिनांक : 8 एप्रिल 1857
गांधी चंपारण्याला आगमनदिनांक : 10 एप्रिल 1917
७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षणदिनांक : 24 एप्रिल 1993
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008
जागतिक मलेरिया दिनदिनांक : 25 एप्रिल 2008