५ सप्टेंबर दिनविशेष


5 September Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

५ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

५ सप्टेंबर जन्म

११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)

१६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

१८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

१८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

१९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)

१९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

१९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

१९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

१९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

५ सप्टेंबर मृत्यू

१८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

१९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

१८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

१९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

१९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

१९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

१९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)

सप्टेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
NMK
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
NMK
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
NMK
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
NMK
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
NMK
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
NMK
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
NMK
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
NMK
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
NMK
NCERT स्थापना
NMK
जागतिक पर्यटन दिन