MahaNMK > Dinvishesh > 11 SEPTEMBER DINVISHESH

11 SEPTEMBER DINVISHESH

11 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


11 SEPTEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (11 SEPTEMBER)

11 सप्टेंबर 1297: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
11 सप्टेंबर 1773: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
11 सप्टेंबर 1792: होप हिरा चोरला गेला.
11 सप्टेंबर 1893: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
11 सप्टेंबर 1906: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
11 सप्टेंबर 1919: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
11 सप्टेंबर 1941: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
11 सप्टेंबर 1942: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
11 सप्टेंबर 1944: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
11 सप्टेंबर 1961: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
11 सप्टेंबर 1965: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
11 सप्टेंबर 1972: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
11 सप्टेंबर 1997: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
11 सप्टेंबर 2001: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
11 सप्टेंबर 2007: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

जन्म (11 SEPTEMBER)

11 सप्टेंबर 1816: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.
11 सप्टेंबर 1862: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.
11 सप्टेंबर 1884: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)
11 सप्टेंबर 1885: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)
11 सप्टेंबर 1895: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)
11 सप्टेंबर 1901: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)
11 सप्टेंबर 1911: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)
11 सप्टेंबर 1915: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)
11 सप्टेंबर 1917: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
11 सप्टेंबर 1939: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.
11 सप्टेंबर 1976: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.
11 सप्टेंबर 1982: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

मृत्यू (11 SEPTEMBER)

11 सप्टेंबर 1888: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.
11 सप्टेंबर 1921: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
11 सप्टेंबर 1948: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
11 सप्टेंबर 1964: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
11 सप्टेंबर 1971: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)
11 सप्टेंबर 1973: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.
11 सप्टेंबर 1973: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.
11 सप्टेंबर 1978: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.
11 सप्टेंबर 1987: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)
11 सप्टेंबर 1993: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.
11 सप्टेंबर 1998: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)
11 सप्टेंबर 2011: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

11 SEPTEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930
11 SEPTEMBER DINVISHESH

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

दिनांक : 2 सप्टेंबर 1946

हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

दिनांक : 14 सप्टेंबर 1949

प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

दिनांक : 15 सप्टेंबर 1959

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

दिनांक : 24 सप्टेंबर 1873

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

दिनांक : 4 सप्टेंबर 1825

भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

दिनांक : 5 सप्टेंबर 1888

आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

दिनांक : 7 सप्टेंबर 1791

भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

दिनांक : 15 सप्टेंबर 1861

विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

दिनांक : 16 सप्टेंबर 1916

NCERT स्थापना

दिनांक : 1 सप्टेंबर 1961

जागतिक पर्यटन दिन

दिनांक : 27 सप्टेंबर 1980

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.