७ सप्टेंबर दिनविशेष


7 September Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

७ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

१८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.

७ सप्टेंबर जन्म

१७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

१८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)

१८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)

१८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)

१९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)

१९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

१९२५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

१९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.

१९३४: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)

१९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)

१९४०: लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.

१९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.

७ सप्टेंबर मृत्यू

१६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.

१८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.

१९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

१९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)

१९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)

१९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)

१९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)

सप्टेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
NMK
हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
NMK
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
NMK
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
NMK
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
NMK
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
NMK
आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
NMK
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)
NMK
विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
NMK
NCERT स्थापना
NMK
जागतिक पर्यटन दिन