4 September Dinvishesh

4 September Dinvishesh (४ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 4 September 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

४ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
१८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
१९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
२००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
२०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

४ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)
१८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)
१९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)
१९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २००३)
१९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)
१९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)
१९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.
१९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.
१९५२: अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म.
१९६२: यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म.
१९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५)
१९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.

४ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
२०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)
२०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)
२०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)
२०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.