3 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.

महत्वाच्या घटना (3 NOVEMBER)
3 नोव्हेंबर 1817: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
3 नोव्हेंबर 1838: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.
3 नोव्हेंबर 1903: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
3 नोव्हेंबर 1911: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
3 नोव्हेंबर 1913: अमेरिकेत आय कर सुरू झाला.
3 नोव्हेंबर 1918: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
3 नोव्हेंबर 1944: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
3 नोव्हेंबर 1949: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
3 नोव्हेंबर 1957: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
3 नोव्हेंबर 1988: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
3 नोव्हेंबर 2014: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.
जन्म (3 NOVEMBER)
3 नोव्हेंबर 1688: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
3 नोव्हेंबर 1900: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
3 नोव्हेंबर 1901: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२)
3 नोव्हेंबर 1917: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
3 नोव्हेंबर 1921: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
3 नोव्हेंबर 1925: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
3 नोव्हेंबर 1933: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.
3 नोव्हेंबर 1937: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)
मृत्यू (3 NOVEMBER)
3 नोव्हेंबर 1819: शाहीर अनंत फांदी यांचे निधन.
3 नोव्हेंबर 1890: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)
3 नोव्हेंबर 1975: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५)
3 नोव्हेंबर 1990: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
3 नोव्हेंबर 1992: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
3 नोव्हेंबर 1998: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२०)
3 नोव्हेंबर 1998: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
3 नोव्हेंबर 2000: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.
3 नोव्हेंबर 2012: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)दिनांक : 14 नोव्हेंबर 1889
झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.दिनांक : 15 नोव्हेंबर 2000
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.दिनांक : 16 नोव्हेंबर 1945
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.दिनांक : 18 नोव्हेंबर 1962
उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)दिनांक : 5 नोव्हेंबर 1870
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मितीदिनांक : 1 नोव्हेंबर 1956
डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.दिनांक : 7 नोव्हेंबर 1824
उत्तराखंड राज्याची निर्मिती.दिनांक : 9 नोव्हेंबर 2000
राष्ट्रीय एकत्मता दिन.दिनांक : 19 नोव्हेंबर 2013
इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.दिनांक : 19 नोव्हेंबर 1917
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.दिनांक : 22 नोव्हेंबर 1965
संविधान दिन.दिनांक : 26 नोव्हेंबर 1949