आजचे दिनविशेष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन  आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी २४ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे राज्यघटनेच्या कलम २१-ए मध्ये शिक्षणाचा हक्क (Right To Education - RTE) अंतर्भूत ८६ वी घटनादुरुस्ती २००२ नुसार कलम समाविष्ट ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क उद्दीष्ट्ये शांतता आणि विकासासाठी शिक्षणाची भूमिका साजरी करणे सर्वसमावेशक शिक्षण आणि न्याय्य गुणवत्तेसह सर्वांना आजीवन संधी उपलब्ध करून देणे लैंगिक समानता प्राप्त करणे शिक्षणासह गरिबीचे चक्र मोडण्यात यशस्वी ठरणे थीम 'लोक, ग्रह, समृद्धी आणि शांततेकरिता शिकणे' (Learning for people, planet, prosperity and peace) शिक्षणाचे एकात्मिक स्वरूप आणि सामूहिक विकासाच्या महत्वाकांक्षांच्या दृष्टीने असलेल्या महत्वावर प्रकाश शिक्षण: मानवाधिकार मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणेतील कलम २६ मध्ये शिक्षणाच्या अधिकाराचा उल्लेख विनामूल्य आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणास जाहीरनाम्यात मान्यता
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन

२१ जानेवारी: मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्य स्थापना दिन मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांचा २१ जानेवारी रोजी राज्य स्थापना दिन वेचक मुद्दे २१ जानेवारी १९७२ रोजी तिन्ही राज्यांची स्थापना ईशान्य प्रदेश (पुनर्रचना) अधिनियम, १९७१ नुसार पूर्ण राज्ये   त्रिपुरा बाबत थोडक्यात राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब राजधानी आगरतला मेघालय बाबत थोडक्यात राज्यपाल तथागत रॉय मुख्यमंत्री कॉनराड संगमा राजधानी शिलॉँग मणिपूर बाबत थोडक्यात राज्यपाल नजमा हेपतुल्ला मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह राजधानी इंफाळ
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५ वा रायझिंग दिवस साजरा

१८ जानेवारी रोजी NDRF कडून आपला १५  वा रायझिंग दिवस साजरा NDRF कडून आपला १५  वा रायझिंग दिवस १८ जानेवारी रोजी साजरा ठिकाण नवी दिल्ली उत्सवमूर्ती श्री. नित्यानंद राय (केंद्रीय गृह राज्यमंत्री) श्री. जी. व्ही. व्ही. सरमा (सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) वेचक मुद्दे NDRF ने राज्य आपत्ती प्रतिसाद बलासह समन्वयाने कार्य करणे अपेक्षित कामगिरी मानवी जीवन व राष्ट्रीय मालमत्ता वाचविण्यात महत्वाची भूमिका देशात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी नेहमीच अग्रगण्य भारत सरकार सर्वेक्षणानुसार NDRF कडून आपल्या कार्यात १ लाखाहून अधिक लोकांना जीवदान NDRF बद्दल थोडक्यात विस्तारित रूप NDRF म्हणजेच National Disaster Response Force स्थापना २००६ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत मुख्यालय अंत्योदय भवन, नवी दिल्ली अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार मंत्री अमित शहा, गृहमंत्री महासंचालक एस. एन. प्रधान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन

१९ जानेवारी: राष्ट्रीय लसीकरण दिन राष्ट्रीय लसीकरण दिन दरवर्षी १९ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे पल्स पोलिओ कार्यक्रम, २०२० चा एक भाग म्हणून संपूर्ण भारतभरात राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा भारतात पोलिओ निर्मूलनासाठी ५ वर्षाखालील सुमारे १७.४ कोटी मुलांना पोलिओ लसीकरण ठळक बाबी २०१२ मध्ये भारतातून पोलिओचे संपूर्ण निर्मूलन भारतात जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) ठरवलेल्या मानदंडांवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन राष्ट्रीय लसीकरण दिनाची पुढील फेरी १० मार्च रोजी WHO निरीक्षणे WHO ने पोलिओच्या संपूर्ण निर्मूलनासाठी शिफारस केलेल्या ४ धोरणांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय लसीकरण दिन WHO च्या मते, लसीकरण वर्षातून दोनदा २ ते ४ आठवड्यांच्या अंतरावर घेणे गरजेचे देशात लस पुरवठा अक्रियाशील पोलिओ लस (Inactivated Polio Vaccine - IPV) ओरल पोलिओ लस (Oral Polio Vaccine - OPV ) समाविष्ट  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१५ जानेवारी: लष्कर दिन

१५ जानेवारी: लष्कर दिन भारतात दरवर्षी लष्कर दिन १५ जानेवारी रोजी साजरा करतात ठिकाण दिल्ली पार्श्वभूमी १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दलासंबंधी विशेष घटना दलाची कमांड जनरल सर फ्रान्सिस बुचरकडून लेफ्टनंट जनरल के. एम. करियप्पा यांच्याकडे ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरित करणे हा भारतीय इतिहासातील महत्वाचा क्षण या क्षणाच्या स्मरणार्थ दिवस साजरा आवृत्ती ७२ वा कार्यक्रम आयोजन राष्ट्रीय राजधानी तसेच देशातील इतर भागात कार्यक्रम सैन्य कमांडच्या लष्करी परेड आणि शक्ती प्रदर्शनाचे आयोजन भारतीय लष्कराबाबत थोडक्यात स्थापना १ एप्रिल १८९५ १९४९ मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सैन्याला प्रमुख मिळाला कर्मचारी जवळपास १.४ दशलक्ष जागतिक स्थान चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य यु. एस. ए., चीन आणि रशिया नंतर भारत चौथ्या क्रमांकावर
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१४ जानेवारी: चौथा सशस्त्र सेना ज्येष्ठ दिन

१४ जानेवारी: चौथा सशस्त्र सेना ज्येष्ठ (Armed Forces Veterans) दिन चौथा सशस्त्र सेना ज्येष्ठ (Armed Forces Veterans) दिन १४ जानेवारी रोजी साजरा ठिकाण दिल्ली दिवसाचे महत्व फील्ड मार्शल के. एम. करियप्पा यांच्या निवृत्ती दिनानिमित्त साजरा त्यांच्या द्वारे प्रदान केलेल्या सेवांचा आदर आणि मान्यता म्हणून साजरा दिग्गजांच्या देश सेवेतील निःस्वार्थ भक्ती आणि त्यागाचा स्वीकार आणि सन्मान प्रमुख अतिथी अ‍ॅडमिरल करमबीर सिंह (नौदल कर्मचारी प्रमुख) घडामोडी दिवसाची सुरूवात राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये श्रद्धांजली सोहळ्याने सहभागी सुमारे २००० दिग्गज पार्श्वभूमी २०१७ पासून प्रत्येक वर्षी १४ जानेवारी रोजी सशस्त्र सेना ज्येष्ठ दिन साजरा  मार्शल के. एम. करियप्पा भारतीय सशस्त्र दलांचे पहिले कमांडर-इन-चीफ १४ जानेवारी १९५३ रोजी सेवा निवृत्त
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१३ जानेवारी: लोहरी दिन

१३ जानेवारी: लोहरी दिन भारतात लोहरी दिन १३ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे मुख्यत्वे उत्तर भारतातल्या शेतकर्‍यांचा सण म्हणून लोहरी साजरा मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री साजरा उत्सव साजरा उत्सवावेळी लोकांकडून सूर्य, पृथ्वी आणि अग्नी यांची पूजा शेतामध्ये समृद्धी, आरोग्य आणि चांगल्या कापणीसाठी प्रार्थना होळीमध्ये शेंगदाणे, गुळाची रेवडी टाकतात लोकप्रिय लोकगीते गाताना लोक नाचतात लोहरी बद्दल थोडक्यात मूळ सिंधू संस्कृती कालावधी हिंदू सौर दिनदर्शिकेनुसार लोहरी पौष महिन्यात म्हणजेच जवळपास १३ जानेवारी ला येते यावेळी पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ असते हिंवाळ्याचा उत्तरार्ध आणि नवीन कापणी हंगामाची सुरूवात चिन्हांकित राज्यनिहाय नावे पश्चिम बंगाल - मकर संक्रांती आसाम - बिहू तमिळनाडू - पोंगल केरळ - पोंगला
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन

१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रीय युवा दिन भारतात दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजरा स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा प्रचार करणे ही यामागील मुख्य कल्पना त्यांचे तत्वज्ञान आणि विचार यांचा प्रसार करण्याचे महत्वपूर्ण कार्य  उद्दीष्ट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तरुणांना देशातील हक्कांबाबत ज्ञान देणे २०२० सालासाठी थीम राष्ट्र उभारणीसाठी युवा शक्तीला मार्ग दाखविणे (Channelizing Youth Power for Nation Building) युवा पिढ्यांना प्रेरणा देणे समाजात योग्यरित्या वागण्यासाठी शिक्षण देणे कार्यक्रम आयोजन शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम गाणी, पठण, भाषणे, अधिवेशने, निबंध-लेखन स्पर्धा आणि चर्चासत्रे ऐतिहासिक पार्श्वभूमी १९८४ मध्ये भारत सरकारकडून सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा १२ जानेवारी १९८५ पासून देशभर राष्ट्रीय युवा दिन साजरा सरकारचे ध्येय स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीतून देशातील तरुणांना जीवन जगण्याकरिता प्रेरित करणे भारताचे चांगले भविष्य घडविण्याचे कार्य करणे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त जन्म १२ जानेवारी १८६३ कार्य विशेषता तत्ववेत्ता, समाजसुधारक आणि विचारवंत पहिल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना युवकांनी यश प्राप्त करण्यासाठी समर्पण करण्याचे आवाहन निधन ४ जुलै १९०२
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन

१० जानेवारी: जागतिक हिंदी दिन जागतिक हिंदी दिन दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा करतात उद्दीष्ट्ये जगभरात हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे हिंदीला जगातील प्रचलित भाषा म्हणून सादर करणे वेचक मुद्दे जागतिक हिंदी दिन हा राष्ट्रीय हिंदी दिनापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्याची हमी कार्यक्रम आयोजन परदेशस्थित भारतीय परराष्ट्र मंत्रालयांकडून विविध कार्यक्रम परदेशी वास्तव्य करणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांकडून विविध कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीसाठी खास कार्यक्रम ऐतिहासिक पार्श्वभूमी पहिली जागतिक परिषद १० जानेवारी १९७५ उद्घाटन इंदिरा गांधी (तत्कालीन पंतप्रधान) परदेश आयोजन मॉरिशस त्रिनिदाद आणि टोबॅगो युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम वार्षिक आयोजन घोषणा १० जानेवारी २००६ पंतप्रधान मनमोहन सिंग हिंदी भाषा हिंदी हा शब्द संस्कृत शब्द 'सिंधू'पासून रूपांतरित झाल्याचे मानतात जगातील सुमारे ४३ कोटी लोकांकडून हिंदी भाषेचा वापर जगात बोलल्या जाणार्‍या एकूण भाषांपैकी पाचव्या क्रमांकावर अनेक देशांमध्ये हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचा आढळ राष्ट्रीय हिंदी दिन दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस

९ जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस भारतात प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी ला साजरा करतात आवृत्ती १६ वी उद्दिष्ट भारताच्या विकासात योगदान देणार्‍या परदेशी भारतीयांची दखल घेणे ऐतिहासिक पार्श्वभूमी ९ जानेवारी १९१५ रोजी महान प्रवासी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत त्या क्षणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवस साजरा करण्याचे प्रयोजन वेचक मुद्दे महात्मा गांधीजींकडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व आफ्रिकेतील लढा लढून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी प्रथम साजरा २००३ घडामोडी सन २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये भारत सरकारकडून दिवसाचे पालन प्रवासी भारतीय सन्मान दरवर्षी या दिवशी प्रदान भारतीय राष्ट्रपतींकडून प्रदान हेतू अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाची व्यक्ती यांच्याशी संबंधित घटना एनआरआय किंवा पीआयओद्वारे स्थापित केलेल्या संघटना यांच्याशी दुवे निर्मितीस समर्थन आणि प्रोत्साहन देणे त्यांच्या महत्वपूर्ण योगदानास मान्यता देणे
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...