आजचे दिनविशेष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन

२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादन शुल्क दिन केंद्रीय उत्पादन शुल्क दिन दरवर्षी २४ फेब्रुवारी रोजी साजरे करतात वेचक मुद्दे केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम बोर्डच्या (Central Board of Excise and Custom - CBEC) सेवेचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा आवृत्ती दरवर्षी ठळक बाबी CBEC शी संबंधित अधिकारी आणि त्यांच्या सेवांचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा उद्देश अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करणे दरवर्षी उत्पादन क्षेत्रातील वस्तूंच्या भ्रष्टाचाराची तपासणी करणे केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम बोर्ड (Central Board of Excise and Custom - CBEC) बाबत थोडक्यात कार्यरत वित्त मंत्रालय अंतर्गत धोरण निर्मिती सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क संग्रहाशी संबंधित धोरण निर्मिती कायदे परीक्षण केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, १९४४ सीमाशुल्क कायदा, १९६२ सीमा शुल्क कायदा, १९७५ सेवा कर कायदा          
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२० फेब्रुवारी: मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन

२० फेब्रुवारी: मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य दिन २० फेब्रुवारी रोजी साजरा वेचक मुद्दे अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम राज्य दिन हा राज्य स्थापनेचा दिवस राज्य निर्मिती अरुणाचल प्रदेशची २० फेब्रुवारी १९८७ रोजी निर्मिती २० फेब्रुवारी १९८७ रोजी पूर्वी आसामचा भाग असणाऱ्या मिझोरम राज्याची निर्मिती मिझोरम बाबत थोडक्यात निर्मिती ईशान्य पुनर्रचना कायदा, १९७२ ची अंमलबजावणी करून निर्माण झालेले राज्य पूर्वस्थिती डोंगराळ प्रदेश स्वरूप असल्याने १९७२ पर्यंत मिझोरम आसाममधील एक जिल्हा घडामोडी भारतातील २३ वे राज्य स्थापन १९८६ मध्ये भारत सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार १९८७ मध्ये मिझोरम राज्याची निर्मिती अरुणाचल प्रदेश बाबत थोडक्यात १९७२ मध्ये राज्याचा उत्तर-पूर्व फ्रंटियर एजन्सी म्हणून उल्लेख १९७५ मध्ये एक निवडून आलेल्या सदस्यांकडून विधानसभा स्थापन पुनर्रचना अधिनियम, १९७२ नंतर अरुणाचल प्रदेश केंद्र शासित प्रदेश म्हणून कायम १९८७ मध्ये पूर्ण राज्य म्हणून उदयास
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा करतात दिवस साजरा युनेस्को वेचक मुद्दे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भाषा धोक्यात येण्याची भीती पूर्णपणे अदृश्य होण्याची शक्यता भाषा नष्ट होतात तेव्हा जगातील सांस्कृतिक विविधता देखील क्षीण होण्याची शक्यता मुख्य उद्देश बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे सुरुवात २००० पासून आवृत्ती दरवर्षी थीम सीमारेषांविना भाषा (Languages without Borders) युनेस्को निरीक्षणे आणि गरज आज जगात ६००० हून अधिक भाषा बोलल्या जातात यापैकी ४३% नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र प्रयत्न आणि निरीक्षणे आवाहन २००७ मध्ये सदस्यांना त्यांच्या भाषेचा प्रचार, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आवाहन इतर बाबी २००८ हे 'आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष' म्हणून जाहीर भारतात हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन

१९ फेब्रुवारी: मृदा आरोग्य कार्ड दिन मृदा आरोग्य कार्ड दिन दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दिवस साजरा मृदा आरोग्य कार्ड योजना प्रारंभाच्या स्मरणार्थ भारत सरकार कडून योजना सुरु १९ फेब्रुवारी २०१५ अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी ठळक बाबी मृदा समृद्धीचे मूल्यांकन करणे दर २ वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड देण्यास सुरुवात पोषण व्यवस्थापनास चालना देण्यास माती चाचणीला प्रोत्साहन देणे गरज मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्याचे बिघडणे हा प्रमुख परिणाम देशातील कृषी उत्पादकता घटण्याचे मुख्य कारण सध्या मातीत नकारात्मक पौष्टिक संतुलनाचा आढळ मातीचे आरोग्य सुधारण्याची आवश्यकता यशप्राप्ती राष्ट्रीय उत्पादकता परिषदेकडून २०१७ मध्ये घोषणा  मृदा आरोग्य कार्ड योजनेमुळे शाश्वत शेतीला चालना प्राप्त खत वापर ८ ते १०% पर्यंत कमी पिकांच्या एकूण उत्पादनात सुमारे ५% वाढ प्रामुख्याने माती आरोग्य कार्डाच्या शिफारशींवर आधारित खतांच्या वापरामुळे ही मोठी सुधारणा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन

१३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा वेचक मुद्दे सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिवस साजरा सरोजिनी नायडू यांची जयंती प्रथम साजरा सरोजिनी नायडू यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १३ फेब्रुवारी २०१४ पासून उद्देश सरोजिनी नायडू यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान करणे सरोजिनी नायडू यांच्याबाबत थोडक्यात जन्म १३ फेब्रुवारी १८७९ टोपणनाव गानकोकिळा (नाईटिंगेल ऑफ इंडिया) कवितांमुळे प्रसिद्ध कार्य आणि उपाधी कैसर-ए-हिंद १९२८ मध्ये भारतातील प्लेग साथीच्या काळात ब्रिटीश सरकारकडून त्यांच्या कामाबद्दल गौरव कामगिरी भारतातील पहिल्या महिला राज्यपाल १९४७-४९ मध्ये संयुक्त प्रांतात (सध्याचे उत्तर प्रदेश) सेवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग निधन २ मार्च १९४९ हृदयविकाराच्या झटक्याने आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन

१३ फेब्रुवारी: जागतिक रेडिओ दिन जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा करतात दिवस साजरा संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्कोकडून थीम रेडिओ आणि विविधता (Radio and Diversity) भाषिक सहिष्णुता, विविधता आणि बहुभाषिकतेमध्ये भिन्नता आणण्याचा प्रयत्न हेतू सांस्कृतिक कार्यक्षमता, मानवता आणि लोकशाही नागरिकत्व साजरे करण्यासाठी रेडिओ हे संप्रेषणाचे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचा संदेश पोहोचविणे मुख्य उद्दिष्ट्ये मीडिया आणि लोकांमध्ये रेडिओबद्दल जागरूकता वाढविणे महत्वपूर्ण निर्णय घेणा-यांना रेडिओद्वारे माहिती मिळविण्यास प्रोत्साहित करणे ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रथम २०१३ मध्ये साजरा जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचा ठराव २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेत संमत महत्व जागतिक स्तरावरील संप्रेषणाचे माध्यम म्हणून अजूनही रेडिओचा मोठ्या प्रमाणात वापर विविध समुदायांची सेवा करण्यास आणि प्रेक्षकांची विविधता प्रतिबिंबित करण्यास रेडिओ स्टेशनची मदत
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन

१२ फेब्रुवारी: राष्ट्रीय उत्पादकता दिन राष्ट्रीय उत्पादकता दिन दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी साजरा करतात आयोजक राष्ट्रीय उत्पादकता परिषद उद्देश भारतीय उत्पादकता संस्कृतीला चालना देणे गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता यांचा प्रचार करणे राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह १२-१८ फेब्रुवारी २०२० राष्ट्रीय उत्पादकता आणि नाविन्यपूर्ण पुरस्कार योजना उद्दिष्ट्ये विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे नाविन्य आणि उत्पादन क्षमतेबाबत जाणीव जागृती करणे भागधारक आणि डेटाबेसना प्रोत्साहित करणे निर्णय घेण्यास, प्रणाली आणि कार्यपद्धती सुधारण्यात मदत मिळणे 'भारतीय राष्ट्रीय उत्पादकता परिषदे'बाबत थोडक्यात स्थापना १९५८ उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग अंतर्गत स्वायत्त संस्था विशेषता टोकियो-आधारित आशियाई उत्पादकता संघटनेचा घटक सल्ला व प्रशिक्षण सेवा क्षेत्रे तंत्रज्ञान व्यवस्थापन ऊर्जा व्यवस्थापन आर्थिक सेवा मानव संसाधन व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान पर्यावरण व्यवस्थापन कृषी-व्यवसाय गुणवत्ता व्यवस्थापन औद्योगिक अभियांत्रिकी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन

११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा करतात सुरुवात २०१५ आवृत्ती दरवर्षी उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात मुली व महिलांनी घेतलेल्या भूमिकेस मान्यता देणे ठळक बाबी जगभरातील संघटनांच्या सहकार्याने हा दिवस साजरा विज्ञान क्षेत्रात महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करण्याचा प्रयास कार्यक्रम अंमलबजावणी युनेस्कोद्वारे युनेस्को प्राथमिकता लिंग समानता तरुण मुलींना शिक्षण आणि समान संधी उपलब्ध करुन देणे थीम सर्वसमावेशक हरित विकासासाठी विज्ञान क्षेत्रात महिला आणि मुलींमध्ये गुंतवणूक (Investment in Women and Girls in Science for Inclusive Green Growth) महत्व जगभरात फक्त ३०% महिला संशोधक पुरुषांच्या तुलनेत STEM क्षेत्रात कमी योगदान
2 वर्षापूर्वी
Current Affairs

११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन

११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन जागतिक युनानी दिन दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा वेचक मुद्दे हकीम अजमल खान यांची जयंती जागतिक युनानी दिन म्हणून साजरी विशेषता भारतीय युनानी फिजीशियन समाजसुधारक मुख्य उद्दिष्ट युनानी वैद्यकीय यंत्रणा, प्रतिबंधात्मक आणि गुणात्मक तत्वज्ञान याबद्दल जागरूकता पसरविणे कार्यक्रम आयोजक आयुष मंत्रालय उपस्थिती श्री. राजनाथ सिंग (संरक्षणमंत्री) ऐतिहासिक पार्श्वभूमी युनानी औषधी प्रणालीचा ग्रीसमध्ये उद्भव नंतर अरबांकडून ग्रीक युनानी साहित्याच्या बऱ्याचशा भागाचे अरबी भाषेत भाषांतर 'हकीम अजमल खान' यांच्याबाबत थोडक्यात जन्म ११ फेब्रुवारी १८६८ कार्य जामिया मिलिया इस्लामियाच्या संस्थापकांपैकी एक दिल्लीत टिबिया कॉलेज नावाच्या आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयाची स्थापना मुघल बादशहा बाबरच्या कारकिर्दीत भारतात आलेल्या वैद्यांच्या वंशातील एक उपाधी दिल्लीचे रईस
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस

१० फेब्रुवारी: राष्ट्रीय जंतनाशक दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी साजरा करतात दिवस साजरा दरवर्षी दोनदा  १० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय वेचक मुद्दे राष्ट्रीय आरोग्य अभियान ही मंत्रालयांतर्गत अंमलबजावणी करणारी एजन्सी जंत प्रसार प्रामुख्याने उघड्यावर शौच करणाऱ्या लोकांच्या विष्ठेतून ठळक बाबी  जंतनाशक टॅब्लेट अल्बेंडाझोल वाटप २ वेळा साजरा प्रयॊजन  २०१५ पहिल्या फेरीत १-१९ वयोगटातील ९.९ कोटी मुले पूर्ण दरवर्षी मुलांच्या व्याप्तीत वाढ फेब्रुवारी मध्ये २२.१२ कोटी मुलांना संसर्ग WHO निरीक्षणे भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील सुमारे २४१ दशलक्ष मुले परजीवी आतड्यांमधील जंतांमुळे बाधित या प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या मुलांच्या एकूण संख्येत भारताचा २८% वाटा जंत संक्रमणांमुळे अशक्तपणा, कुपोषण, अतिसार आणि भूक न लागणे अशा बाबींची शक्यता
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...