१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन

Date : Jan 13, 2020 04:31 AM | Category : आजचे दिनविशेष
१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन
१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन Img Src (Iaspaper.net)

१२ जानेवारी: राष्ट्रीय युवा दिन

  • राष्ट्रीय युवा दिन भारतात दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • दरवर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजरा

  • स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा प्रचार करणे ही यामागील मुख्य कल्पना

  • त्यांचे तत्वज्ञान आणि विचार यांचा प्रसार करण्याचे महत्वपूर्ण कार्य 

उद्दीष्ट

  • लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे

  • तरुणांना देशातील हक्कांबाबत ज्ञान देणे

२०२० सालासाठी थीम

  • राष्ट्र उभारणीसाठी युवा शक्तीला मार्ग दाखविणे (Channelizing Youth Power for Nation Building)

  • युवा पिढ्यांना प्रेरणा देणे

  • समाजात योग्यरित्या वागण्यासाठी शिक्षण देणे

कार्यक्रम आयोजन

  • शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम

  • गाणी, पठण, भाषणे, अधिवेशने, निबंध-लेखन स्पर्धा आणि चर्चासत्रे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • १९८४ मध्ये भारत सरकारकडून सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा

  • १२ जानेवारी १९८५ पासून देशभर राष्ट्रीय युवा दिन साजरा

सरकारचे ध्येय

  • स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीतून देशातील तरुणांना जीवन जगण्याकरिता प्रेरित करणे

  • भारताचे चांगले भविष्य घडविण्याचे कार्य करणे

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात

मूळ नाव

  • नरेंद्रनाथ दत्त

जन्म

  • १२ जानेवारी १८६३

कार्य विशेषता

  • तत्ववेत्ता, समाजसुधारक आणि विचारवंत

  • पहिल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

  • १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना

  • युवकांनी यश प्राप्त करण्यासाठी समर्पण करण्याचे आवाहन

निधन

  • ४ जुलै १९०२

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.