२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

Date : Jan 24, 2020 09:48 AM | Category : आजचे दिनविशेष
२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन Img Src (Unesco)

२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन 

 • आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी २४ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

 • राज्यघटनेच्या कलम २१-ए मध्ये शिक्षणाचा हक्क (Right To Education - RTE) अंतर्भूत

 • ८६ वी घटनादुरुस्ती २००२ नुसार कलम समाविष्ट

 • ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क

उद्दीष्ट्ये

 • शांतता आणि विकासासाठी शिक्षणाची भूमिका साजरी करणे

 • सर्वसमावेशक शिक्षण आणि न्याय्य गुणवत्तेसह सर्वांना आजीवन संधी उपलब्ध करून देणे

 • लैंगिक समानता प्राप्त करणे

 • शिक्षणासह गरिबीचे चक्र मोडण्यात यशस्वी ठरणे

थीम

 • 'लोक, ग्रह, समृद्धी आणि शांततेकरिता शिकणे' (Learning for people, planet, prosperity and peace)

 • शिक्षणाचे एकात्मिक स्वरूप आणि सामूहिक विकासाच्या महत्वाकांक्षांच्या दृष्टीने असलेल्या महत्वावर प्रकाश

शिक्षण: मानवाधिकार

 • मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणेतील कलम २६ मध्ये शिक्षणाच्या अधिकाराचा उल्लेख

 • विनामूल्य आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणास जाहीरनाम्यात मान्यता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.