एक चहावाला ते भारताचे लाडके पंतप्रधान असा प्रवास PM Modi

Date : 31 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५च्या व १९९८च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले. 

Source - Wikipedia

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.