पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या “एमबीए’ आणि “एमसीए’ सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया आज (शुक्रवार) पासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ७ एप्रिलपर्यंत आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिेकशन (एमसीए) या दोन्ही अभ्यासक्रमची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्यांदा सीईटी देणे अनिवार्य आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
सीईटी सेलच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जनोंदणी आणि निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ७ एप्रिलपर्यंत मुदत असल्याची माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.
सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल - या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.
अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी - दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.
यादीमध्ये भारत कुठे - जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.
‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी स्पर्धेत दुसरा पराभव पत्करल्यानंतरही भारतीय पुरुष संघाने व्यग्र हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना अजमावत प्रयोगाचे धोरण कायम ठेवले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ अर्जेटिनाविरुद्धच्या दोन लढतींपैकी पहिला सामना शनिवारी खेळणार आहे.
किलगा स्टेडियमवर स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताने ५-४ असा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या सामन्यात ३-५ अशी हार पत्करली. याआधी गेल्या महिन्यात भारताने फ्रान्सकडून २-५ असा पराभव पत्करला होता. मात्र तरीही भारतीय संघ १२ गुणांसह नेदरलँड्स (१६ गुण) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत.
येत्या वर्षांत राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाची महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत. या स्पर्धाना २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राखीव खेळाडूंनाही संधी देण्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी ठरवले आहे.
स्पेनविरुद्धच्या लढतीमधील भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कनिष्ठ विश्वचषक खेळलेला मध्यरक्षक मोयरंगथेम रबिचंद्रन पदार्पण करणार आहे.
दुखापतीतून सावरलेला गरुजत सिंगसुद्धा या सामन्यात पुनरागमन करणार आहे. गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक हा सूरज करकेराची जागा घेईल. बचावफळीत मनदीप मोर आणि दीपसन तिर्की यांच्या जागी अमित रोहिदास आणि जुगराज सिंग खेळतील. मध्यफळीत जसकरण सिंग आणि अक्षदीप सिंग यांच्या जागी सुमित आणि रबिचंद्र खेळतील.
जागतिक कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोना महामारीने जागतिकस्तरावर डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारखे देश दररोज कोविड -19 प्रकरणांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठत आहेत, जे मुख्यतः ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे वाढत आहेत. शिवाय अमेरिकेतही निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-19 प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज (शनिवार) चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.
चीनमध्ये शनिवारी सामुदायिक संक्रमणातून २ हजार १५७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. तर जिलिन प्रांतात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे देखील आवश्यक केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 साथीच्या रोगाचा शेवट खूप दूर आहे. त्यांच्या ताज्या साप्ताहिक आकडेवारीमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे.
यू.एन.च्या आरोग्य संस्थेने यापूर्वी म्हटले आहे की या वर्षी साथीच्या रोगाचा तीव्र टप्पा संपू शकतो परंतु इतर घटकांसह प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आपण किती लवकर पूर्ण करतो यावर ते अवलंबून असेल.
जिनेव्हा येथ पत्रकारपरिषदेत जेव्हा एका पत्रकाराने महमारी संपण्याच्या वेळेबद्दल विचारले असता, मार्गारेट हॅरिस म्हणाल्या की त्या “संपण्यासून खूप दूर आहे”. “आपण नक्कीच साथीच्या आजाराच्या मध्यात आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
एक महिन्याहून अधिक काळ कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, मागील आठवड्यापासून जगभरात कोविडची प्रकरणे वाढू लागल्याचे समोर येत आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, आशिया आणि चीनच्या जिलिन प्रांतात लॉकडाउनसह कोविड संख्येचा उद्रेक रोखण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये २५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. स्टेडियममध्ये ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांसह इतर प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.