महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये भारताला सांघिक कांस्य चँगवॉन : अनुभवी मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले. कोरियाच्या मिन्सू किम (३६ गुण) आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन (२६ गुण) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवलेला मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे.
मैराजने रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. दुसरीकडे अंजुम मुदगिल, आशी चौक्सी आणि सिप्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात कांस्यपदक पटकावले. भारतीय नेमबाजांनी ऑस्ट्रियाच्या शेलीन वैबेल, नादीन उन्गराक आणि रेबेका कोएक यांना १६-६ अशा फरकाने पराभूत केले.
गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम (प्रवेश अर्जाचा भाग दोन) नोंदवता येणार आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालानंतरच जाहीर करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले. प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यास २२ जुलैपासून सुरुवात केली जाणार आहे.
राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही मिळाली आहे. मात्र अन्य मंडळांचे निकाल प्रलंबित असल्याने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आता महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
https://11thadmission.org.in या संकेतस्थळाद्वारे सुरू असलेली प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया या पुढेही सुरू राहील. प्रवेश अर्जाचा भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यात विद्यार्थ्यांना किमान एक ते कमाल दहा महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवता येईल. तसेच कोटाअंतर्गत प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने पसंतीच्या महाविद्यालयात अर्ज करू शकतील. कोटाअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यार्थ्यांना दर्शवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश घेणे सुलभ होईल. प्रवेश फेरीद्वारे महाविद्यालय ॲलॉटमेंट, मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आदी प्रक्रियेचे वेळापत्रक सीबीएसईच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल. सीबीएसईच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यास पुरेसा वेळ देऊनच प्रवेश फेरी सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी संसदेत लोकसभेच्या सचिवालय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह हे निवडणूक अधिकारी असून त्यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी धनखड यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच, मोदी व अन्य भाजपच्या जेष्ठ नेत्यांशी चर्चाही केली. लोकसभा सचिवालयांच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाताना धनखड व मोदींनी एकाच रंगाचे जाकीट घातलेले होते. त्यावरून काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार जयराम रमेश यांनी ‘उमेदवार नेमका कोण’, अशी उपहासात्मक टिप्पणी केली. लोकसभेच्या महासचिवांनी अर्ज भरल्यानंतर कागदपत्रे धनखड यांच्याकडे न देता मोदींकडे दिली. त्यावरूनही रमेश यांनी, कागदपत्रे धनखड यांनीच स्वीकारायला हवी होती, अशीही टिप्पणी केली.
उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा १९ जुलै अखेरचा दिवस असून विरोधकांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ११ ऑगस्ट रोजी नवे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे.
श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सर्व राजकीय पक्षांना आपले मतभेद विसरून सर्वपक्षीय सरकार स्थापन करून देशावरील आर्थिक संकटावर मात करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळवण्यासाठी होत असलेल्या वाटाघाटींद्वारे मदतीबाबत ठोस पावले लवकरच उचलण्यात येतील. याआधी त्यांनी श्रीलंकेत आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली. यामुळे बुधवारी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी विक्रमसिंघे यांना व्यापक अधिकार मिळणार आहेत. विक्रमसिंघेही अध्यक्षपदासाठीचे इच्छुक उमेदवार आहेत.
विक्रमसिंघेंनी एका निवेदनाद्वारे सांगितले, की त्यांनी १३ मे रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती. देशवासीयांनी एका व्यक्तीला लक्ष्य करून वादाचा बळी देऊ नये. जुलैत देशांची इंधनाची गरज भागवणे कठीण झाले आहे. यादृष्टीने हा महिना खडतर चालला आहे. डिझेलचा साठा सुरक्षित असून, त्याचे वितरण केले जात आहे.
विक्रमसिंघे यांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांबाबत सांगितले, की नाणेनिधीसह परदेशी देशांशी मदतीबाबतची चर्चाही प्रगतिपथावर आहे. १९ वी घटनादुरुस्ती पुन्हा सादर केली जाईल. त्यामुळे जनतेच्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. समाजातील काही घटक देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असून या घटकांना देशाच्या प्रगतीत अडथळा आणण्यापासून रोखले जाईल. शांततापूर्ण मार्गानी आंदोलन करणाऱ्या आंदोलकाशी सरकार चर्चा करेल.
मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील रहिवासी व मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या दिपाली रविचंद्र मासीरकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे नेमणूक केली आहे. त्या निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे, दिपाली २००८ च्या नागालँड तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. एका मराठमोळ्या मुलीला मिळालेला हा मान चंद्रपूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
आज (१८ जुलै) रोजी देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदासाठी रालोआकडून द्रौपदी मुर्मू तर संपुआकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संचालकपदी नियुक्तीपूर्वी नागालँडमधील कोहीमा येथे पोलीस उप-महानिरीक्षक पदावर कार्यरत - दिपाली यांनी मुंबई येथे सहायक महानिरीक्षक या पदावर कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी सांभाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्तीपूर्वी नागालँडमधील कोहीमा येथे पोलीस उप-महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, दिपालीचे वडील वन अधिकारी होते.
जमैकाच्या शेली-अॅन फ्रेजर-प्राइसने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेतील हे तिचे पाचवे सुवर्णपदक ठरले. जमैकाच्या धावपटूंनी या शर्यतीवर वर्चस्व गाजवताना रौप्य आणि कांस्यपदकेही आपल्या नावे केली.
३५ वर्षीय फ्रेजर-प्राइसने १०.६७ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम वेळेचा विक्रम आपल्या नावे केला. तिने १९९९मध्ये मेरियन जोन्सने (१०.७० सेकंद) स्थापित केलेला विक्रम मोडीत काढला. प्राइसने यापूर्वी २००९, २०१३, २०१५, २०१९मध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. २००८ आणि २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.
यंदाच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना फ्रेजर-प्राइसने शेरिका जॅक्सनला ०.०६ सेकंदांनी मागे टाकले. तर ऑलिम्पिक विजेत्या एलेन थॉम्पसन-हेराला १०.८१ सेकंद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत जागतिक विक्रमवीर केनियाचा जोश्वा चेपतेगेइने २७:२७.४३ मिनिटे वेळ नोंदवत आपले जेतेपद कायम राखले. स्टॅनले म्बुरुने रौप्यपदक जिंकले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.