चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 मार्च 2024

Date : 17 March, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

Chalu Ghadamodi - 17 March 2024

आदर्श आचारसंहिता
 • आदर्श आचारसंहिता (MCC) हा भारतीय निवडणूक आयोगाने (EC) निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे.
 • हे निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेच लागू होते आणि निकाल घोषित होईपर्यंत ते लागू राहते.
 • MCC ची रचना सर्व स्पर्धकांसाठी समान खेळाचे क्षेत्र राखून आणि निवडणूक फायद्यासाठी अधिकृत यंत्रणेचा गैरवापर रोखून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे.
 • राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी वैयक्तिक हल्ले करणे, असभ्य भाषा वापरणे किंवा विद्यमान मतभेद वाढवणाऱ्या किंवा समुदायांमध्ये परस्पर द्वेष निर्माण करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करणे अपेक्षित आहे. मत सुरक्षित करण्यासाठी जातीय किंवा जातीय भावनांना आवाहन करणे सक्त मनाई आहे.
 • पक्ष आणि उमेदवारांनी स्थानिक कायद्यांचे पालन केले पाहिजे आणि सार्वजनिक सभा आणि मिरवणुका आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या पाहिजेत.
रस्ता अपघातग्रस्तांवर कॅशलेस उपचारांसाठी पायलट प्रकल्प
 • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 • हा कार्यक्रम, जो सुरुवातीला चंदीगडमध्ये राबविण्यात येईल, अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी, विशेषत: घटनेनंतरच्या गंभीर 'गोल्डन अवर'मध्ये याची खात्री करण्यासाठी डिझाइन केले आहे.
 • योजनेअंतर्गत, केंद्रशासित प्रदेशातील सर्व रस्ते अपघातग्रस्तांना रु. अपघाताच्या तारखेपासून कमाल सात दिवसांच्या कालावधीसाठी प्रति व्यक्ती 1.5 लाख. या कार्यक्रमात रस्त्यावरील कोणत्याही श्रेणीतील मोटार वाहनांच्या अपघातांचा समावेश असेल.
यूएसने टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केले
 • 13 मार्च 2024 रोजी, युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने जबरदस्तपणे एक विधेयक मंजूर केले ज्यामुळे देशातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी आणली जाऊ शकते .
 • 352 ते 65 च्या बाजूने मतांसह भक्कम द्विपक्षीय समर्थन मिळालेले हे विधेयक आता सिनेटकडे जाणार आहे, जिथे त्याचे भविष्य अनिश्चित आहे.
 • राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बिल त्यांच्या डेस्कवर पोहोचल्यास त्यावर स्वाक्षरी करण्याचे वचन दिले आहे.
 • TikTok चा चिनी मालक, ByteDance, चायनीज सरकारच्या नजरेत पडू शकतो या वाढत्या चिंतेमुळे हा कायदा तयार झाला आहे. 
भारताचे नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 ट्रिलियन रुपये किमतीच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची अक्षरशः पायाभरणी केली.
 • हे प्रकल्प भारताला जागतिक सेमीकंडक्टर हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि देशात नवकल्पना वाढवण्यासाठी सज्ज आहेत.
 • तीन सेमीकंडक्टर प्रकल्प
 • 1 धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (DSIR) गुजरात मध्ये
 • २ मोरीगाव, आसाम
 • 3 Sanand, Gujarat

१७ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)


Chalu Ghadamodi - 17 March 2023 

बाबर आझमचा टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका! ख्रिस गेलचा ‘हा’ विक्रम मोडला
 • सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग २०२३ या स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील प्लेऑफचा सामना इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पेशावर झाल्मी संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे. शुक्रवारी त्याने शानदार फलंदाजी करताना आणखी एक विक्रम केला. तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ९००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
 • ख्रिस गेलचा विक्रम मोडला - पीएसएल अंतर्गत गुरुवारी इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध पेशावर झाल्मीचा सामना पार पडला. या सामन्यात खेळताना पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने ६४ धावांची दमदार खेळी केली. त्याचबरोबर बाबरने एक मोठा विक्रम रचला आहे. त्याने सर्वात जलद नऊ हजार धावा करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलने २४९ डावात ९००० धावा पूर्ण केल्या. बाबरने केवळ २४५ डावात ही कामगिरी केली.
 • विराट कोहली तिसऱ्या स्थानावर - बाबर आणि गेलनंतर विराट कोहली २७१, डेव्हिड वॉर्नर २७३ आणि अॅरॉन फिंच हे २८१ डावात नऊ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज आहेत. बाबरने २०१९ पासून सर्वाधिक टी-२० शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर ८ शतके आहेत. या यादीतील पुढचा फलंदाज जोस बटलर आहे, ज्याने ६ शतके झळकावली आहेत. युनायटेडविरुद्धच्या ३९ चेंडूंच्या खेळीत झाल्मीच्या कर्णधाराने १० चौकार मारले. युनायटेडचा कर्णधार शादाब खानने त्याला १३व्या षटकात पायचित बाद केले.
 • या प्लेऑफच्या सामन्यात पेशावर झाल्मीने २० षटकात ८ गडी गमावून १८३ धावा केल्या. बाबरच्या ६४ सोबतच मोहम्मद हरिसने ३४, सॅम अय्युबने २३, हसिबुल्ला खानने १५, टॉम कॅडमोरने १६ आणि अजमातुल्लाहने १० धावांचे योगदान दिले. युनायटेडचा कर्णधार शादाब खानने ४ षटकात ४० धावा देत २ बळी घेतले.
नोबेल समितीच्या उपनेत्याकडून पंतप्रधानांचे कौतुक
 • नोबेल शांतता पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव विचारात नाही असे स्पष्टीकरण नोबेल समितीचे उपनेते अॅस्ले तोए यांनी गुरुवारी दिले. ते भारताच्या दौऱ्यावर आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना, तोए यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्धासंबंधी घेतलेल्या ‘हे युग युद्धाचे नाही’ या भूमिकेची प्रशंसा केली.
 • मोदी यांचे हे विधान आशा दर्शवते, जागतिक विवाद कसे मिटवू नयेत याबद्दल भारताने सूचक संदेश दिला आहे. तसेच जगाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग मोदींच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.
 • तोए यांच्या या विधानांचा विपर्यास करत काही वृत्तवाहिन्यांनी, शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी प्रबळ दावेदार असल्याचे वृत्त दिले. अखेर तोए यांनी त्याचे खंडन करून या सर्व अफवाच असल्याचे स्पष्ट केले.
 • मी असे किंवा तत्सम काहीही म्हणाले नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी यासंबंधी अफवांचे खंडन केले. या अफवांवर चर्चा करू नये तसेच त्याला जास्त महत्त्वदेखील देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. मी येथे नॉर्वेजियन नोबेल समितीचा उपनेता म्हणून आलेलो नाही, मी येथे आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेचा संचालक आणि भारताचा मित्र म्हणून आलो आहे असे त्यांनी स्पष्ट केलेय.
महिला प्रवाशांसाठीच्या सवलतीने एसटीचा आर्थिक प्रश्न सुटणार?
 • गेल्या अनेक वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक कोंडीत सापडले आहे. करोना, टाळेबंदी, संप काळात एसटीची आर्थिक स्थिती अधिक खालावली. एसटीला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांना अद्याप पूर्णपणे यश मिळालेले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्पात एसटी महामंडळाची आर्थिक गणिते सुधारण्यासाठी नवे काही फारसे न करता, जुन्याच घोषणांना नवा मुलामा लावल्याचे दिसते. मात्र, एका घोषणेमुळे सध्या एसटी चर्चेत आहे. एसटीच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे. परंतु, ही घोषणा एसटीला नवसंजीवनी देणारी ठरेल का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
 • एसटीची सद्यःस्थिती काय - गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एसटी पुन्हा धावू लागली. कर्मचारी वर्ग कर्तव्यावर हजर राहिल्याने ‘गाव तेथे एसटी’ दिसायला लागली. सध्या राज्यात एसटीच्या १३ हजार ५९५ गाड्या धावत असून दिवसाला ६० ते ६५ लाख फेऱ्या होतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रकमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. महामंडळाला दर महिन्याला सरासरी ८५० कोटी रुपये खर्च येतो आणि दरमहा ७२० कोटी (प्रतिपूर्ती रकमेसह) रुपये उत्पन्न मिळते.
 • एसटीला आर्थिक गर्तेतून काढण्यासाठी काय उपाय - यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळाला विशेष काहीच मिळाले नाही. स्थानक नूतनीकरण, विद्युत बस आणि जुन्या गाड्यांचे रूपांतर या पूर्वीच्याच योजना पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील १०० एसटी बस स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी ४०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ५,१५० विद्युत बस खरेदी करण्यात येणार आहेत. डिझेलवर धावणाऱ्या ५ हजार बसचे एलएनजी इंधनात रूपांतर करण्यात येणार आहे. राज्यातील महिलांना एसटीतून प्रवास करताना ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार याकडेच सर्व महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.
 • सध्या तिकीट दरात किती जणांना सवलती - एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या राज्यातील हजारो प्रवाशांसाठी सुमारे २९ प्रकारच्या सवलती योजना आहेत. या सवलतीमधून प्रवासी तिकीट दरात ३३ टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या सवलतींचे उत्तरदायित्व हे राज्य सरकारचे आहे. त्यामुळे ६७ टक्के ते पूर्णपणे तिकीटाचे भाडे हे राज्य सरकार भरते. ऑगस्ट २०२२ पासून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत लागू झाला आहे. आतापर्यंत ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी प्रवास केला आहे. सध्या दररोज सरासरी ५ लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक एसटीच्या बसमधून मोफत प्रवास करत आहेत. यामुळे एसटी महामंडळाला महिन्याला ६५ ते ७५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळते. सर्व सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम दरमहिना सुमारे २२० कोटी रुपयांपर्यंत असून राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ही रक्कम दिली जाते.
Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक
 • Apple ची पुरवठादार Foxconn कंपनीला एअरपॉड्स तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. फॉक्सकॉन हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहे, जो ७०% आयफोन बनवतो. आता कंपनीला प्रथमच एअरपॉडचे कंत्राट मिळाले आहे. एअरपॉड्स हे सहसा चिनी उत्पादकांद्वारे बनवले जातात. Foxconn Airpods तयार करण्यासाठी तेलंगणात एक प्लांट उभारणार आहे.
 • फॉक्सकॉन ही कंपनी या निमित्ताने भारतामध्ये $२०० दशलक्ष म्हणजेच सुमारे १,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत. फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरु होऊ शकते. यासाठी कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे. याच्याशी संबंधित दोन लोकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
 • या प्रोजेक्टची माहिती अद्याप सार्वजनिकरित्या समोर न आल्यामुळे नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंती करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी डिव्हाइस बनवताना तुलनेने कमी नफ्याच्या मार्जिनमुळे एअरपॉड्स एकत्र करायचे की नाही याबद्दल अंतर्गत वादविवाद केला होता. मात्र शेवट चांगला करण्यासाठी करारासह पुढे जाण्याच्या पर्याय निवडण्यात आला.
 • या महिन्याच्या सुरुवातीला काही रिपोर्टनुसार माहिती समोर आली होती की , फॉक्सकॉन ग्रुप भारतात $७०० दशलक्ष ५,७४० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक चीनमधील उत्पादन भारतात स्थलांतरित करण्यासाठी आहे. सध्या Apple च्या आयफोन आणि इतर प्रॉडक्ट्सचे उत्पादन वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये केले जात आहे. मात्र हे संपूर्ण उत्पादन फॉक्सकॉन भारतात आणण्याच्या तयारीमध्ये आहे.
राजीनामा दिलेले सरकार परत कसे आणणार?
 • विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगणारी तत्कालीन राज्यपालांची कृती बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले, तरीही स्वत:हून राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत कसे आणता येईल, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांना गुरुवारी केला. राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोरील सुनावणी संपली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. गेल्या जून महिन्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर, शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकमेकांविरोधात सहा याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वाधिक महत्त्वाची ठरली.
 • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. शहा व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारीपासून चार आठवडे नियमित सुनावणी घेण्यात आली. गुरूवारी अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे वकील ए. एम. सिंघवी यांनी राज्यपालांच्या आदेशापूर्वीची स्थिती पुनस्र्थापित करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ‘तुम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाला असतात, तर ही मागणी तार्किक ठरली असती. रद्द ठरविलेल्या विश्वासदर्शक ठरावामुळे तुमची सत्ता गेल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र काही कारणाने तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला नाहीत.
 • आपण अल्पमतात असल्याचे मान्य केलेले सरकार परत स्थापित करण्यास न्यायालयाला सांगितले जात आहे.’ घटनापीठातील एक सदस्य न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने त्याआधी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 मार्च 2022

 

‘आयपीएल’ आणखी रोमांचक; यंदा ‘डीआरएस’, सुपर ओव्हरसारख्या नियमांमध्ये बदल :
 • नवे करोना नियम - ‘बीसीसीआय’ने सर्वात मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. करोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास ’आयपीएल’ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.

 • प्रत्येक डावात संघांना दोन डीआरएस - मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (एमसीसी)  सुचविण्यात आलेल्या नियमाला पाठिंबा देत ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ सामन्यात एकूण चार ‘डीआरएस’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक डावात दोन्ही संघांना दोन-दोन ‘डीआरएस’चा वापर करता येणार आहे.

 • झेलनंतर नवीन फलंदाज फलंदाजीला - ‘बीसीसीआय’ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल.

 • सुपर ओव्हर टाय’ झाल्यानंतरही विजेता - ‘आयपीएल’साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे. याचा अर्थ अंतिम फेरीतील दोन संघामधील जो संघ साखळीच्या गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असेल, त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.

जगाची चिंता वाढली! करोनाचा नवा व्हेरियंट आढळला; जाणून घ्या काय आहेत लक्षणं :
 • जगावरील करोनाचं संकट कमी होत असल्याचं वाटत असतानाच इस्त्रालयाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे. हा व्हेरियंट जगासाठी अद्यापही अनोळखी असल्याचं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान इस्रायललमधील साथीच्या रोगांच्या प्रमुखांनी या नवीन व्हेरियंटबद्दल भीती बाळगू नये असं आवाहन केलं आहे.

 • या नव्या व्हेरियंटमध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) आवृत्तीचे दोन उप-प्रकार BA.1 आणि BA.2 एकत्र आले आहेत. याआधी डेल्टाक्रॉनच्या (Deltacron) वेळीदेखील दोन व्हेरियंट एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं होतं. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट एकत्र येऊन डेल्टाक्रॉन हा नवा व्हेरियंट तयार झाला होता.

 • लक्षणं काय - या नव्या व्हेरियंटमध्ये हलका ताप, डोकेदुखील आणि स्नायूंचं दुखणं अशी लक्षणं जाणवत आहेत. दरम्यान इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने या नव्या व्हेरियंटसाठी तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याची गरज नसल्याचं सांगत दिलासा दिला आहे.

 • कुठे आढळला व्हेरियंट - इस्त्रायलमधील बेन गुरियन (Ben Gurion) विमानतळावर दोन प्रवाशांची चाचणी करण्यात आली असता हा नवा व्हेरियंट आढळला.

 • इस्त्रायलने यावेळी चिंता करण्याचं कारण नसून दोन व्हेरियंट एकत्र येणं हे काही नवीन नसल्याचं सांगितलं आहे. रुग्णसंख्या वाढण्याची आम्हाला कोणतीही चिंता नसल्याचं कोविड पथकाच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. याआधी जानेवारी महिन्यात इस्त्रायलमध्ये फ्लोरोनाच्या (florona) पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती.

केंद्र सरकारकडून पर्यटन व्हिसा पूर्ववत "
 • करोनाकाळात बंद करण्यात आलेला ई-पर्यटन व्हिसा केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ १५६ देशांतील नागरिकांना होणार आहे.

 • सर्व देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा नियमित पर्यटन व्हिसाही आता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली.  

 • अमेरिका आणि जपान या देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा १० वर्षांसाठीचा नियमित पर्यटन व्हिसाही पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मार्च २०२० पासून केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी असणारा पर्यटन व्हिसा देणे बंद केले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हे पुन्हा सुरू केले आहे.

ऑलिम्पियाड बुद्धिबळचे भारताला यजमानपद; यंदा जुलै-ऑगस्ट कालावधीत चेन्नईत स्पर्धेचे आयोजन :
 • रशिया-युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे. यंदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जुलै-ऑगस्ट या कालावधीत चेन्नईमध्ये रंगणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.

 • ‘‘भारतातील बुद्धिबळाची राजधानी (चेन्नई) यंदा ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. तमिळनाडूसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचे चेन्नईत स्वागत,’’ असे स्टॅलिन यांनी ‘ट्वीट’ केले. त्यांच्या या विधानाला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही (एआयसीएफ) दुजोरा दिला.

 • ‘एआयसीएफ’ने ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ‘फिडे’ला १० मिलियन अमेरिकन डॉलर (साधारण ७० कोटी रुपये) देऊ करण्याची तयारी दर्शवली. ऑलिम्पियाड या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जवळपास १९० देशांचे संघ सहभागी होतात. यंदा ही स्पर्धा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती. मात्र, युक्रेनवरील हल्ल्यांनंतर ऑलिम्पियाडसह सर्वच बुद्धिबळ स्पर्धा रशियाबाहेर खेळवण्याचा ‘फिडे’ने निर्णय घेतला. 

 • या स्पर्धेच्या आयोजनासाठी चेन्नईसह दिल्ली आणि गुजरात या शहरांची नावेही चर्चेत होती. मात्र मार्चच्या सुरुवातीला ‘एआयसीएफ’चे सरचिटणीस भरत सिंह चौहान यांनी भारताचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांच्यासोबत स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यांच्या पाठिंब्यानंतर ‘एआयसीएफ’ने यजमानपदासाठी चेन्नईचे नाव निश्चित केले. ऑलिम्पियाड ही भारतात होणारी दुसरी सर्वात मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ठरेल. याआधी २०१३ मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या तारांकित खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत भारतामध्ये झाली होती.

वर्षभरात ८,०४५ किलोमीटर रस्त्यांची बांधणी :
 • गेल्या आर्थिक वर्षांत फेब्रुवारी २०२२पर्यंत देशभरात ८,०४५ किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला गडकरी यांनी लेखी उत्तराद्वारेही ही माहिती दिली.

 • देशभरात महामार्ग आणि द्रुतगती मार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायभूत विकास महामंडळाकडे आहे. गडकरी यांनी राज्यसभेत सांगितले की, २०१९-२० या आर्थिक वर्षांत १०,२३७ किलोमीटर, २०२०-२१मध्ये ८,०४५ किलोमीटर आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांत ८,०४५ किलोमीटर रस्तेबांधणी करण्यात आली.

 • पाच वर्षांच्या कालावधीत म्हणजेच २०२९-२० ते २०२३-२४ पर्यंत ६०,००० किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन असून फेब्रुवारी २०२२ पर्यंत ३१,६०९ रस्तेबांधणी झाली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. २८,३९१ किलोमीटर रस्तेबांधणीचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.

१७ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.