चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑगस्ट २०२१

Date : 1 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगावर आता ‘डेल्टा’ संकट :
  • मूळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.

  • ‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.

  • करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.

  • ‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्टसाठीचे अध्यक्षपद भारताकडे :
  • १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार असून; या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

  • ‘आम्ही देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असलेल्या महिन्यातच शक्तिशाली अशा सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवायला मिळणे हा आमच्यासाठी बहुमान आहे’, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला व्हिडीओ संदेशात सांगितले.

  • भारताच्या अध्यक्षपदाचा कामकाजाचा पहिला दिवस सोमवार, २ ऑगस्ट राहणार असून,  तिरुमूर्ती हे त्या दिवशी संयुक्त राष्ट्रे मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२१ ला सुरू झाला होता. अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ या कालावधीत ऑगस्ट महिन्यात मिळणारे भारताचे पहिले अध्यक्षपद असणार आहे.  पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये पुन्हा भारताकडे हे अध्यक्षपद येणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला नव्या कुलगुरूंची प्रतीक्षा :
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्या कु लगुरूंच्या निवडीसाठी प्रक्रि या सुरू झाली असून नावांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी निवड समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, यावेळची कुलगुरू निवड का लांबत चालली आहे, याची चर्चा विद्यापीठ वर्तूळात होत आहे.

  • माजी कु लगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ गेल्या २ जून रोजी संपुष्टात आला. त्याआधी कु लगुरू शोध समिती गठित होणे आवश्यक होते, पण त्यालाही विलंब झाला. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कु लगुरूपदासाठी नावे प्रस्तावित करण्यासाठी शोध समिती गठित केली.

  • वाराणसी येथील स्कू ल ऑफ बॉयोके मिकल इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलाजीचे प्रोफे सर विकास कु मार दुबे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. २७ मे २००९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार कु लगुरूपदासाठी निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता आणि या पदासाठीचा अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांकडून अर्ज मागविण्यात आले.

  • अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ५ जुलै होती. दरम्यान, कुलगुरू पदासाठी इच्छूक कोण ? याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर ही बाब सार्वजनिक होणार आहे.

महाराष्ट्रात झिका व्हायरसचा शिरकाव! पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण :
  • केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील येथे ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

  • पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने घबराट पसरली आहे.बेलसर,जेजुरी या परिसरात गेल्या दिड महिन्यापासून डेंग्यू,चिकनगुनीया,मलेरीया आदी साथीच्या आजारांनी थैमान मांडले आहे.त्या अनुषंगाने बेलसर येथील ५१ रुग्णांचे नमुने जमा करुन ते एनाआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला तर २५ चिकनगुनीया व ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले.त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला शनिवारी  भेट देऊन पाहणी केली व त्वरीत पुढील उपाय-योजना करण्याचे आदेश दिले. 

  • केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे.सध्या पुरंदर तालुक्यातून केरळमध्ये डाळिंब मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवले जात आहेत.त्यामुळे तेथे गेलेले व्यापारी किंवा ट्रक चालक यांचेकडून संसर्ग झाल्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत :
  • जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकल्यावर अमेरिका खेळाडूंना सुमारे २८ लाख रुपये देईल. सिंगापूरसारख्या छोट्या देशात उपलब्ध असलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. तीन मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना आजीवन मदत करतात. त्याचबरोबर युरोपमधील काही मोठे देश कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.

  • फोर्ब्सच्या बातमीनुसार, एस्टोनियामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये मिळतील. याशिवाय निवृत्तीवर अधिक भत्ता मिळतो. जर एखादा खेळाडू २९ वर्षात सुवर्ण जिंकतो आणि ७८ वर्षे जगतो, तर त्याला सुमारे २.२५ कोटी मिळतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही दरमहा भत्ता दिला जातो. ब्रिटन, न्यूझीलंड आणि स्वीडनमध्ये पदक जिंकण्यासाठी बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. सुवर्णपदकांसाठी सर्वाधिक पैसे देणारे देश कोणते आहेत, ते जाणून घेऊया.

  • सिंगापूर – सुवर्णपदक जिंकल्यावर जास्तीत जास्त बक्षीस रक्कम सिंगापूरमध्ये दिली जाईल. येथे सुवर्णपदक जिंकल्यावर तुम्हाला सुमारे ५.५० कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर रौप्यपदक विजेत्याला २.७५ कोटी तर कांस्यपदक मिळवणाऱ्याला १.३७ कोटी मिळतील. मात्र आतापर्यंत सिंगापूरला एकही पदक मिळालेले नाही. त्यांचे खेळाडू पुढील आठवड्यात महिलांच्या टेबल टेनिसमध्ये पदके जिंकू शकतात.

जुलैमध्ये सहा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार :

भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

मागच्या तीन महिन्यातील डिजिटल व्यवहार

  • मे २०२१ मध्ये २५३ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ४ लाख ९० हजार ६३८ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.
  • जून २०२१ मध्ये २८० कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ५ लाख ४७ हजार ३७३ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.
  • जुलै २०२१ मध्ये ३२४ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ६ लाख ०६ हजार २८१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.

०१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.