चालू घडामोडी - २० जुलै २०१८

Date : 20 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था :
  • नवी दिल्ली : आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे.

  • भारताच्या बळावर दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल, असेही ‘एडीबी’ने म्हटले आहे.

  • एडीबीने ‘आशियाई विकास दृष्टीकोन’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिका आणि तिच्या व्यापारी भागीदारांत तणाव निर्माण झाला असला तरी आशिया आणि प्रशांत विभागातील विकसनशील अर्थव्यवस्थांची वृद्धी २०१८ आणि २०१९ मध्ये मजबूत राहील. दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल. यात भारत नेतृत्वस्थानी राहील.

७२ हजार नोकरभरतीत १६ टक्के जागा मराठा समाजाला राखीव: मुख्यमंत्री :
  • नागपूर:  राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजाच्या राखीव जागा समजल्या जातील. उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर हा बॅकलॉग भरला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

  • विधानपरिषदेत आमदार विनायक मेटे यांच्याकडून मराठा अरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं.

  • मुख्यमंत्री म्हणाले, “आरक्षणावर दोन्ही सभागृहात कायदा केला. मात्र सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. कारण त्यांच्या शिफारशीशिवाय आरक्षण देता येणार नाही. सध्या आयोगाची जनसुनावणी सुरु आहे. त्यानुसार अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला जाईल.  

  • मराठा आरक्षण हा विषय सरकारच्या अखत्यारित नाही, तर कोर्टाच्या अखत्यारित आहे.राज्य सरकारकडून 72 हजार नोकर भरती केली जाणार आहे. काहींचा असा समज आहे की मराठा समाजाला यामध्ये राखीव स्थान नसेल. तेव्हा या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या 16 टक्के जागा या राखीव समजल्या जातील आणि उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर हा बॅकलॉग भरला जाईल".

अकल्पनीय! शास्त्रज्ञांना जमिनीखाली आढळला हिऱ्यांचा "हिमालय" :
  • वॉशिंग्टन - पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. जमिनीखाली दहा खर्वांहून हजारपटीने अधिक एवढ्याप्रमाणात असलेल्या या हिऱ्यांच्या साठ्याबाबत जाणल्यानंतर शास्त्रज्ञांचे डोळेच विस्फारले आहेत. 

  • हा शोध घेणाऱ्या शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिऱ्यांचा हा महाप्रचंड साठा भूपृष्टापासून सुमारे  90 ते 150 मैल (145 ते 240 किमी) खाली दबलेला आहे. आतापर्यंत एवढ्या खोलीवर मनुष्याला पोहोचता आलेले नाही. तसेच एवढे खोल खोदकाम करणेही शक्य झालेले नाही. 

  • एमआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ अर्थ, अॅटमसफरिक अँड प्लॅनेटरी सायन्सेस येथे रिसर्च सँटिस्ट असलेले उलरिक फॉल सांगतात,"आपण या हिऱ्यांना बाहेर काढू शकत नाही. पण हा साठा एवढो मोठा आहे की यापूर्वी त्याबाबत कल्पनासुद्धा करण्यात आली नव्हती. 

  • सेसमित तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञ जमिनीमधून ध्वनितरंग कसा प्रवास करतात याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच या साठ्याचा शोध लागला. पृथ्वीवरील प्राचीन भूमिगत खडकांमध्ये एक हजारहून अधिक हिरे असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र हे हिरे मानवाच्या हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.  

लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध :
  • नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.

  • हे नाव मेघालय राज्यातील 'मॉवम्लुह' या गुहेतील' स्टॅलॅगमाईट'वरुन पडलेले आहे. ज्यावेळेस चुनखडकाच्या गुहेमध्ये पाण्याचे थेंब पडत असलेल्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन केवळ क्षारांचे संचयन मागे राहाते तेव्हा त्या गुहेत जमिनीवर क्षारांचे खांब तयार होतात त्यास 'स्टॅलॅगमाईट' असे म्हणतात.

  • ही प्रक्रीया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. ज्यावेळेस हे थेंब थेंब पाणी पडून गुहेच्या छताला लटकणारे खांब तयार होतात तेव्हा त्यास स्टॅलॅकमाइट असं म्हटलं जातं.नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.

  • मेघालय युगाचे पुरावे सर्व खंडांमध्ये सापडलेले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी होलोसीन युग या कालखंडाचे तीन भाग केलेले आहेत. यामध्ये सुरुवातीचा काळ ग्रीनलँडीयन एज काळ येतो. हा काळ 11, 700 वर्षे पूर्वी सुरु झाला. त्यानंतर 8300 वर्षांपूर्वी नॉर्थग्रीपीयन कालखंड सुरु होतो आणि सर्वात शेवटी 4,200 वर्षे मेघालयन एज म्हणजे मेघालय युगाची सुरुवात होते.

  • मेघालय युगाची सुरुवात अत्यंत मोठ्या दुष्काळांनी सुरुवात झाली. हा दुष्काळ सलग 200 वर्षे राहिला. त्यानंतर हिमयुगाच्या शेवटी निर्माण झालेल्या कृषी आधारित समाजांवर हवामानातील बदलांमुळे मोठा परिणाम झाला होता. इजिप्त, युनान, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया आणि सिंधु संस्कृती, यांगत्से नदीजवळील संस्कृतीवर याचा परिणाम झाला होता असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

इस्रायल झाले 'ज्यूंचे राष्ट्र-राज्य'; वादग्रस्त विधेयक मंजूर :
  • जेरुसलेम- इस्रायलची संसद क्नेसेटने एका वादग्रस्त विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे इस्रायलला आता ज्यू धर्मियांचे राष्ट्र-राज्य घोषित करण्यात आले आहे. पॅलेस्टाइनच्या नागरिकांशी भेदभाव करण्याचे आणखी एक साधन या कायद्यामुळे मिळेल अशा प्रकारची टीका या कायद्यावर होत होती.

  • या विधेयकाच्या बाजूने 62 मते मिळाली तर त्याच्याविरोधात 55 मते पडली आहेत. या कायद्यानुसार आता हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा झाली असून ज्यू धर्मिय हे 'राष्ट्रहिताचा विषय' घोषित करण्यात आले आहे. इस्रायलचा राष्ट्रध्वज, धार्मिक प्रतिक मेनोराह ( ज्यू धर्मियांच्या हनुक्कासणाच्यावेळेस वापरला जाणारा मेणबत्त्यांचा स्टँड), हकित्वा हे राष्ट्रगीत, हिब्रू कॅलेंडर, इस्रायलचा स्वातंत्र्यदिन या सर्वांचा समावेश विधेयकात केला आहे.

  • या विधेयकामुळे अरबी भाषेचा अधिकृत दर्जा हिरावून घेण्यात आला असून त्यास विशेष दर्जा अशी श्रेणी देण्यात आली आहे. आता या विधेयकातील तरतुदींनुसार, इस्रायल हे ज्यू लोकांची ही ऐतिहासिक निवासभूमी असून त्याबाबत निर्णय घेण्याचे त्यांना अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

महत्वाच्या घटना 

  • १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

  • १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

  • १९६०: जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या.

  • १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.

  • १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

  • २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी१९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)

  • १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

  • १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

मृत्यू 

  • १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

  • १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

  • १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

  • १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

  • १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.