चालू घडामोडी - १० नोव्हेंबर २०१७

Date : 10 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
2018 मध्ये नोकरदारांचे पगार १० टक्क्यांनी वाढणार : सर्व्हे 
  • मुंबई : 2018 वर्षात भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचं ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’नं केलेल्या सर्व्हेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • या सर्व्हेमध्ये बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, मीडिया, औषध आणि आरोग्यशास्त्र, यासह अनेक खासगी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे.

  • नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा 10 टक्के सरासरी पगारवाढ असेल असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

  • या सर्व्हेसाठी जुलै महिन्यात आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील 4 हजार प्रतिनिधींची मतं विचारात घेण्यात आली. यात 300 भारतीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. (source :abpmajha)

हवाई टॅक्सी विकसित करण्यासाठी उबेरची नासासोबत भागीदारी :
  • लॉस एंजेलिस : हवाई टॅक्सी (फ्लाइंग टॅक्सी) विकसित करण्याच्या प्रकल्पात उबेरने अमेरिकी आंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे. उत्तम दर्जा आणि कमी किंमत हे निकष नजरेसमोर ठेवून ही टॅक्सी विकसित करण्यात येणार आहे.

  • उबेरने जारी केलेल्या माहितीनुसार, यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘उबेरएअर’ प्रकल्पात लॉस एंजेलिस शहराचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलास फोर्थ-विथ आणि दुबई यांचा या प्रकल्पात आधीच समावेश झालेला आहे.

  • कॅलिफोर्निया आणि टेक्सास हे अमेरिकेतील सर्वाधिक कार असलेले प्रांत आहेत. उबेरच्या निवेदनात म्हटले आहे की, नासाच्या मानवरहित वाहतूक व्यवस्थापन (यूटीएम) प्रकल्पात उबेर सहभागी झाली आहे. अमेरिकेच्या निवडक शहरात २०२० पर्यंत प्रदर्शनी हवाई टॅक्सी सुरू करण्याचे लक्ष्य ‘उबेरएअर’ने ठेवले आहे.

  • उबेरच्या योजनेनुसार, हवाई टॅक्सी सेवेचे पहिले प्रात्यक्षिक २०२० मध्ये घेतले जाईल. २०२३ पर्यंत ही सेवा व्यावसायिक पातळीवर सुरू होईल. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे आॅलिम्पिक खेळ होणार आहेत. त्याआधीच ही सेवा पूर्णत: सुरू झालेली असेल. (source :lokmat)

माझ्या प्रत्येक पदकामागे संघर्षाची कहाणी दडली आहे : मेरी कोम 
  • एम.सी मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धेतील पाचवे पदक तिच्यासाठी खूपच खास आहे. कारण एक वर्षानंतर तिने रिंगमध्ये दमदार पुनरागमन केलय. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्ण पटकावून मेरी कोमने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नवा इतिहास रचला.

  • या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक मिळवण्याचा पराक्रम तिने केला. या स्पर्धेतील यशानंतर तिने कारकिर्दीतील प्रत्येक पदक खास असल्याची प्रतिक्रिया दिली.

  • ऐतिहासिक विजयानंतर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेरी कोम म्हणाली की, आशियाई स्पर्धेत मिळालेले पदक खास आहे. आतापर्यंत कारकिर्दीत मिळवलेल्या पदकांसाठी संघर्ष करावा लागला आहे.

  • प्रत्येक पदकामागे संघर्षाची एक वेगळी कहाणी दडलेली आहे. शिवाय खासदार असताना मिळालेलं सुवर्ण पदक अधिक खास वाटते. यामुळे उंची अधिक वाढेल, असा विश्वासही मेरी कोमने व्यक्त केला.

  • बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला हतबल करणारी मेरी कोम राज्यसभा सदस्य आणि भारतीय बॉक्सिंग संघाचे परीक्षक म्हणून देखील सक्रिय आहे. याशिवाय मेरी कोम तीन मुलांची आई आहे. (source :loksatta)

रजनीकांत 12 डिसेंबरला राजकारणात प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता :
  • चेन्नई- अभिनेते कमल हासननंतर आता अभिनेते रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करू शकतात. रजनीकांत यांच्या जवळच्या काही सुत्रांच्या माहितीनुसार, ते येत्या 12 डिसेंबर रोजी राजकारणात येण्याबद्दलची घोषणा करू शकतात.

  • 12 डिसेंबर रोजी रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याच दिवशी ते त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दलचा खुलासा करण्याची शक्यता आहे. 

  • रजनीकांत स्वतःच्या वेगळ्या पक्षाची स्थापना करतील. ते भाजपा किंवा इतर कुठल्याही पक्षात सहभागी होणार नाहीत. जर भाजपा लोकसभा निवडणुकीच्या आधी रजनीकांत यांना सदस्य किंवा सहयोगीच्या रूपात त्यांच्या पक्षात सामाविष्ठ करून घेण्याचा प्रयत्न करणार असेल, तेव्हाही रजनीकांत त्यांची शक्ती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाचवून ठेवतील. (source :lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस 

  • जागतिक विज्ञान दिन

महत्वाच्या घटना

  • १६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

  • १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

  • १९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

  • १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

  • १९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

  • २००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

  • २००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.

जन्म दिवस

  • १८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)

  • १८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट१९२५)

  • १८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १८८२)

  • १९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर१९६१)

  • १९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)

  • १९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)

  • १९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

  • १९५२: सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन् यांचा जन्म.

  • १९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

मृत्यू

  • १६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

  • १९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)

  • १९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

  • १९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: १९ मे १८८१)

  • १९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८७२)

  • २००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)

  • २००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

  • २०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.