चालू घडामोडी - ०७ नोव्हेंबर २०१७

Date : 7 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग :
  • मुंबई- भारतामध्ये नोटाबंदीचा प्रयोग करुन उद्या 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पण नोटाबंदीचा असा निर्णय घेणारा भारत हा काही एकमेव देश नाही. जगातील अनेक देशांनी यापुर्वी असा निर्णय घेतलेला आहे.

  • पाकिस्तानने नव्या रुपातील नोटा चलनात आणण्यापुर्वी, जुन्या नोटा बदलण्यास दिड वर्षांचा अवधी लोकांना दिला होता.

  • ऑस्ट्रेलियाने प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.

  • झिम्बाब्वे- 100,000,000,000,000 हा आकडा तुम्ही वाचू शकता का? हा आकडा आहे 1 ट्रीलियन डॉलरचा. झिम्बाब्वेच्या बेसुमार चलनवाढीमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची नोट झिम्बाब्वेला चलनात आणावी लागली होती.

  • प्रमाणाबाहेर आयात आणि आयातीसाठी लागणारे पैसे यामुळे संपुर्ण देशाची स्थिती गेल्या काही वर्षांमध्ये बिघडून गेली होती. शेवटी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या ट्रीलियन डॉलरची किंमत अर्ध्या डॉलरपेक्षाही कमी झाली. 

आनंद बोरा यांना सेंच्युरी आशियातर्फे पारितोषिक :
  • वन्यजीवविषयक "सेंच्युरी आशिया" मासिकातर्फे नाशिकमधील वन्यजीव छायाचित्रकार आनंद बोरा यांना आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र गटातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

  • मुंबईमध्ये झालेल्या सोहळ्यात छत्तीसगड पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सिंग यांच्या हस्ते त्यांनी हे पारितोषिक स्वीकारले. रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, कॅमेरा बॅग, एक जंगल सफारी असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

  • "सेंच्युरी आशिया"चे प्रमुख बिट्टू सहगल, प्रसिद्ध छायाचित्रकार स्टीव विंटर, कल्याण वर्मा, गणेश शंकर, डॉ. आशिष अंधेरिया, नयन खानोलकर, डॉ. प्रवीष पांड्या, सुमीत सेन, शेखर दत्तात्रीय यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

  • बोरा यांचे पारितोषिक विजेते छायाचित्र मासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या श्रेणीत पारितोषिक मिळवणारे बोरा हे राज्यातील पहिले छायाचित्रकार ठरले आहेत.

वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स :
  • नोकियाने या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३, नोकिया ५ आणि नोकिया ६ हे तीन स्मार्टफोन लाँच केले होते. यानंतर हे तिन्ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी जून महिन्यात सादर करण्यात आले होते.

  • यातील नोकिया ५ हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या स्वरूपात १२,४९९ रूपयात सादर करण्यात आला होता. आता याचे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे व्हेरियंट १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.

  • यातील स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. मॅट ब्लॅक आणि टेंपर्ड ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायात हा स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. तर १४ नोव्हेंबरनंतर हा स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे.

  • नोकिया ५ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यात फेज डिटेक्शन, ऑटो-फोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

आता नोटाबंदी पार्ट-2 ची तयारी, 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी देणार नवा धक्का ?
  • नवी दिल्ली - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर भविष्य काळातील रणनीती कोणत्या प्रकारे असतील,याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला आराखडा सादर करू शकतात. दरम्यान, याचे सादरीकरण कोणत्या प्रकारे करण्यात यावे, याबाबत उच्च पातळीवर विचारविनिमय सुरू आहेत. 10 नोव्हेंबरपूर्वी सर्व केंद्रीय मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. 

  • विरोधकांकडून होणा-या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारनं नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विरोधकांनी या दिवशी देशभरात नोटाबंदी विरोधात निदर्शनं करण्याचं आवाहन केले आहे. 

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नोटाबंदीनंतर पुढील लक्ष्य बेनामी संपत्तीधारक आहेत आणि याविरोधात संपूर्ण देशभरात अभियान चालवण्यात येणार आहे.

  • बेनामी संपत्तीधारकांविरोधात कारवाई सुरू करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधातील लढाई कायम ठेवण्यात संकेत देऊ शकते.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.

  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

  • १९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्म दिवस

  • १८५८: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: २० मे१९३२)

  • १८६७: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९३४)

  • १८६८: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)

  • १८७९: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)

  • १८८४: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)

  • १८८८: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)

  • १९००: स्वातंत्र्यसैनिक, सं

मृत्यू

  • १५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)

  • १८६२: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)

  • १९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)

  • १९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

  • १९६३: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

  • १९८०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • १९८१: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)

  • १९९८: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

  • २०००: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१०)

  • २००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)

  • २००९: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९२६)

  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.