चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 डिसेंबर 2023

Date : 7 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय लष्कराच्या बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल, १ जानेवारीपासून नवीन धोरण होणार लागू
  • भारतीय लष्कराने बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल केला असून नवीन सर्वसमावेशक पदोन्नती धोरण तयार केलं आहे. याबाबतची नियमावली १ जानेवारी २०२४ पासून लागू केली जाणार आहे. नवीन पदोन्नती धोरण सैन्यदलाच्या सतत बदलत्या आवश्यकतांशी सुसंगत तयार केलं आहे. कर्नल आणि त्यावरील रँकच्या अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पदोन्नती धोरणाचा सर्वसमावेशक नियमावली अंतिम करण्यात आली आहे.
  • नवे धोरण अनेक अर्थांनी चांगलं आहे. लष्कराच्या अंतर्गत तसेच बाहेरही अनेक आव्हानं असतात. ही व्यवस्था सध्या अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आव्हानांना पेलण्याची क्षमता असलेलले योग्य नेतृत्व देण्यासाठी मदत करेल, असं भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
  • ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, नवीन धोरणात बढतीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेजर जनरल रँकमधील अधिकार्‍यांना पुढील पदोन्नतीच्या संधीही यातून प्रदान करण्यात आल्या आहेत. स्टाफमधून नियुक्त झालेले अधिकारी स्टाफमधील पुढील रँकवर बढतीसाठी पात्र असतील. नवीन धोरण पदोन्नती मंडळांमध्ये जवळजवळ समान नियमावली प्रदान करते.
  • सध्या भारतीय सैन्याचे एचआर व्यवस्थापन विविध धोरणे आणि तरतुदींद्वारे नियंत्रित केले जाते. जे विविध निवड मंडळांसाठी एकसमान नाहीत. हे नवीन धोरण सर्व निवड मंडळांच्या धोरणांमध्ये समानता आणते, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी (५ डिसेंबर) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणलं. आता या प्रोपल्शन माड्यूलचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पृथ्वी परिक्रमा करत हे मॉड्यूल पृथ्वीवर परतणर आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला होता. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. हे प्रोपल्शन माड्यूल त्याच चांद्रयान-३ चा एक भाग आहे.
  • इस्रोने २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. त्यानंतर या चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावर फिरून तिथल्या तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची बरीचशी माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. १४ दिवस चंद्रावर संशोधन केल्यानंतर इस्रोची ही मोहीम संपुष्टात आली. कारण हे चांद्रयान सौरऊर्जेवर काम करत असल्यामुळे आणि चंद्रावर रात्र झाल्याने (सूर्यप्रकाशाअभावी) इस्रोचं संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोने आणखी एक यश मिळवलं आहे. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.
  • चांद्रमोहिमेच्या उत्तरार्धातील या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती देताना इस्रोनं म्हटलं आहे की, “आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे.” चांद्रयान मोहीम फत्ते करून चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत आलं आहे. हे मॉड्यूल लवकरच पृथ्वीवर उतरेल. ही गोष्ट केवळ चांद्रयान मोहिमेपुरती मर्यादित नाही. कारण यामुळे आता कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता इस्रोने सिद्ध करण्याचा पहिला टप्पा इस्रोने पार केला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशाचं कौतुक केलं आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इस्रोची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, “इस्रोचं अभिनंदन! आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील आणखी एक तांत्रिक मैलाचा दगड आपण गाठला आहे. या ध्येयांमध्ये २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयाला पाठवण्याचं आपलं ध्येयदेखील समाविष्ट आहे.”
भारतासाठी २०११-२० दशक अतिवृष्टीचे आणि उष्ण!, हवामान बदलाचा फटका, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल
  • भारतासाठी २०११ ते २०२० हे दशक हवामान बदलामुळे भारतासाठी अतिवृष्टीचे (पुरांचे) किंवा उष्णतेचे ठरले. या काळात हवामान बदलाचा वेग चिंताजनकरित्या वाढला. त्यामुळे भारतासाठी सर्वात उष्ण दशकाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी-२८) मंगळवारी जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सादर केलेल्या ‘२०११ ते २०२० च्या दशकातील पर्यावरणीय स्थिती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (यूएन सीओपी २८) सादर झालेल्या २०२३ च्या अंतरिम वार्षिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे, की २०२३ची सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद होईल. हवामान, जागतिक तापमानवाढ आणि जलस्रोतांवर काम करणाऱ्या ‘डब्ल्यूएमओ’ने म्हटले आहे की, वायव्य भारत, पाकिस्तान, चीन आणि अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी हे ‘अतिपावसाचे दशक’ ठरले.
  • या अहवालात नमूद केले, की २०११ ते २०२० या दशकात आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत १९६१ ते १९९० च्या सरासरीपेक्षा तापमानापेक्षा सुमारे दुप्पट तापमान होते. २०११ ते २०२० या दशकात पडलेल्या दुष्काळांमुळे महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक आणि मानवी जीवनावर दुष्परिणाम घडले. भारतातच, २८ पैकी ११ राज्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे अन्न आणि पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
  • पाणी उपलब्धता आणि पुरवठय़ातील तफावतीमुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील हिमनद्या दरवर्षी सुमारे एक मीटरने वितळत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांच्या पाणीपुरवठय़ावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. २००१-२०१० च्या तुलनेत २०११-२०२० दरम्यान अंटाक्र्टिकच्या हिमाच्छादित भागातून ७५ टक्क्यांहून अधिक हिम वितळले आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन सखल किनारी प्रदेश-बेट आणि देशांचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात येईल.
राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश
  • राज्यातील वैशिष्टय़पूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. जालनाची  दगडी ज्वारी, धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यातून पाठवलेल्या १८ प्रस्तावांना भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू होते.
  • कास्तीची कोथिंबीर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. बासमती तांदूळ जसा असतो तसेच या कोथिंबिरीला वेगळा वास आहे. मुंबई, नागपूर या मोठय़ा शहरांसह अन्य देशातही कोथिंबीर निर्यातही करण्यात येते. 
  • बोरसुरी डाळ :  निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला डाळ असे संबोधले जात असले तरी या गावातील वरणात टाकल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 
  • पानचिंचोली चिंच : पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. या वेळी त्याची वैशिष्टय़े मांडण्यात आली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी या कामासाठी विशेष लक्ष घातले होते. येथील पातडी चिंच उत्पादक संघाच्या वतीने व बोरसुरी येथील तूर डाळ उत्पादक संघाने बोरसुरी तूर डाळ विशेष भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे या तीन वाणाला आता देशभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
  • कुंथलगिरीचा खवा :  धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो.  हा भाग डोंगराळ आणि कुरळय़ा केसाच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे. 
  • तुळजापूरची कवडी : तुळजापूरला येणारे भाविक कवडय़ांची माळ घालतात.  कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज हे गळय़ात कवडय़ांची माळ घालत. 
  • जालन्याची ज्वारी : ही ज्वारी टणक असून, पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्टय़पूर्ण आहे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुणे येथील गणेश हिंगमिरे जीआय नामांकन क्षेत्रात काम करतात.

 

तब्बल ३२२१ पुस्तकांचा वापर करत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा :
  • कडेगाव तालुक्यातील अमरापुरच्या अभिजित कदम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका कलाशिक्षकांने तब्बल साडेतीन हजार चौरस फुटामध्ये पुस्तकांचा वापर करीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनोखी कोलाज प्रतिमा साकारली.

  • या माध्यमातून बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करीत ग्रंथ हेच गुरु हा संदेश दिला आहे.

  • कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी सलग दोन दिवस ५२० विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन साडेतीन हजार चौरस फुटामध्ये ही कोलाज कलाकृती साकारली. यासाठी ३२२१ पुस्तकांचा वापर करण्यात आला. याद्वारे ग्रंथ हेच गुरु हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले :
  • आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा करण्यास मर्यादा असल्या तरी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत आम्ही हाताची घडी घालून बसणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेची कानउघाडणी केली. निर्णयाची योग्यता नव्हे, तर तो घेण्यात आल्याची प्रक्रिया तपासली जाऊ शकते, असेही न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

  • केंद्र सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्या. एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे वकील जयदीप गुप्ता युक्तिवाद करताना म्हणाले, ‘‘नोटाबंदीच्या निर्णयप्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. घटनाबाह्य नसलेल्या आर्थिक धोरणांची न्यायालयीन समीक्षा होऊ शकत नाही.

  • या धोरणांमधील आर्थिक मुद्दे हे तज्ज्ञांवर सोडले पाहिजेत.’’ यावर न्यायालय म्हणाले की, ‘‘निर्णयाच्या योग्यतेबाबत बोलायचे झाल्यास नागरिकांसाठी काय योग्य आहे, याचा विचार सरकारने करावा. मात्र हे करताना सर्व प्रक्रियेचे पालन झाले आहे की नाही, हे तपासले जाऊ शकते.’’

डॉ. आंबेडकरांच्या संघर्षांने लाखो लोकांना प्रेरणा - मोदी :
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली वाहिली. संसदेच्या संकुलात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  • डॉ. आंबेडकरांच्या संघर्षांने लाखो लोकांना आशा व प्रेरणा मिळाल्याचे मोदींनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले. त्यांनी म्हटले, की महापरिनिर्वाणदिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो व त्यांच्या देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. भारताला इतके व्यापक संविधान देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाही.

‘सिटी ऑफ जॉय’चे लेखक डॉमिनिक लापिएर यांचे निधन :
  • कोलकाता शहरानजीकच्या मुर्दाड वस्त्यांतील जगण्याच्या विविधांगी विरोधाभासाची कहाणी ‘सिटी ऑफ जॉय’मधून मांडणारे लेखक, भटके पत्रकार आणि सामाजिक दातृत्वाचा मोठा ठसा उमटविणारे फ्रेंच साहित्यिक डॉमिनिक लापिएर यांचे वृद्धापकालाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे २००८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  • ‘फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट’, ‘इज पॅरिस बर्निग’, ‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ ही सहलेखक म्हणून लिहिलेली त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. मात्र त्यांची जगभर ओळख झाली ती कोलकाता शहराला केंद्र करून येथील गरिबी, हलाखीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्तींवरच्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमुळे. या कादंबरीवर आधारलेल्या याच नावाच्या चित्रपटाचेही कौतुक झाले.

  • फ्रान्समध्ये जन्मलेले लापिएर तेराव्या वर्षी वडिलांसह अमेरिकेत गेले. अठराव्या वर्षी त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भटकण्याचा आणि लिहिण्याचा छंद त्यांना अमेरिकी वास्तव्यात लागला. पुढे फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्यांनी काही काळ लष्करी सेवा केली. लॅरी कॉलिन्स या अमेरिकी पत्रकार- लेखकासह त्यानी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले.

‘सिटी ऑफ जॉय’चे लेखक डॉमिनिक लापिएर यांचे निधन :
  • कोलकाता शहरानजीकच्या मुर्दाड वस्त्यांतील जगण्याच्या विविधांगी विरोधाभासाची कहाणी ‘सिटी ऑफ जॉय’मधून मांडणारे लेखक, भटके पत्रकार आणि सामाजिक दातृत्वाचा मोठा ठसा उमटविणारे फ्रेंच साहित्यिक डॉमिनिक लापिएर यांचे वृद्धापकालाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे २००८ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  • ‘फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट’, ‘इज पॅरिस बर्निग’, ‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ ही सहलेखक म्हणून लिहिलेली त्यांची पुस्तके प्रचंड गाजली. मात्र त्यांची जगभर ओळख झाली ती कोलकाता शहराला केंद्र करून येथील गरिबी, हलाखीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्तींवरच्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमुळे. या कादंबरीवर आधारलेल्या याच नावाच्या चित्रपटाचेही कौतुक झाले.

  • फ्रान्समध्ये जन्मलेले लापिएर तेराव्या वर्षी वडिलांसह अमेरिकेत गेले. अठराव्या वर्षी त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. भटकण्याचा आणि लिहिण्याचा छंद त्यांना अमेरिकी वास्तव्यात लागला. पुढे फ्रान्समध्ये परतल्यानंतर त्यांनी काही काळ लष्करी सेवा केली. लॅरी कॉलिन्स या अमेरिकी पत्रकार- लेखकासह त्यानी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले.

भारताला विजय अनिवार्य :
  • पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या आघाडीच्या फळीवर दडपण असून बुधवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. तसेच पहिला सामना गमावल्यामुळे भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

  • पहिल्या सामन्यात बांगलादेशने आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या गडय़ासाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी रचून विजय नोंदवला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला, पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांना बाद करताना त्यांना अडचणी आल्या. मात्र, गोलंदाजांमुळे भारताला किमान झुंज देता आली; परंतु भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. केएल राहुलचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले.

  • भारताने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरची द्विदेशीय मालिका खेळली होती. त्या वेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ अशी हार पत्करवी लागली होती. यंदाही पहिला सामना गमावल्यामुळे भारतीय संघावर दडपण आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचे फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यांनी दुसऱ्या सामन्यातही अशीच कामगिरी केल्यास भारताला पुनरागमन करणे अवघड होईल.

टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड :
  • टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक स्तरावर चर्चा सुरु आहे. अखेरीस आता बीसीसीआयने याबाबत निर्णय घेत राहुल द्रविडच्याच स्वीय सहकाऱ्याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. याबाबत बीसीसीआयने स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड केल्याचे समजत आहे. यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.

  • टीम इंडियाच्या सिनियर महिला संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षक पदी ऋषिकेश कानिटकर यांची निवड झाली आहे. येत्या ९ डिसेंबर पासून टीम इंडियाचा महिला संघ हा ऑस्ट्रेलियासह टी २० मालिका खेळणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेची पूर्वतयारी करताना बीसीसीआयने ऋषिकेश कानिटकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारताना कानिटकर यांनी हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हंटले आहे. भारताच्या महिला संघात अनेक गुणी व अष्टपैलू खेळाडू आहेत ही जबाबदारी निभावताना आपल्यालाही बरंच शिकायला मिळणार आहे असेही कानिटकर म्हणाले आहेत.

  • दरम्यान, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी रमेश पोवार यांची नेमणूक करण्यात आल्याची सुद्धा आज बीसीसीआयने घोषणा केली. यापूर्वी व्ही व्ही एस लक्ष्मण या पदी कार्यरत होते. लक्ष्मणने यंदा राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात प्रशिक्षक पद भूषवले होते.

०७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.