चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 जून 2023

Date : 5 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा! पदवी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट ‘या’ दिवशी लागणार
  • MSBSHSE HSC निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ जूनपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात प्रवेश अर्ज आपल्याला भरता येणार आहे. कोणत्याही अभ्यासक्रमासाठी किंवा महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची पूर्व- नोंदणी करणे बंधनकारक आहे, कारण हा नोंदणी क्रमांक मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आपणही अद्याप ही नोंदणी केली नसल्यास वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

पदवी प्रवेशाची मेरिट लिस्ट कधी लागणार? (Degree Admission Merit List Mumbai)

  • उद्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश वेळापत्रकात असेही म्हटले आहे की पहिली गुणवत्ता यादी १९ जूनपर्यंत जाहीर केली जाईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ जूनपर्यंत वेळ मिळेल. त्याचप्रमाणे, दुसरी गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर होईल आणि विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत त्यांची प्रवेश प्रक्रिया निश्चित करावी लागेल आणि तिसरी (अंतिम) गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर केली जाईल. त्याआधी इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश संबंधित महाविद्यालयात होतील.

पदवी प्रवेश वेळापत्रक (FY Bcom, FYBA, FYBSC Admission Timetable)

  • दरम्यान, काही महाविद्यालये पदवी प्रवेशासाठी स्वत: च्या प्रवेश परीक्षा घेतात. यंदाच्या प्रवेशासाठी मिठीबाई कॉलेज आणि एनएम कॉलेजद्वारे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) चाही विचार केला जात आहे. तर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झेवियर्स एंट्रन्स टेस्ट (XET) घेतली जाईल आणि सेल्फ-फायनान्सिंग प्रोग्रामसाठी आयोजित जय हिंद कॉमन ऑनलाइन प्रवेश परीक्षा १५ जून रोजी घेतली जाईल.
अकरावीच्या कोटा प्रवेशासाठी 8 जूनपासून नोंदणी
  • राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून कोटांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच केंद्रीय प्रवेशासाठी प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरणे गरजेचे आहे.
  • राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे आणि चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत प्रवेशासाठी ८ ते १२ जून या कालावधीत नोंदणी करावी लागेल. शून्य फेरी अंतर्गत १३ जून रोजी कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत प्रवेशासाठी विद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल.
  • विद्यालयांना १३ ते १५ या कालावधीत कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. तसेच १६ ते १८ जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी रिक्त जागांवर पुन्हा पसंतीक्रम नोंदवू शकतील.
  • ‘फेरी क्रमांक एक’ या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. येत्या २३ जून नंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार यांनी स्पष्ट केले. अधिक माहिती https://11thadmission.org.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री आज भारत भेटीवर
  • अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन हे रविवारपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी द्विपक्षीय सामरिक सहकार्य आणखी वाढवण्याच्या उपायांबाबत चर्चा करतील.
  • दोन आठवडय़ांनंतर मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यातील चर्चेनंतर केल्या जाणार असलेल्या अनेक नव्या संरक्षण सहकार्य प्रकल्पांबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्टिन हे चर्चा करतील, असे ऑस्टिन यांच्या दौऱ्याची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले.
  • हिंदू- प्रशांत क्षेत्रातील, तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चीनची आक्रमक वागणूक आणि दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्याचे मार्ग हे विषयही सिंह व ऑस्टिन यांच्यात सोमवारी होणाऱ्या चर्चेत असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अमेरिकेचे संरक्षणमंत्री दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर रविवारी सिंगापूरहून भारतात येऊन पोहचतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
भारतात ‘या’ ठिकाणी सुरू होणार आणखी तीन Apple स्टोअर्स, जाणून घ्या सविस्तर
  • एप्रिल महिन्यामध्ये Apple ने भारतामध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. Apple चे सीईओ टीम कुक यांनी या दोन्ही स्टोअर्सचे उदघाटन केले होते. Apple चे देशातील दुसरे रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. दरम्यान, १८ एप्रिल २०२३ मध्ये मुंबईतील बीकेसीमध्ये जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये Apple ने आपले रिटेल स्टोअर सुरू केले होते. देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबईत सुरु झाले आहे. आता Apple च्या स्टोअरबद्दल एक माहिती समोर आली आहे.
  • अ‍ॅपल कंपनी २०२७ पर्यंत भारतामध्ये आणखी ३ स्टोअर्स सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गचे अ‍ॅपलचे मुख्य वार्ताहर मार्क गुरमन यांनी याबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ”Apple २०२७ पर्यंत नवीन ५३ स्टोअर्सवर काम करत आहे. ज्यामध्ये चीन, जपान आणि कोरियामधील अनेक नवीन ठिकाणांचा समावेश आहे. तसेच भारतात तीन आणि मियामी, डेट्रॉईट, लंडन आणि जर्मनीमध्ये नवीन आउटलेट या ठिकाणांचा समावेश आहे.”
  • मार्क गुरमन यांच्या मते , नवीन ३ सुरू होणारी स्टोअर्स पहिल्या २ स्टोअर्सप्रमाणेच मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार आहेत. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील बोरिवलीमध्ये देशातील तिसरे Apple स्टोअर सुरू होऊ शकते. तसेच २०२७ मध्ये पाचवे स्टोअर हे वरळी येथे सुरू केले जाणार आहे. अ‍ॅपल टेक जायंटचे चौथे स्टोअर हे २०२६ मध्ये सुरू होणार आहे. जे राजधानी दिल्लीमधील DLF Promenade मॉलमध्ये आहे. हे भारतातील कंपनीचे सर्वात मोठे दुसरे रिटेल स्टोअर असू शकते.
  • Apple चे सीईओ टीम कुक यांनी भारतात Apple BKC आणि Apple Saket या भारतातील दोन रिटेल स्टोअर्सचे उदघाटन केले. या दोन्ही स्टोअर्सनी मिळून तब्बल ४४ ते ५० कोटींची मासिक विक्री केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे Apple आपल्या मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअरसाठी अनुक्रमे ४० आणि ४२ लाख रुपये इतके मासिक भाडे देत आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
ग्राहकांपर्यंत Damage Products पोहचू नये यासाठी Amazon ने लढवली शक्कल; प्रोडक्ट्स टेस्टिंगसाठी घेणार AI ची मदत
  • Amazon ही जगातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सपैकी एक आहे. आजकाल बहुसंख्य लोक या साइटवर विविध गोष्टी खरेदी करत आहेत. पण कधी कधी अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलेली वस्तूमध्ये दोष असल्याचे पाहायला मिळते. या Damage Products मुळे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने Artificial Intelligence ची मदत घ्यायचे ठरवले आहे. सध्या AI टेक सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी या तंत्राचा वापर करत आहेत. ही अशी एकूण पार्श्वभूमी असताना अ‍ॅमेझॉनने घेतलेल्या या निर्णयाने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सदोष गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचू नये यासाठी ही कंपनी त्यांच्या प्रत्येक वेअरहाऊसमध्ये टेस्टिंगसाठी AI टेकचा वापर करणार आहे,
  • सध्या अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊस, गोडाऊन्समध्ये ऑर्डर केलेल्या प्रोडक्ट्सची टेस्टिंग माणसांकडून करवून घेतली जात आहे. टेस्टिंग करताना अनेकदा वर्कलोड करताना Human Error येतो. अशा वेळी दोषयुक्त गोष्टी ग्राहकांकडे पोहचण्याची शक्यता असते. काही वेळेस पूर्णपणे खराब झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचते. माणसांकडून प्रोडक्ट्स चेक करवून घेणे एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी बराचसा वेळ देखील खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कंपनीने टेस्टिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचे ठरवले आहे.
  • India today ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन कंपनीने अमेरिका आणि युरोपमधील १० वेअरहाऊसमध्ये AI टेकचा सेटअप करायला सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये काम करणारे सॉफ्टवेअर मॅनेजर ख्रिस्तोफ श्वर्टफेगर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान माणसांपेक्षा ३ पट जास्त काम करतो. कमी वेळात या तंत्रामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण होते. AI ला काम शिकवण्यासाठी अ‍ॅमेझॉनने असंख्य फोटोग्राफ्सचा वापर केला आहे. त्यामध्ये सदोष आणि दोष नसलेल्या प्रोडक्ट्सचा समावेश होता. यातून AI ला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजवण्याचा कंपनीचा प्रयत्न केला होता.

AI सेटअप -

  • जेव्हा एखादी व्यक्ती एक वस्तू ऑर्डर करेल, तेव्हा त्या वस्तूचे पीकिंग आणि पॅकेजिंग यांच्या दरम्यान निरीक्षण केले जाईल. जेव्हा ग्राहक ठराविक प्रोडक्ट निवडतील तेव्हा ते प्रोडक्ट एका डब्ब्यामध्ये ठेवली जाईल. हा डब्बा इमेजिंग स्टेशनवरुन पुढे पाठवण्यात येईल. या दरम्यान त्यामध्ये दोष असल्यास AI त्याची माहिती देईल. पुढे सुपरवायजर म्हणून काम करणारी व्यक्ती पुन्हा ते प्रोडक्ट तपासेल. जर खरंच त्यात काही दोष असेल, तर ते प्रोडक्ट बाजूला ठेवले जाईल. त्याला दोषरहित प्रोडक्ट Replace करेल.

05 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.