चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 ऑगस्ट 2023

Date : 5 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुकेश कुमारने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करणारा ठरला भारताचा दुसरा खेळाडू
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना कॅरेबियन संघाने चार धावांनी जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावत १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला नऊ गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यात मुकेश कुमारने एक खास कारनामा केला आहे. तो हा पराक्रम भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. या सामन्यात मुकेश कुमार आणि तिलक वर्मा यांना पदार्पणाची कॅप मिळली. या सामन्यापूर्वी भारताची टी-२० कॅप मिळवून, वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने एक विक्रम केला, जो त्याच्या आधीच फक्त एका भारतीय क्रिकेटरच्या नावावर होता. आता तो दोघांच्या नावावर झाला आहे.
  • मुकेश कुमारने एकाच दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मुकेश हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी, हा कारनामा यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजनने केला होता. त्याने २०२०-२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्या टी-२० सामन्यात ३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा दिल्या.
  • सामन्याबद्दल बोलायचे, तर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
४९२ फूट लांब रस्सीवर चालला अन् मरीना टॉवर्सवर इतिहास रचला, तरुणाचा थरारक व्हिडीओ व्हायरल
  • एस्टोनियाचा स्लॅकलाईन अॅथलीट जान रुज यांनी असा कारनामा केला आहे, जे पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. रुजने त्याच्या भन्नाट कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ४९२ फूट लांब रस्सीवर चालून एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विक्रम रुज यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. कतार येथील लुसैल मरीनच्या टॉवर्सच्या दोन्ही बाजूला रस्सी बांधण्यात आली होती. सोसाट्याचा वारा सहन करून रुजने या लांब रस्सीवरून चालत पलीकडचं ठिकाण गाठलं. उंच इमारतींवरील हा थरारक व्हिडीओ रुजने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
  • व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हवा वेगाने सुरु असतानाही रुज त्याच्या शरीराचा तोल सांभाळत रस्सीवरून चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आजूबाजूला कोणत्याच प्रकारचा त्याला सपोर्ट मिळत नाही. तरीही खतरनाक स्टंट करून त्याने या क्रॉसिंगला पूर्ण करत जगातील सर्वात लांब सिंगल-बिल्डिंग स्लॅकलाईनचा विक्रम केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला असून यूजर्सने रुज यांना सुपरहीरोची उपमा दिली आहे.
  • काही यूजर्सने त्यांना ‘खतरोंके खिलाडी’ असंही म्हटलं आहे. काहींना तर हा व्हिडीओ अविश्वसनीयच वाटत आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा वेडेपणा असल्याचं प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटलं आहे. एका यूजरने म्हटलं, तम्ही माणूस नाही आहात. हे काहीसं यूएफओसारखं काम आहे मित्रा, रिस्पेक्ट. एका अन्य यूजरने म्हटलं, असं करण्याची काय आवश्यकता आहे. स्वत:चा जीव धोक्यात टाकणं ही मजेशीर गोष्ट आहे का?
मोदी सरकारच्या निर्णयामुळे भारतात ‘या’ कंपन्यांचे लॅपटॉप महागणार? खरेदीचा विचार करण्याआधी वाचा
  • केंद्र सरकारने गुरुवारी भारतात लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीवर तात्काळ निर्बंध घालण्यात येणार असल्याची घोषणा केली. या अचानक आलेल्या निर्णयामुळे भारतात मॅकबुक्स, मॅक मिनी, Lenovo, HP, Asus, Acer, Samsung व अन्य कंपन्यांना भारतात या उपकरणाची आयात ताबडतोब थांबवावी लागली आहे.
  • भारतात विकले जाणारे बहुतांश लॅपटॉप आणि पर्सनल कॉम्प्युटर हे चीनमध्ये तयार केले जातात किंवा असेंबल केले जातात आणि या नवीन नियमामुळे सरकार यापैकी काहींचे उत्पादन आणि असेंबलिंग भारतात सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वी अशा नियमांमुळे स्मार्टफोन उत्पादनात देशाने जे यश साध्य केले, त्याचप्रमाणे आता लॅपटॉपसाठी आयात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
  • दरम्यान संबंधित कंपन्यांनी भारतात लॅपटॉप आणण्यासाठी विशेष परवानगी घेईपर्यंत किंवा भारतात उत्पादन सुरु करण्याचा निर्णय होईपर्यंत आयात निर्बंधामुळे भारतात लॅपटॉप, संगणक, मॅकबुक आणि मॅक मिनीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अल्पावधीत आयात निर्बंधामुळे बाजारपेठेत टंचाई निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे साधी आकडेमोड पाहिल्यास मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किमतीत वाढ होऊ शकते.
  • इंडिया टुडेच्या माहितीनुसार, “एकूण लॅपटॉप/पीसी बाजारात दरवर्षी ८ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होतो तसेच सुमारे ६५ टक्के युनिट्स आयात केले जात आहेत. स्मार्टफोन आणि टीव्हीच्या बाबत भारताने जवळजवळ 100% स्थानिक उत्पादन साध्य करण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. परंतु IT व हार्डवेअर विभाग मागे पडला आहे, सध्या केवळ ३०- ३५% उत्पादने भारतात तयार केली जात आहेत. या निर्णयामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी मदत होऊ शकेल.
बिगूल वाजला! रेल्वे स्थानक चकाचक करणाऱ्या अमृत भारत योजनेत महाराष्ट्रातील १२८ स्थानके; ६ ऑगस्टला भूमिपूजन
  • रेल मंत्रालयाने देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून त्यात राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नागपूर रेल मंडळातील १५ स्थानके या योजनेत आली आहे.अमृत भारत म्हणून ही योजना देशात सुरू होत असून त्याचा कामाचा शुभारंभ ६ ऑगस्टला होत आहे.
  • खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.त्यास सविस्तर उत्तर देताना रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांनी योजनेची माहिती दिली.या अमृत योजनेत निवडण्यात आलेल्या स्थानकावर विविध सुविधा मिळणार आहे.
  • प्रतीक्षाकक्ष , शौचालये, स्थानिक उत्पादन विक्री सुविधा, मोफत वाय फाय, एक स्टेशन एक उत्पादन, परिसर सुशोभीकरण,वाहतूक सुधारणा आदी कामे होणार आहेत.तुलनेने लहान असलेली स्थानके विकसित केल्या जात आहेत.
  • वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट स्थानकास २३ कोटी रु, सेवाग्राम १९ , पुलगाव १७ तर धामणगाव स्थानकासाठी १९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
  • १७ जुलैला आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात सत्ताधारी पक्ष आंदोलनाला सामोरा गेला. आज त्याचा शेवट झाला, यापुढचं अधिवेशन ७ डिसेंबर २०२३ ला आपण महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांशी बोलून हा निर्णय घेतला आहे ही घोषणा अजित पवार यांनी केली.

अजित पवार आणखी काय म्हणाले?

  • या अधिवेशनात जेवढी बिलं सत्ताधारी पक्षाने आणली त्यातली जवळपास सर्व बिलं आम्ही मंजूर केली. माथाडी कामगारांच्या संदर्भातल्या बिलांबद्दल सगळ्यांची मतमतांतरं होती. असं जेव्हा होतं तेव्हा संयुक्त समितीकडे ते विधेयक पाठवलं जातं. आता आपण सुरेश खाडेंच्या नेतृत्वात एक समिती तयार केली आहे. माथाडी कामगारांविषयीच्या विधेयकासंदर्भात पुढच्या अधिवेशनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होती. काही सूचनांचा अंतर्भाव केला जाईल आणि ते बिल आणलं जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
  • शेतकऱ्यांसाठी खतं आणि बी बियाणं जे येतं आहे त्यात भेसळ वाढली आहे. यासंदर्भातल्या बऱ्याच तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आणि सरकारकडे आल्या. त्यानंतर आम्ही यासंदर्भात विधेयक आणायचा निर्णय घेतला. त्यातही चर्चा करणं गरजेचं होतं त्यामुळे ती बिलंही आपण संयुक्त समितीकडे पाठवलं आहे. धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत करण्यात आली आहे. शेतकरी वर्गाचं नुकसान होणार नाही याकडे आमचं लक्ष असेल. तसंच जे विधेयक आणू ते शेतकऱ्यांच्या हिताचं असेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. एकही दिवस हाऊस बंद न पडता दररोज भरपूर काम करण्यात आलं.
  • विरोधी पक्षांना काही भूमिका घ्यावी लागते ती त्यांनी घेतली. त्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. २२५ आमदारांचं बहुमत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहे. त्यात अपक्ष आमदारही आले. समोर संख्येने कमी बळ होतं. पण त्या संख्येलाही आम्ही महत्त्व दिलं आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, लक्षवेधींना, मुद्द्यांवर आम्ही उत्तरं दिली असंही अजित पवार यांनी जाहीर केलं.
यश अपयशातील अंतर केवळ ०.०१ सेकंद! विश्वविक्रम रचणाऱ्या ज्योतीचे हुकले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट
  • स्टार अ‍ॅथलीट ज्योती याराजीने शुक्रवारी येथे जागतिक युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेत १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकण्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. २३ वर्षीय याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत १२.७८ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीसह, तिने ऑक्टोबर २०२२ मध्ये नोंदवलेला १२.८२ सेकंदांचा आपला पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम सुधारला. 
  • स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया फोर्स्टरने १२.७२ सेकंदात सुवर्ण, तर चीनच्या यानी वूने १२.७६ सेकंदात रौप्यपदक जिंकले. आणखी एक राष्ट्रीय विक्रमी धावपटू अमलान बोरगोहेन यानेही पुरुषांच्या २०० मीटरमध्ये हंगामातील सर्वोत्तम वेळ २०.५५ सेकंदासह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने १२.७८ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पण, ०.०१ सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे (१२.७७ सेकंद) तिकीट हुकले. १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे.
  • दक्षिण आफ्रिकेच्या त्सेबो इसाडोर मात्सोसोने २०.३६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले तर जपानच्या युदाई निशीने २०.४६ सेकंदात दुसरे स्थान पटकावले. शुक्रवारी या दोन पदके जिंकत आता भारत आता ११ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पदकतालिकेत चीन अव्वल, त्यानंतर कोरिया आणि जपानचा क्रमांक लागतो.

ज्योती याराजीचा जीवनप्रवास

  • ज्योती याराजी यांचा जन्म २८ ऑगस्ट १९९९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. सूर्यनारायण असे त्याच्या वडिलांचे नाव असून ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ज्योतीची आई कुमारी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते, तसेच त्या लोकांच्या घरी धुणीभांडी धुवायचे देखील काम करतात.

ज्योती याराजीचे शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण

  • ज्योतीच्या कुटुंबाचे उत्पन्न सुमारे १८,००० रुपयांपेक्षा कमी होते. या पैशातून घराच्या गरजा आणि मुलांचे शिक्षण भागवायचे. पण ज्योतीने लहानपणापासूनच आपल्या ध्येयाच्या दिशेने शोध सुरू केला होता. ती विराजच्या पोर्ट हायस्कूल, कृष्णा येथे शिकत होती, जेव्हा तिच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी ज्योतीची प्रतिभा ओळखली आणि ती एक उत्तम अ‍ॅथलीट बनू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तिचे प्रशिक्षण सुरू झाले, आई-वडिलांनीही ज्योतीला साथ दिली. मात्र, ज्योतीनेही आपला अभ्यास सुरू ठेवला आणि आचार्य नागार्जुन विद्यापीठातून बीए इतिहासात पदवी पूर्ण केली.

 

न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार, एन. व्ही. रमणांकडून नावाची शिफारस :
  • देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार हे स्पष्ट झालं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट) देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी (४ ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली.

  • केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून ३ ऑगस्टला सरन्यायाधीशांच्या सचिवालयाला सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता. यानंतर प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस केली.

  • ए. व्ही. रमणा २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही ८ नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.

ठोस निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला न्यायालयाची तूर्त मनाई  :
  • आम्हीच मूळ शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला असला तरी, न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणताही ठोस निर्णय घेऊ नये, असा आदेश सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारच्या सुनावणीत दिला. त्यामुळे पुढील आठवडय़ात सोमवारी, ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपर्यंत उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

  • महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भातील अत्यंत गुंतागुंतीचे आणि कायद्याच्या सखोल विश्लेषणाची गरज असलेले मुद्दे आत्तापर्यंत झालेल्या सुनावण्यांमध्ये मांडले गेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायमूर्तीचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतही सोमवारच्या सुनावणीत निर्णय घेतला जाईल, असे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण शिंदे गट वा उद्धव ठाकरे गटाकडून घटनापीठाकडे सुपूर्द करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आलेली नाही. उलट, उद्धव गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी या प्रकरणावर तातडीने निकाल अपेक्षित असून घटनापीठाची गरज नाही, असा युक्तिवाद गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये केला.

  • विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर शिंदे गटाने सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या अनुषंगाने दोन्ही गटांनी दाखल केलेल्या एकंदर पाच याचिकांवर सरन्यायाधीशांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होत आहे.

  • सरन्यायाधीशांसमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये मूळ शिवसेना कोणाची आणि निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा हक्क असेल, या दोन मुद्दय़ांच्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोग निकाल देऊ शकतो का, यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला. त्यावर, केंद्रीय निवडणूक आयोगाला या विषयावरील सुनावणी घेण्यास न्यायालयाने अनुमती दिली असून दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेता येईल. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे निर्देश सरन्यायाधीशांनी आयोगाचे वकील अरिवद दातार यांना दिले.

पाकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारताच्या मीराबाईकडून मिळाली प्रेरणा :
  • इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये १८ पदके आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक दहा पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानदेखील भारताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचा वेटलिफ्टिंगपटू नूह दस्तगीर बट्टने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानसाठी पहिले पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे पदक जिंकल्यानंतर या पाकिस्तानी खेळाडूने भारतीय खेळाडूचे आभार मानले आहेत.

  • बटने पुरुषांच्या १०९ किलोपेक्षा जास्त वजनी गटात ४०५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या २४ वर्षीय खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये १७२ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये २३२ किलो असे एकूण ४०५ किलो वजन उचलून विक्रम केला आपल्या या कामगिरीसाठी दिग्गज भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूकडून प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. पदक जिंकल्यानंतर त्याने पीटीआयला सांगितले, “मीराबाई चानू माझे अभिनंदन केले. तिने माझ्या कामगिरीचे कौतुक केले, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.”

  • बट पुढे म्हणाला, “आम्ही मीराबाईकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहतो. दक्षिण आशियाई देशांतील खेळाडूही ऑलिंपिक पदकं जिंकू शकतात, हे तिने दाखवून दिले आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले तेव्हा आम्हा सर्वांना तिचा अभिमान वाटला.”

२०२८ च्या ऑलिम्पिकसाठी क्रिकेटचा प्रस्ताव विचाराधीन ; ‘आयओसी’कडून आढाव्यानंतर पुढील वर्षी निर्णय :
  • २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या समावेशाची शक्यता बळावली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) क्रिकेटसह नऊ क्रीडा प्रकारांच्या आढावा प्रक्रियेनंतर खेळाची स्थान निश्चिती होऊ शकेल.

  • याआधी फक्त १९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी ब्रिटन आणि यजमान फ्रान्स हे दोनच संघ सहभागी झाले होते. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची संयोजन समिती आणि ‘आयओसी’कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) क्रिकेट क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करण्यासाठी औपचारिक निमंत्रण पाठवण्यात आले आहे. क्रिकेट संदर्भातील अंतिम निर्णय मुंबईत २०२३च्या मध्यावर होणाऱ्या ‘आयओसी’च्या सत्रात जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • याव्यतिरिक्त बेसबॉल/ सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉसी, ब्रेक डािन्सग, कराटे, किक-बॉिक्सग, स्क्वॉश आणि मोटर स्पोर्ट्स अशा आठ क्रीडा प्रकारांचाही आढावा घेतला जाणार आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये एकूण २८ क्रीडा प्रकारांचा समावेश असेल, हे फेब्रुवारीत ‘आयओसी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. काही नव्या क्रीडा प्रकारांनाही यात समाविष्ट करण्याचे ‘आयओसी’चे धोरण आहे.

05 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.