आयपीएलच्या लिलावाची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळाडूंवर लावली जाणार बोली?
इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाचा (आयपीएल २०२४) लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, सर्व १० फ्रँचायझींना पाठवलेल्या संदेशात बीसीसीआयने असेही सांगितले की, कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम २६ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
आगामी हंगाम हे खेळाडूंसाठी तीन वर्षांच्या कराराचे तिसरे आणि अंतिम वर्ष असेल. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु हा विचार मागे घेतला होता. आयपीएलने शुक्रवारी जाहीर केले की २०२३ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स सोबत असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सोबत व्यवहार (ट्रेड) करण्यात आला आहे.
ज्या दिवशी लिलाव होईल, त्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुसरा वनडे खेळण्यात व्यस्त असेल. आयपीएल संघांना कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ असेल. सर्व १० आयपीएल संघांच्या पर्समध्ये १०० कोटी रुपये असतील, जे गेल्या हंगामापेक्षा ५ कोटी रुपये जास्त आहेत.
भारत-पाकिस्तान सेमीफायनल होणार? एका सामन्यात चित्र होईल स्पष्ट; वाचा काय आहे गणित!
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत मानला जात आहे. आत्तापर्यंत टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अपराजित राहिली आहे. ७ पैकी ७ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा ३००हून अधिक धावांनी पराभव करत भारतीय संघानं दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. गुणतालिकेनुसार दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उरलेल्या दोन जागांसाठी चुरस वाढली असून योग्य समीकरणं जुळली, तर भारत व पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
गुणतालिकेत सध्या कोण कितव्या स्थानी?
३ नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (८ गुण/३ सामने) तर न्यूझीलंड चौथ्या (८ गुण/२ सामने) स्थानी आहे. सेमी फायनलसाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी या दोन संघांना सर्वाधिक संधी आहे. मात्र, पुढच्या संघांचे उर्वरित सामने आणि नेट रनरेट यामुळे चुरस निर्माण होऊ शकते.
सध्या पाचव्या स्थानी पाकिस्तान (६ गुण/२ सामने) आहे. पाकिस्तानचे पुढचे सामने अनुक्रमे न्यूझीलंड व इंग्लंडशी होणार आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला आपलं स्थान निश्चित करायचं असेल, तर उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण भारत-पाकिस्तान सेमीफायनल होण्यासाठी एवढं पुरेसं आहे?
कोणता ‘आकडे’योग जुळून यावा लागेल?
भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने पाहायचे असतील, तर पाकिस्तानला फक्त दोन्ही सामने जिंकून फायदा नसून न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. आधी बॅटिंग केल्यास ८५ धावांनी किंवा धावांचा पाठलाग केल्यास १५ षटकं शिल्लक ठेवून, अर्थात ३५ षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण करून पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल. असं झाल्यास, न्यूझीलंडनं त्यांच्या शेवटच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला, तरी पाकिस्तान व न्यूझीलंडचे गुण सारखे होतील, पण नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान न्यूझीलंडच्या वर जाईल.
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंची पहिली मागणी पूर्ण
राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतलं आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे यांची पहिली मागणी पूर्ण केली आहे. या बाबतचा जीआर शुक्रवारी (३ नोव्हेंबर) मंजूर करण्यात आला. संबंधित जीआर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित नेते थोड्याच वेळात गॅलक्सी रुग्णालयात येणार आहेत.
याबाबतची अधिक माहिती देताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत कालही वृत्तवाहिन्यांवर बातम्या आल्या होत्या. त्यांना उलटी आणि इतर त्रास झाल्याचं समजलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मनोज जरांगेंशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. परवा दिवशी (२ ऑक्टोबर) मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर काल पहिला दिवस होता. उपोषण सुटल्यानंतर अवघ्या २४ तासांत मनोज जरांगेंची पहिली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे.”
“न्यायमूर्ती शिंदे समितीची कार्यकक्षा किंवा व्याप्ती वाढवावी, अशी पहिली मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मागणी राज्य सरकारने शुक्रवारी रात्री पूर्ण केली आहे. त्याचा जीआर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे त्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना देणार आहोत. पुढच्या काही वेळात संदीपान भुमरे आणि अतुल सावे रुग्णालयात येणार आहेत. हे सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. कुणबी नोंदी शोधून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तत्काळ कारवाई सुरू करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” अशी माहिती मंगेश चिवटे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे
तीन मजली मंदिर, प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, एकूण ३९२ खांब, ४४ दरवाजे.
तळमजला गर्भगृह – भगवान श्री रामाच्या बालस्वरूपाचे देवता (श्री रामलला), पहिल्या मजल्यावरील गर्भगृह श्री राम दरबार.
एकूण पाच मंडप – नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप.
खांब आणि भिंतींमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती.
पूर्वेकडून ३२ पायऱ्या (उंची १६.५ फूट) चढून सिंहद्वार येथून प्रवेश मिळेल.
अपंग लोक आणि वृद्ध लोकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची तरतूद.
चौफेर एक आयताकृती उद्यान (आकार) – लांबी ७३२ मीटर, रुंदी ४.२५ मीटर, उद्यानाच्या चार कोपऱ्यांवर चार मंदिरे, उद्यानाच्या दक्षिणेला भगवान सूर्य, शंकर, गणपती, देवी भगवती, हनुमान आणि अन्नपूर्णाचे मंदिर उत्तरेकडे माता.
मंदिराच्या दक्षिणेकडील ५ पौराणिक सीताकूप
परकोटाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे प्रस्तावित मंदिर.
ओम दक्षिण-पश्चिम भागात नवरत्न कुबेर माळावर वसलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्त जटायू राज यांच्या मूर्तीची स्थापना.
‘द वायर’वर पोलीस छाप्यांची पद्धत अयोग्य - एडिटर्स गिल्ड :
दिल्ली पोलिसांनी ‘द वायर’ या वृत्तलेख संकेतस्थळाचे (पोर्टल) कार्यालय आणि संपादकीय विभागावर टाकलेल्या छापे, ही चिंताजनक व अस्वस्थ करणारे आहे. तसेच पोलिसांनी ‘द वायर’च्या संपादकांच्या घरांवरही छापे टाकून तेथे घेतलेली झडती व जप्तीची पद्धत अनावश्यक असल्याचे ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संपादकांच्या संघटनेने नमूद केले. भाजप नेते अमित मालवीय यांनी ‘द वायर’विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती.
संघटनेतर्फे प्रसृत निवेदनात नमूद केले, की ज्या पद्धतीने पोलिसांनी अगदी घाईघाईत ‘द वायर’शी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले, ते चौकटीबाहेरचे व अयोग्य होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींची वस्तुनिष्ठ व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आवाहन करून संघटनेने म्हंटले आहे, की अशी कारवाई करताना लोकशाही मूल्यांचा अवमान करून दडपशाहीचे डावपेच खेळू नका.
‘गिल्ड’ने म्हटले आहे, की ‘द वायर’च्या निवेदनातील माहितीनुसार पोलिसांनी या संस्थेच्या पत्रकारांच्या घरातून व कार्यालयातून दूरध्वनी, संगणक, ‘आय पॅड’ जप्त केले. तसेच संबंधितांनी या जप्त केलेल्या उपकरणांचा तपशील देण्याची व ते परत देण्याची केलेली विनंती मान्य करण्यात आली नाही. तपास प्रक्रियेच्या नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे.
‘द वायर’चे वृत्त निषेधार्हच; तपास नियमानुसार करावा’ - ‘द वायर’ने ‘मेटा’ या समाजमाध्यम संस्थेशी संबंधित मालवीय यांचा संदर्भ असलेल्या वृत्तांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे मान्य केल्याचे नमूद करून ‘गिल्ड’ने या निवेदनात म्हटले आहे, की या त्रुटी या निषेधार्हच आहेत.
कर्मचाऱ्यांची भीती खरी ठरली! एलॉन मस्क यांच्याकडून नोकरकपातीला आजपासून सुरुवात होणार :
ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते. याबाबत नवी माहिती समोर येत आहे. कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्विटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, असं वृत्त ‘सीएनएन’नं दिलं आहे.
“ट्विटरला भक्कम स्थितीत आणण्यासाठी आम्ही नोकरकपातीच्या कठिण प्रक्रिेयेतून आज जात आहोत”, असा ईमेल कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. या प्रक्रियेदरम्यान कार्यालयं तात्पुरती बंद राहणार आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे बॅजही काही काळासाठी निलंबित करण्यात येणार आहे, असाही उल्लेख या ईमेलमध्ये आहे. कर्मचारी, ट्विटरच्या यंत्रणांसह ग्राहकांच्या मजकुराच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरमधून तीन हजार ७०० नोकऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे, असे वृत्त गुरुवारी ‘ब्लुमबर्ग’नं दिलं होतं. या कंपनीतून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा ‘सेवरन्स पे’ दिला जाऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. दरम्यान, कुठूनही काम करण्याची (Work from Anywhere) कंपनीची योजनाही बंद करण्याच्या तयारीत मस्क असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष! ; मुख्य आयुक्त राजीव कुमार यांचा दावा :
गुजरात निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेवरून काँग्रेसने आक्षेप घेतला असल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष असल्याचा दावा मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केला.
मोरबी पूल दुर्घटनेच्या मृतांच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींना बुधवारी राज्य सरकारकडून भरपाई देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. या कुटुंबांसाठी सरकारला आश्वासने देता यावीत, यासाठी गुजरात निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेला विलंब केला गेला, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. मात्र हा आक्षेप राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्णपणे फेटाळला.
‘क्रिकेट सामन्यात पराभूत झालेला संघ तिसऱ्या पंचाला दोष देतो. निवडणूक आयोगाकडे तिसरा पंचही नाही. आम्ही पूर्णपणे निष्पक्ष प्रक्रिया राबवतो. ही प्रक्रिया निष्पक्ष नसल्याची तक्रार कोणी केली तर तक्रारीसंदर्भात तातडीने कारवाई केली जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा निवडणूक मतदान यंत्रांवर आक्षेप घेतात, मतदान होईपर्यंत अशा आक्षेपांची शेकडो पत्रे आयोगाला पाठवली जातात. पण मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर आक्षेप घेणारा राजकीय पक्ष जिंकतो, तेव्हा मात्र आक्षेप बंद होतात. ‘आक्षेपार्ह’ निवडणूक मतदार यंत्रेच त्यांना जिंकून देतात, असा युक्तिवाद राजीव कुमार यांनी केला.
बिगुल वाजले! ; गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला मतदान :
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. राज्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्येही ८ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर, ९३ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार असून, ५१ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३४ हजार केंद्रे ग्रामीण भागांमध्ये असतील. विद्यमान विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपुष्टात येत असून, ११० दिवस आधी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे ५ आणि १० नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अनुक्रमे १४ आणि १७ नोव्हेंबर असेल. १७ आणि २१ नोव्हेंबपर्यंत अर्ज मागे घेता येतील.