चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० नोव्हेंबर २०२०

Date : 30 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद; ‘हे’ आहे कारण :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचे उद्घाटन करण्यात आलं. केवडियामध्ये त्यांनी सीप्लेन सेवेसाठी वॉटर एरोडोमचं लोकार्पण केलं. सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक ३ येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आलं होतं. सरदार सरोवराजवळची सीप्लेन सेवा स्पाइस जेटची ‘स्पाइस शटल’ ही कंपनी चालवत आहे. परंतु सध्या काही कारणास्तव ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.

  • “मालदीवरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आलं होतं. त्यामुळेच २७ नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचं बुकींग घेण्यात आलं नव्हतं,” अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.

  • आतापर्यंत ८०० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दररोज दोन सीप्लेन उड्डाणांचं संचालन करण्यात येतं. या योजनेअंतर्गत एका मार्गाचं भाडं १ हजार ५०० रूपयांपासून सुरू होतं. तसंच ३० ऑक्टोबर २०२० पासून या सेवेसाठी बुकींग सुरू करण्यात आलं होतं. एका मार्गाचा प्रवास हा ३० मिनिटांचा आहे. स्पाईस जेटनं यासाठी मालदीवकडून एक सीप्लेन विकत घेतलं आहे. यामध्ये एकावेळी १२ प्रवासी प्रवास करू शकतात.

‘आयसर पुणे’च्या संशोधनाला आयजीइएम स्पर्धेत सुवर्णपदक :
  • हिवताप निदान आणि निर्मूलनासंदर्भातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) विद्यार्थ्यांनी के लेले संशोधन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे. आंतररराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशिन (आयजीइएम) स्पर्धेतील पदवीपूर्व गटात आयसर पुणेच्या संघाने ही कामगिरी केली.

  • आजच्या जगातील प्रश्न सोडवण्यासाठीच्या दृष्टीने सिंथेटिक बायोलॉजीचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर मशिन (आयजीइएम) हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग दिला जातो. जगभरातील २५० संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत आयसर पुणेतील पदवीपूर्व स्तरावरील चिन्मय पटवर्धन, अब्दुल रिशाद, अक्षय कुन्नाविल, अलीना जोस, अनंता एस. राव, अँथोनी किरण डेविड, अवधूत जाधव, गुणवंत पाटील, जतीन बेदी, मेरीन विन्सेंट, मिसाल बेदी, रुपल गेहलोत, शैलेश चिन्नराज या १४ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.

  • आयसर पुणेच्या संघाने या स्पर्धेत हिवतापासंदर्भातील संशोधनामध्ये हिवतापाच्या निदानासाठी कार्यक्षम आणि स्वस्त निदान संच विकसित के ला. सॉफ्टवेअरवर आधारित निदान संचाची अचूकता ९५.४५ टक्के आहे. तसेच हिवताप निर्मूलनासाठी तोंडावाटे देण्यासाठीच्या प्रथिन साखळीचा शोध आयसर पुणेच्या युवा संशोधकांनी लावला आहे.

HIV पॉझिटिव्ह व्यक्तीने शरीरसंबंध ठेवणं हत्येचा प्रयत्न ठरत नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय :
  • एड्सचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या सहमतीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात दोषी ठरवता येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिली आहे.

  • दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, “लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपी एड्सचा रुग्ण असल्यास निर्णय देताना या गोष्टीचा विचार करणं महत्वाचं असतं. मात्र त्यासाठी त्याला भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार दोषी ठरवता येणार नाही,” असं मत व्यक्त केलं.

  • दिल्ली उच्च न्यायालयामध्ये स्वत:च्या सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एड्सचा रुग्ण असणाऱ्या आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची न्यायमूर्ती विभू बाखरु यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. यामध्ये आरोपीला हत्येच्या गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र बलात्काराच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. बलात्काराच्या आरोपात कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

शासकीय प्रथमश्रेणीची नोकरी मिळण्यात अन्याय :
  • पात्रता असतानाही खेळाडूंसाठी असलेल्या कोटय़ातून प्रथमश्रेणीच्या शासकीय सेवेत सामावून घेण्यात येत नसल्याने नाराज असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. आपल्यापेक्षा कमी कामगिरी केलेल्या आणि नंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना थेट प्रथम श्रेणीच्या शासकीय सेवेत सामावून घेतल्याची तक्रोरही कविताने के ली आहे.

  • राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्यावरील अन्यायाची माहिती निवेदनाव्दारे दिली. आपण अनुसूचित जमातीतील असून अनेक वेळा भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रकुल, आशिया क्रीडा स्पर्धा तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन पदक मिळविले आहे.

  • २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. शासनाचे अनेक पुरस्कारप्राप्त आहेत. शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. २०१४ मध्ये थेट शासकीय सेवेत प्रथमश्रेणीची नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला होता. शासनाच्या निर्णयानुसार आपण शासकीय सेवेत थेट वर्ग एकच्या पदासाठी पात्र आहोत. परंतु नंतर अर्ज केलेल्या खेळांडूची नियुक्ती प्रथमश्रेणीमध्ये करण्यात आल्याचे निदर्शनास आले असल्याचे कविताने निवेदनात नमूद केले आहे.

  • कमी स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळांडूना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेत्रदीपक कामगिरी के लेली असताना आपल्यावर हा अन्याय का? माझ्याप्रमाणेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंवर शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठी अन्याय होत आहे. आदिवासी भागातील खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

३० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.