चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मार्च २०२१

Date : 30 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
८५ टक्के रुग्ण आठ राज्यांत :
  • महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाबसह देशातील आठ राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ झाली आहे. एका दिवसात नोंदवण्यात आलेल्या करोनाच्या ६८,०२० नव्या रुग्णांपैकी या राज्यातील रुग्णांचे प्रमाण ८४.५ टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. याच वेळी, देशातील लसीकरणाची संख्या ६ कोटींपलीकडे पोहोचली आहे.

  • महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त, म्हणजे ४०४१४ इतकी होती. याखालोखाल कर्नाटकात ३०८२, पंजाबमध्ये २८७०, मध्य प्रदेशात २२७६, गुजरातमध्ये २२७०, केरळमध्ये २२१६, तमिळनाडूत २१९४ आणि छत्तीसगडमध्ये २१५३ नव्या प्रकरणांची नोंद झाली.

  • देशातील सध्या करोनाबाधित असलेल्यांंची संख्या ५,२१,८०८ झाली असून ती एकूण संख्येपैकी ४.३३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांमध्ये एकाच दिवसात ३५,४९८ प्रकरणांची वाढ नोंदवली गेली. सध्याच्या करोनाबाधितांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांत मिळून ८०.१७ टक्के रुग्ण आहेत, अशीही माहिती मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक, हरियाणा व राजस्थान या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होेत आहे. दरम्यान, देशात ९,९२,४८३ सत्रांमध्ये लशीच्या ६ कोटी ५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

हॅमिल्टनला जेतेपद :
  • विश्वविजेत्या लुइस हॅमिल्टनने रविवारी मॅक्स व्हेस्र्टापेनला मागे टाकत यंदाच्या हंगामातील पहिल्या बहारिन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. हॅमिल्टनच्या कारकीर्दीतील हे ९६वे फॉर्म्युला-वन जेतेपद आहे.

  • ५६पैकी ५३व्या फेरीत व्हेस्र्टापेनने हॅमिल्टनला मागे टाकले. परंतु ही आघाडी तो टिकवू शकला नाही आणि एका वळणावर तो टॅ्रकमर्यादेच्या बाहेर गेला. त्यामुळे वेळेच्या दंडाची जोखीम टाळण्यासाठी संघाच्या सूचनेमुळे व्हेस्र्टापेनने पिछाडी पत्करली. उत्तरार्धात व्हेस्र्टापेनने हॅमिल्टनला गाठण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण ०.७४५ सेकंदांच्या फरकाने व्हेस्र्टापेनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्या शर्यतीनंतर हॅमिल्टनच्या खात्यावर २५ गुण आणि व्हेस्र्टापेनच्या खात्यावर १८ गुण जमा झाले आहेत.

  • व्हेस्र्टापेनला पिछाडीवर ठेवणे अशक्यप्राय वाटत होते. तो मला गाठणार याची खात्री होती. परंतु मला आव्हाने आवडतात. कारकीर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक शर्यत होती.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार हा असू शकतो कोविड – १९ चा स्रोत :
  • कोविड -१९ च्या उत्पत्ती विषयी डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी संयुक्तपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार त्यांनी असे म्हटले आहे की हा विषाणू वटवाघूळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱ्या प्राण्यामार्फत संक्रमित होण्याची परिस्थिती बहुधा जास्त आहे. प्रयोगशाळेतून या विषाणूचा प्रसार होण्याची संभावना नाही. असोसिएटेड प्रेस यांना मिळालेल्या अहवालाच्या एका प्रतीनुसार ही माहीती मिळाली आहे.

  • हे निष्कर्ष मोठ्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणे होते व त्यामुळे बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. या संघाने विषाणूचे प्रयोगशाळेतून गळतीचे गृहीतक वगळता इतर प्रत्येक क्षेत्रात पुढील संशोधन प्रस्तावित केले आहे.

  • या अहवालाच्या प्रकाशनास वारंवार विलंब झाला आहे. चीनवरील करोनायरसमुळे महामारी पसरवण्याचा आरोप टाळण्यासाठी चीनी पक्ष अहवालामध्ये काही फेरफार करून वेगळे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करीत होता की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्राण्यांपासूनच मानवाला करोनाची लागण :
  • कोविड १९ विषाणू हा वटवाघळातून मानवात एका मध्यस्थ यजमान प्राण्याच्या मार्फत पसरला, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात केला असून त्याची कच्ची प्रत ‘दी असोसिएटेड प्रेस’ला मिळाली आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेचे जे पथक चीनला गेले होते त्याला चीनने पुरेशी माहिती मिळू  दिली नाही हे खरे असले तरी जी माहिती थोड्याफार प्रमाणात हाती आली आहे त्यानुसार हा विषाणू मानव व वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काढलेला हा निष्कर्ष अजिबात धक्कादायक नाही, पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला हा मुद्दा सोडून सर्व निष्कर्षांवर आणखी संशोधनाची गरज जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने व्यक्त केली.

  • एपी वृत्तसंस्थेला जागतिक आरोग्य संघटनेचा अंतिम स्वरूपातील अहवाल मिळाला असून त्यानुसार हा विषाणू वटवाघळातून एखाद्या मध्यस्थ प्राण्यातून मानवात आला. पण या अहवालात नंतर चीनच्या दबावाखाली बदलही करून घेतले जाऊ शकतात. मध्यस्थ प्राण्यामार्फत संक्रमण हा सगळ्यात पहिला टप्पा असून वटवाघळातून थेट मानवात प्रसार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  • शीत साखळी म्हणजे अन्नपदार्थातून या विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता नाही. करोना ज्या विषाणूमुळे होतो त्याच्या अगदी जवळ जाणारा विषाणू वटवाघळात सापडला असून हीच वटवाघळे करोना विषाणूचे वहन करीत असतात. वटवाघळातील विषाणू व करोना विषाणू यांच्यातील कालिक अंतर हे काही दशकांचे असू शकते पण त्यातील दुवा ओळखता आलेला नाही, म्हणजे कुठल्या मध्यस्थ प्राण्यामार्फत वटवाघळातील विषाणू वेगळ्या स्वरूपात मानवात आलेला आहे हे समजलेले नाही.

भारतीय सैन्याने नेपाळ सैन्याला १ लाख कोविड -१९ प्रतिबंधक लसी दान केल्या :
  • द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी दोन शेजारी राष्ट्रांच्या सैन्यदलाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने नेपाळ लष्कराला भारत-निर्मित कोविड -१९ विरोधी लसाींचे एक लाख डोस भेट म्हणून दिले आहेत.

  • भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळ सैन्य दलाच्या सैनिकांना या लसी दिल्या, असे भारतीय दूतावासाने ट्विट केले.

  • नेपाळच्या आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांच्या तत्काळ आवश्यकतेसाठी भारताने यापूर्वी ‘मेड इन इंडिया’ कोविड – १९ प्रतिबंधक दहा दशलक्ष लसी नेपाळला भेट दिल्या आहेत. दरम्यान, चीनने सोमवारी नेपाळला ८ लाख अँटी-कोविड -१९ लसींचे दान केले, अशी माहिती येथील मीडियाच्या वृत्तानुसार देण्यात आली.

३० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.