चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जुलै २०२०

Date : 30 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Covid Unlock 3 - मॉल्स, व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली :
  • मुंबई/नवी दिल्ली : टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा १ ऑगस्टपासून सुरू होणार असून, त्यासाठी केंद्रासह राज्याने बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यात मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रवासाबाबत मात्र संदिग्धता आहे.

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. यापूर्वी दुकाने, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता मॉल्स किं वा व्यापारी संकु लांमधील फक्त दुकाने उघडण्यास ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. मॉलमधील उपाहारगृहे, चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील. मॉलमधील उपाहारगृहांमधून फक्त घरपोच सेवा देता येईल.

  • सरकारी कार्यालयांमध्ये एकूण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के  किं वा १५ कर्मचारी तर खासगी आस्थापनांमध्ये एकू ण क्षमतेच्या १० टक्के  किं वा दहा कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती कायम असेल. रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे.

शिक्षणाचा नवा अध्याय :
  • नवी दिल्ली : तब्बल ३४ वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून दहावी आणि बारावी या बोर्डाचे महत्त्व आता कमी होणार आहे. शालेय शिक्षणाची रचना १० + २ ऐवजी ५+३ +३ +४ अशी झाली आहे. आता सहावीनंतर व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल; तर ५ वी पर्यंत मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य असेल.

  • दोन्ही शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.

  • शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार असून २१ व्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या मंत्रालयाचे नावही बदलण्यात आले असून ते आता ‘शिक्षण मंत्रालय’  झाले आहे.

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागतम् :
  • बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचे अखेर भारतामध्ये लँडिंग झाले आहे. अंबाला एअर बेसवर ही विमाने बुधवारी दुपारी सुरक्षित उतरली. बऱ्याच काळापासून या विमानांची चर्चा होती. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ कैकपटीने वाढले आहे. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा टि्वट केले आहे. मोदींनी राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे.

राष्ट्ररक्षासमं पुण्यं,

राष्ट्ररक्षासमं व्रतम्,

राष्ट्ररक्षासमं यज्ञो,

दृष्टो नैव च नैव च।।

नभः स्पृशं दीप्तम्

स्वागतम्!

आता १२ वीपर्यंत मोफत शिक्षण, आरटीई योजना ८ वी नव्हे तर १२ वीपर्यंत :
  • केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे. याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत व्यापक रूप देण्यात आलं आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना आता १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.

  • शिक्षणाच्या अधिकाराच्या (आरटीई) कायद्यात सर्व शाळांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी नवीन धोरण ठरविण्यात आलं आहे. हे विद्यमान १०+२ मॉडेलऐवजी ५ + ३ + ३ + ४ मॉडेलवर आधारीत असेल. तसंच यामध्ये ३ ते ८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रारंभिक शिक्षणाच्या पूर्वीच्या गटात, ८ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रारंभिक शिक्षणाच्या गटात, ११ ते १४ वर्षांचे विद्यार्थी मध्यम शालेय शिक्षणाच्या गटात आणि १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांचा माध्यमिक शिक्षण गटात समावेश करण्यात येणार आहे.

  • नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा अधिकार या कायद्याला व्यापक रुप देण्यात आलं आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणण्यात येणार आहे. तसंच आता कला, संगीत, शिल्प, खेळ, योग, समाज सेवा या विषयांना अभ्रासक्रमातच सामिल करण्यात येणार आहे. तसंच त्यांना को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून म्हटलं जाणार नाही, असा बदल नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा - आनंदचा सातवा पराभव :
  • चेन्नई : पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. आनंदचा आठव्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून ०-५-२-५ पराभव झाला.

  • आनंदला लिरेनविरुद्धच्या लढतीत पहिल्याच डावात अवघ्या २२ चालींमध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरा डाव दोघांनी ४७ चालींत बरोबरीत सोडवला. तिसऱ्या डावात मात्र पुन्हा एकदा आनंदला ४१ चालींत पराभव मान्य करावा लागला. आनंदला आता लिरेन आणि पीटर लेको यांच्यासमवेत सहा गुणांसह अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. आनंदने सातव्या फेरीत सोमवारी बोरिस गेलफंडला नमवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता. मात्र ती लय आठव्या फेरीत आनंदला राखता आली नाही.

  • नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने आर्मेगेडॉन पद्धतीद्वारे रशियाच्या इयान नेपोमनियाचीचा पराभव केला. उभय खेळाडूंमधील लढतीतील चारही डाव २-२ बरोबरीत संपल्याने टायब्रेकर खेळवण्यात आला. त्यात कार्लसनने बाजी मारली. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळत असल्याने कार्लसनला तीन गुणांची कमाई करता आली. कार्लसनने एकूण २२ गुणांसह अग्रस्थान राखले आहे. कार्लसनने आतापर्यंत आठही लढती जिंकल्या आहेत. नेपोमनियाचीने १९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

३० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.