चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० एप्रिल २०२०

Date : 30 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील रुग्णसंख्या १० हजारांच्या जवळ : 
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होईल.

  • लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. तसंच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल १० देशांत : 
  • २०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अव्वल १० देशांत स्थान मिळवणे नक्कीच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली. या ध्येयाच्या दिशेने शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • ‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. गेल्या काही वर्षांत भारताला अनेक युवा आणि कौशल्यवान क्रीडापटू गवसले असून २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपण नक्कीच अव्वल १० देशांत स्थान मिळवू शकतो, असे मला वाटते. त्यादृष्टीने क्रीडा खात्यासह शासनानेही आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत,’’ असे रिजिजू म्हणाले.

  • ‘‘२०२८च्या ऑलिम्पिकसाठी अद्याप आमच्याकडे आठ वर्षांचा कालावधी असल्याने खेळाडूंच्या शोधमोहिमेची अंतिम रुपरेषा कशी असावी, याविषयी आम्ही सध्या चर्चा करत आहोत. त्याचप्रमाणे २०२१च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे तयारी करत आहेत, याकडेही आमचे लक्ष आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

४ मे पासून देशात लागू होणार नव्या गाइडलाइन्स; काही जिल्ह्यांना सुट मिळण्याची शक्यता : 
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होईल. दरम्यान, लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली.

  • केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली, तसंच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • “केंद्रीय गृहमंत्रालयानं लॉकडाउन संदर्भातील आढावा घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. देशात लॉकडाउन राबवल्यामुळे परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या सुधारलेल्या परिस्थितीवर कोणाताही परिणाम होऊ नये यासाठी ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स जारी केल्या जातील. तसंच जिल्ह्यांमधील परिस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी सुट दिली जाईल. येत्या दिवसांमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात येईल,” अशा आशयाचं ट्विट केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

एनएसडीच्या दहा कालातीत व्यक्तीमत्वांपैकी एक होता ‘इरफान’ :
  • दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडी या प्रतिष्ठीत संस्थेतून अभिनयाचे धडे घेऊन बाहेर पडलेल्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलेल्या आघाडीच्या १० कलाकारांच्या यादीत इरफान खानचं नाव घेतलं जातं.

  • भारतीय चित्रपटसृष्टीला माइलस्टोन चित्रपट देणारे ओम पुरी, नसरुद्दीन शहा, पंकज कपूर, राज बब्बर, अनुपम खेर, विपिन शर्मा, अशुतोष राणा, शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी या दहा एनएसडीच्या विद्यार्थ्यांसोबत आणि निवडक कालातीत अभिनेत्यांबरोबर इरफान खानचं नाव घेतलं जात.

  • राजस्थानमधील जयपूरमध्ये एका पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफान खानने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील स्वतःला सिद्ध केलं. जयपूरमध्ये एमए करीत असताना इऱफानला एनएसडीची स्कॉरलशीप मिळाली. मात्र, यासाठी रंगभूमीवरील कामाचा अनुभव आवश्यक होता. इरफान इथं मुलाखतीदरम्यान खोटं सांगितलं की, त्याला थिएटरचा अनुभव आहे. त्यानंतर त्याला रितसर एनएसडीत प्रवेश मिळाला आणि शेवटच्या वर्षात ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात संधीही मिळाली. मात्र, यात त्याचा बराच रोल कापण्यात आला. 

नविद अंतुले यांचे निधन :
  • माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकारणापासून अलिप्त असलेल्या नविद यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. मात्र राजकीय वाटचालीसाठी त्यांनी काँग्रेसऐवजी शिवसेनेची निवड केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

  • लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गीते यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे ते तरुण पिढीत लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाने म्हसळा आणि आंबेत परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

मजुरांचा मार्ग मोकळा : 
  • टाळेबंदीचा दुसरा टप्पा संपण्यासाठी चार दिवस उरले असताना केंद्र सरकारने बुधवारी आंतरराज्यीय प्रवासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार परराज्यांत अडकलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटकांना आपापल्या राज्यांत जाण्याची मुभा केंद्राने दिली. करोनाची लक्षणे नसलेल्यांनाच ही मुभा देण्यात आली असून, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आदेशपत्र पाठवले.

  • महाराष्ट्रासह विविध राज्यांत अडकलेल्या परराज्यांतील मजुरांच्या प्रश्न टाळेबंदीपासूनच चर्चेत आहे. टाळेबंदीमुळे मूळ गावी निघालेले लाखो मजूर अनेक राज्यांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात अडकून पडले. बस, रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्यात आल्याने अन्यत्र शिकत असलेले विद्यार्थी, यात्रेकरू यांनाही घरी परतणे अशक्य झाले.

  • संबंधित राज्यांतील प्रशासनाने स्थलांतरित मजुरांच्या जेवणाची सोय केली तरी, गावी परत जाण्यासाठी सुविधा पुरण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे या मजुरांसह परराज्यांत अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी द्यावी आणि त्यांच्या प्रवासाची सोय करावी, अशी मागणी राज्यांनी केंद्राकडे केली होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या मजुरांना घरी का जाऊ दिले जात नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राकडे केली होती.

करोना विषाणूवर संशोधनासाठी चीनला अमेरिकेकडून निधी : 
  • मानवामध्ये करोना विषाणूचा प्रसार वटवाघळांमधून कशा प्रकारे होतो याचा सहा वर्षांत अभ्यास करण्यासाठी वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेस (वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी) अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅलर्जी अँड इनफेक्शियस डिसिजेस या संस्थेने ३७ लाख डॉलर्सचा निधी दिला होता, असे वृत्त अमेरिकेतील न्यूजवीक या नियतकालिकाने दिले आहे.

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनीच त्या संस्थेचे प्रमुख या नात्याने या संशोधनासाठी निधी  देण्यास मंजुरी दिली होती.  संकरातून वेगळे विषाणू तयार करून त्यांचा मानवावर काय परिणाम होतो याची तपासणीही या प्रयोगात करण्यात येत होती, पण चुकून यात तयार करण्यात आलेला संकरित करोना विषाणू बाहेर पडल्याने जगभरात लाखो बळी गेले असून त्याच्यावर उपचार सापडवणे कठीण जात आहे अशीही आता चर्चा आहे. या प्रकल्पाला अमेरिकेने पैसे दिले असल्याने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच हे संशोधन सुरू होते.

  • अमेरिकी गुप्तचरांनी म्हटल्यानुसार करोना विषाणूची साथ हा नैसर्गिक प्रकार असल्याचे आधी सांगितले गेले होते, विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडल्याचा संशय गेल्या महिन्यात व्यक्त करण्यात आला होता.

देशातील महाविद्यालयं कधी सुरू होणार? युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक : 
  • देशातील महाविद्यालयं उघडण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने दिली आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे.

  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. अशात आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयं सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडेल अशी माहिती दिली आहे. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.

  • UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.

३० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.