गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यातील १५० पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले होते. अखेर मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा ( increment ) चा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.
तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांची शासन मान्यताप्राप्त प्रमुख संघटना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या निर्णयांवर समाधान व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे.
कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल.
मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो.
डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिलीय.
त्यामुळे शक्तीकांत दास पुढील आणखी ३ वर्षे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतील. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला.
शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा हाच ३ वर्षांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे.
मात्र, या फेरनिुयक्तीने ते डिसेंबर २०२४ पर्यंत या पदावर काम करतील. त्यांनी अर्थविभाग, कर प्रणाली, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील NEET पदवी परीक्षांचे निकाल खोळंबले होते. उच्च न्यायालयाने NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही पूर्ण परीक्षाच पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे आधीची परीक्षा दिलेल्या एकूण १६ लाख विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप होण्याची शक्यता होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज उच्च न्यायालयाचा हा निर्णय स्थगित करत नीटच्या पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या सर्व १६ लाख विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तसेच, हा निर्णय देण्याचं कारण देखील न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
“आम्ही यासंदर्भात नोटीस बजावू. तसेच, उच्च न्यायालयाचा निर्णय देखील स्थगित करत आहोत. तुम्ही (NTA) निकाल जाहीर करा.
आजघडीला देशात एकूण १६ लाख विद्यार्थी या निकालांची आतुरतेनं वाट पाहात आहे. त्या दोन विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, ते आम्ही बघू”, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. एन. राव, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं.
राष्ट्रीय प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची बुधवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. या यादीत अॅथलेटिक्समधील ओ. पी. जैशा आणि कबड्डीमधील विकास कुमार यांचाही समावेश आहे.
ध्यानचंद पुरस्कारासाठी नऊ जणांची, तर द्रोणाचार्य पुरस्कार जीवनगौरव स्वरूपाचा नऊ जणांना आणि नियमित स्वरूपाचा आठ जणांना देण्यात येईल.
’ ध्यानचंद पुरस्कार (जीवनगौरव) : ओ. पी. जैशा (अॅीथलेटिक्स), दिव्या सिंग (बास्केटबॉल), के. सी. लेखा (बॉक्सिंग), अभिजित कुंटे (बुद्धिबळ), दविंदर सिंग गर्चा (हॉकी), विकास कुमार (कबड्डी), नीर बहादूर गुरुंग (पॅरा-अॅटथलेटिक्स), पी. एस. अब्दुल रसाक (व्हॉलीबॉल), सज्जन सिंग (कुस्ती)
’ द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) : जय प्रकाश नौटियाल (पॅरा-नेमबाजी), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅाथलेटिक्स), प्रीतम सिवाच (हॉकी), राधाकृष्णन नायर (अॅकथलेटिक्स), संदीप सांगवान (हॉकी), संध्या गुरुंग (बॉक्सिंग), सुजित मान (कुस्ती) आणि सुब्रमण्यम रमन (टेबल टेनिस).
’ द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : अशन कुमार (कबड्डी), भास्करचंद्र भट (हॉकी), सी. आर. कुमार (हॉकी), जगरूप राठी (कुस्ती), एस. मुरलीधरन (बॅडमिंटन), सरकार तलवार (क्रिकेट), सरपाल सिंग (हॉकी), तपन कुमार पाणीग्रही (जलतरण), टी. पी. ओसेफ (अॅचथलेटिक्स).
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.