चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ मार्च २०२१

Date : 29 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा :
  • देशभरात अलीकडे करोना संसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने ब्रिटन आणि दक्षिण अफ्रि के तून येणारी उड्डाणे थांबवावी, अशी सुमारे दोनतृतीयांश लोकांची इच्छा आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय समाजवर्तुळाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून सुमारे ४३ टक्के लोकांनी करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण देशातील २४४ जिल्ह्यांमधील आठ हजार ८०० नागरिकांकडून आलेल्या प्रतिसादावर आधारित आहे.

  • गेल्यावर्षीपासून वंदे भारत मिशनअंतर्गत आणि जुलैपासून निवडक देशांसोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्थेअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात दक्षिण अफ्रि का, ब्रिटनमध्ये आढळणारे करोनाचे विविध प्रकार सापडत आहेत.

  • दररोज ६० हजार नवे बाधित नोंदवलेजात आहेत. यावर्षी १२ फे ब्रुवारीला १२ हजार रुग्ण होते आणि ४५ दिवसात दररोजच्या प्रकरणातील ही पाचपट वाढ आहे. इंग्लंडमध्ये आढळणारा करोनाचा प्रकार ७० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. तर दक्षिण अफ्रि के त आढळलेला करोनाचा प्रकार ३० च्यावर देशांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर काही निर्बंध घालण्यात यावे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

भारत-बांगलादेश शांततेसाठी आग्रही :
  • भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे; अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थता नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. पंतप्रधान मोदी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलत होते.

  • पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोपालगंज ओराकांडी येथील मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मतुआ समुदायाचे आध्यात्मिक गुरू हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थानी हे मंदिर आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वत:च्या विकासाबरोबरच जगाची प्रगती हवी आहे. दोन्ही देशांना जगात शांतता, स्थैर्य, प्रेम हवे आहे, तर अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थतेवर मात करायची आहे, असे मोदी म्हणाले.

  • आपण २०१५ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती, तेव्हाच ओराकांडी येथे भेट देण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते जमले नाही. या वेळी तेथील मंदिरास भेट देऊन प्रार्थना करण्याची आपण वाटच बघत होतो, असे मोदी म्हणाले. भारतीय मटुआ समुदायाच्या मनात ओराकांडीत आल्यानंतर ज्या भावना आहेत, त्या माझ्याही मनात आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.

  • ओराकांडी हे हिंदू मटुआ समुदायाचे श्रद्धास्थान आहे. त्या संदर्भात मोदी म्हणाले, की ओराकांडी येथे भारत मुलींसाठी एक माध्यमिक आणि एक प्राथमिक शाळा सुरू करील. याच ठिकाणी हरिचंद ठाकूर यांनी आध्यात्मिक संदेश दिला होता. करोना महासाथीच्या काळात भारत आणि बांगलादेश यांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या. दोन्ही देश या साथीचा एकत्रित मुकाबला करीत आहेत. भारतात तयार झालेल्या लशीच्या मात्रा बांगलादेशला देण्यात आल्या आहेत.

मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात १० जण ठार झाले असून मोदी मायदेशी परतल्यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक झाले. हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

  • बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला   विरोध झाला.

चार कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार :
  • भारतात सध्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची संख्या ४ कोटी आहे. ही वाहने प्रदूषणवाढीस कारणीभूत आहेत. त्या वाहनांवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. १५ वर्षांहून अधिक जुनी वाहने कर्नाटक मध्ये सर्वात जास्त आहेत. तर दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

  • या माहितीनुसार ४ कोटीमधील २ कोटी वाहने २० वर्षांहून अधिक जुनी आहेत. त्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवण्यात आला आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक जुनी वाहने कर्नाटकमध्ये असून त्यांची संख्या ७० लाख आहे. कर्नाटकपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ५६.५४ लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी २४.५५ लाख वाहने २० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत.

  • नवी दिल्लीत ३५ .११ लाख वाहने जुनी आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये ३४.६४ लाख, पंजाबमध्ये २५.३८ लाख, तामिळनाडूमध्ये ३३.४३ लाख, पश्चिम बंगालमध्ये २२.६९ लाख जुनी वाहने आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि हरियाणात अशा वाहनांची संख्या १२ ते लाख आहे.

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवला आहे. राज्य सरकार त्यावर विचार करून तो प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवतील. त्यानंतर ग्रीन टॅक्स लावण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

शार्दुलला ‘मॅन ऑफ द मॅच’ न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का; म्हणाला :
  • पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका खिशात घातली. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषतः शादुर्ल ठाकूरने केलेल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही केली. त्यामुळे शार्दुलला ‘मॅन द मॅच’ मिळण्याची शक्यता होती. मात्र, सॅम करनला ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळाल्याने कर्णधार विराट कोहलीनं आश्चर्य व्यक्त केलं.

  • इंग्लंडकडून खेळताना सॅम करनने नाबाद ९५ धावांची खेळी केली. त्यामुळे सॅम करनला मॅन ऑफ द मॅच आणि तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत २१९ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर यावर बोलताना कर्णधार विराट कोहलीनं यावर आश्चर्य व्यक्त केलं.

  • “शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिजसाठी निवड करण्यात आली नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय. अनुकूल परिस्थिती नसतानाही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली,” असं कोहली म्हणाला.

सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह काही नियमातही बदल :
  • आयपीएल-२०२१ (इंडियन प्रीमियर लीग) हंगाम सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह शॉट रन आणि नोबॉलबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल-२०२१ मधून सॉफ्ट सिग्नल कमी केल्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही. जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो तिसरे पंचच घेतील. याबरोबर शॉर्ट रन व नोबॉलचा अंतिम निर्णयही तिसऱ्या पंचाचा राहील.

  • मैदानावरील पंचांना एखादा निर्णय देण्यात अडचण येते त्यावेळी ते तिसऱ्या  पंचांची मदत घेतात. आता मदत घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो, त्यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हणतात. हा सिग्नल खेळाडू बाद किंवा नाबादचा असतो. पुढे पडताळणीनंतर जर तिसरे पंचही आपल्या निर्णयाबद्दल १०० टक्के खात्रीशीर नसतील किंवा त्यांना खेळाडू बाद किंवा नाबाद असल्याचा ठोस पुरावा मिळत नसेल तेव्हा मैदानावरील पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच अंतिम निर्णय असतो. अशावेळी मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.

  • १८ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या ट्वेंन्टी -२०  सामन्यादरम्यान भारताला सॉफ्ट सिग्नलमुळे फटका बसला होता. सामना भारताने जिंकला असला तरी सॉफ्ट सिग्नलमुळे वाद निर्माण झाले होते आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलमध्येही वाद निर्माण होऊ  नये यासाठी सॉफ्ट सिग्नल तरी वापरण्यात येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

२९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.