चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जुलै २०२०

Date : 29 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
१९१९ ला रॉयल एअर फोर्सचा तळ ते २०२० ला ‘राफेल’चं स्वागत - जाणून घ्या अंबाला एअरबेसबद्दल :
  • भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून सोमवारी म्हणजेच २७ जुलै रोजी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने आज म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. ही विमाने ज्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरणार आहेत ते भारतीय हवाई दलाच्या सर्वात जुन्या एअरबेसपैकी एक आहे. हाच एअरबेस राफेल विमानांचा देशातील मुख्य तळ असणार आहे. 

  • फ्रान्सच्या समुद्रकिनारी असणाऱ्या बोर्डीऑक्स शहरातील मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन उड्डाण केलेली ही विमाने जवळजवळ सात हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या विमानांमध्ये एरियल री-फ्युएलिंग म्हणजेच हवेमध्येच इंधन भरण्यात आलं आहे. यासंदर्भातील काही फोटो भारतीय हवाई दलाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत.

  • या विमानांनी संयुक्त अरब अमिरातीमधील अल दफरा विमानतळावर एक नियोजित हॉल्ट घेतला आहे. आज ही विमाने सकाळी ११ च्या सुमारास या विमानतळावरुन उड्डाण करतील आणि दुपारी दोन पर्यंत अंबाल एअरबेसवर लॅण्डिंग करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

अ‍ॅपवर बंदी, चीनचा परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध :
  • ‘वुई चॅट’ या चीनच्या अ‍ॅपवर भारताने बंदी घातल्यानंतर चीनने त्याबाबत भारताकडे राजनैतिक स्तरावर निषेध नोंदविला असून भारताने आपली चूक सुधारावी, असे म्हटले आहे. भारतातील चीनच्या दूतावासाने  परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदविला असल्याचे सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

  • ‘वुई चॅट’ हे अ‍ॅप टेन्सण्ट होल्डिंग या इंटरनेट सेवेतील कंपनीने विकसित केले असून ते भारतात वास्तव्य करणाऱ्या, काम करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या चीनच्या नागरिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे चीनमधील भारतीय नागरिकही त्याचा वापर करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक भारतीय उद्योगही त्याचा वापर करीत आहेत.

  • भारताने २९ जून रोजी चीनच्या ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली त्यामध्ये वुई चॅटचाही समावेश आहे. सोमवारी भारताने चीनशी संबंधित आणखी ४७ अ‍ॅप्सवर बंदी घातली.

विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैलाच बोलावण्याची मंत्रिमंडळाची शिफारस :
  • राजस्थान विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैलाच बोलावण्यावर राज्य सरकार ठाम असून पुन्हा सुधारित प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. राजस्थान मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यात विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैलाच घेण्याची शिफारस करण्याचे ठरले होते.

  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाली. त्यानंतर सुधारित प्रस्ताव राजभवनला मंगळवारी पाठवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. विश्वासदर्शक ठराव मांडणार की नाही हे या सुधारित प्रस्तावात नमूद केलेले नाही.

  • राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारच्या आधीच्या प्रस्तावावर ज्या सूचना केल्या होत्या त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठी २१ दिवसांची सूचना देणे आवश्यक आहे, असे मत  राज्यपालांनी व्यक्त केले होते. त्यावर राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंह यांनी सांगितले की, राज्यपालांनी जे तीन मुद्दे उपस्थित केले होते त्यावर विचार करण्यात आला.

एकदा करोना झाल्यानंतर पुन्हा होत नसल्याचा वैज्ञानिकांचा दावा :
  • एकदा करोना झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर अजूनही ठामपणे देता आले नसले तरी वैज्ञानिकांच्या मते एकदा करोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही.

  • आरोग्य तज्ञांच्या मते करोनाचा विषाणू परत शरीरात घुसला तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी काही प्रमाणात प्रतिबंधात्मक शक्ती शरीरात तयार झालेली असते. पण हे संरक्षण किती काळ मिळते हे अजून स्पष्ट झालेले नाही. वैज्ञानिकांच्या मते काही व्यक्ती अशा आहेत ज्यांचा करोना बरा झाल्यानंतर त्यांची चाचणी परत सकारात्मक आली आहे, पण अशा व्यक्तींमध्ये आधीच्याच विषाणू संसर्गातील काही अवशेष शरीरात असू शकतात. त्यामुळे त्यांची चाचणी सकारात्मक येते.

  • अनेकदा चाचण्या चुकीच्या सकारात्मक येतात. पुन्हा सकारात्मक चाचणी आल्यानंतर त्या व्यक्तीपासून करोनाचा प्रसार झालेल दिसून आला नाही. अशाच प्रकारच्या विषाणूंमध्ये व्यक्ती पहिल्या संसर्गानंतर तीन महिने ते वर्षभराने पुन्हा आजारी पडू शकतात. करोनाबाबतही तसेच घडते का हे अजून स्पष्ट झालेले नाही.

विराट-रोहित अव्वल स्थानावर कायम :
  • भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. मंगळवारी आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट ८७१ गुणांसह पहिल्या तर रोहित ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

  • गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दरम्यान ३० जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

  • भारतात २०२३ साली होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा - अखेर आनंदला सूर गवसला :
  • पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने सहा लढतींच्या पराभवाची मालिका अखेर खंडित केली. भारताच्या आनंदने सातव्या फेरीत इस्रायलच्या बोरिस गेलफं डचा २.५-०.५ असा पाडाव करत लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत पहिला विजय मिळवला.

  • सलगच्या सहा पराभवानंतर आपल्या प्रदीर्घ काळापासूनच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळताना आनंदने सुरुवातीच्या आघाडीसह पहिला डाव जिंकला. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने ४५ चालीत गेलफं डला निरुत्तर केले. त्यानंतर दुसरा डाव ४९ चालीत जिंकत आनंदने आघाडी घेतली. तिसऱ्या डावात ४६ चालीत दोघांनीही बरोबरी मान्य के ल्याने आनंदला हा सामना जिंकता आला.

  • ‘‘पहिले काही दिवस माझ्यासाठी निराशाजनक होते, पण आता विजय मिळवल्याचा आनंद होत आहे,’’ असे आनंदने सांगितले. या विजयासह आनंदने सहा गुणांनिशी आठव्या क्रमांकावर मजल मारली आहे. आता आठव्या फे रीत आनंदचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे. लिरेन तीन गुणांसह १०व्या क्रमांकावर आहे. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने पीटर स्विडलरचा २.५-१.५ असा सहज पराभव करत सर्वाधिक २० गुणांनिशी अग्रस्थान भक्कम केले आहे.

२९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.