चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०२१

Date : 28 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर करोनाचं सावट; विमानसेवा बंद होण्याची शक्यता :
  • करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले.

  • जगातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका प्रवासावर बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार हाय अलर्टवर गेले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही धोक्यात येताना दिसत आहे. 

  • टीम इंडियाला १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच, भारताचा अ संघ सीनियर संघापूर्वीच तिथे गेला आहे. जिथे त्यांना चार दिवसांत तीन सराव सामने खेळायचे आहेत. सीनियर संघात निवडलेल्या अनेक खेळाडूंना भारत अ संघात स्थान मिळाले आहे.

इंडोनेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा - सिंधू उपांत्य फेरीत गारद :
  • भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूला सलग तिसऱ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला माजी विश्वविजेत्या थायलंडच्या रॅटचॅनोक इन्टानॉनने पराभूत केले. पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचेही आव्हान संपुष्टात आले.

  • तिसऱ्या मानांकित सिंधूचा महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित इन्टानॉनने २१-१५, ९-२१, १४-२१ असा पराभव केला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने झुंज दिली, पण इन्टानॉनने तिच्यापेक्षा दर्जेदार खेळ करत विजयाची नोंद केली. तिला मागील आठवडय़ात इंडोनेशिया मास्टर्स आणि त्याआधी फ्रेंच स्पर्धेतही उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले होते.

  • जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूकडे सामन्याच्या सुरुवातीला ८-३ अशी आघाडी होती. अखेर तिने पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा खेळ खालावला. इन्टानॉनने हा गेम २१-९ असा जिंकत सामन्यात बरोबरी केली.

  • तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही इन्टानॉनने दमदार खेळ सुरु ठेवत मध्यंतराला ११-६ अशी भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इन्टानॉनने हा गेम २१-१४ असा जिंकत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, सात्त्विक-चिरागला उपांत्य फेरीत केव्हिन सुकोमुल्जो आणि मार्कस जिडीऑन या अग्रमानांकित जोडीने १६-२१, १८-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

देशभर सतर्कता! ; ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधानांचे निर्देश :
  • करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले.

  • देशातील करोना परिस्थिती आणि लसीकरणाची सद्य:स्थिती याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या फैलावाबद्दल दिलेल्या इशाऱ्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

  • पंतप्रधानांनी नव्या विषाणूच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  

  • भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारीच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक येत्या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते. परंतु दक्षिण ऑफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळल्याने जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. बेल्जियम, जर्मनी, इस्रायलपाठोपाठ ब्रिटनमध्येही नव्या विषाणूचे रुग्ण आढळल्याने युरोपीय देशांनी शुक्रवारीच विमान वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक १५ डिसेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना हवाई वाहतूक मंत्रालयाला केली.

“ओमिक्रॉन भारतासाठी गंभीर इशारा”, WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या :
  • करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे.

  • एनडीटीव्हीशी बोलताना स्वामीनाथन यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे. मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • स्वामीनाथन म्हणाल्या, “ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही बारीत लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे, गरजेचे आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते.”

एसटी संपाला हिंसक वळण ; एकाच दिवसांत ३ हजार कर्मचारी निलंबित :
  • विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने तसेच राज्यात काही भागांत सुरू होत असलेल्या एसटी आणि महामंडळाने कारवाईत केलेली वाढ याला काही भागांतून विरोधही वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवारी ११ हून अधिक एसटी गाडय़ांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात चालक, वाहकही जखमी झाले आहेत.

  • दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून शनिवारी ३ हजार १० कर्मचारी निलंबित केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

  • राज्यातील विविध आगारांतून सुटणाऱ्या एसटी गाडय़ांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे; परंतु आगारातून सुटताच काही अंतरावर जाताच एसटीवर दगडफेक केली जात आहे.

२८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.