चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०२०

Date : 28 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देश मंदीच्या छायेत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मायनसमध्ये
  • करोनाचं संकट, लॉकडाउन या सगळ्यामुळे आपला देश मंदीच्या छायेत आहे हे स्पष्ट होताना दिसतं आहे. कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर उमे २३.९ टक्के इतका नोंदवला गेला झाली होती. आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली. मागील चाळीस वर्षात पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे.

  • पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी उणे २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर आता दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के घसरण झाली आहे. या आकडेवारीमुळे देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत हे स्पष्ट होतं आहे. दोन तिमाहीमध्ये जीडीपी म्हणजेच विकासदर हा उणे राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.

  • बांधकामासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ५० टक्के तर उत्पादन क्षेत्रात ४० टक्के घसरण झाी आहे. ही दोन क्षेत्र भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात.कोणत्याही अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी वस्तूंना असलेल्या मागणीचा आणि खरेदीचा मोठा वाटा असतो. या काळात ६० टक्के घसरण झाली कमी झालेलं उत्पन्न, अनेकांचे रोजगार गेल्याने वाढलेलं बेरोजगारीचं प्रमाण यामुळे लोकांनी खर्च कमी केले आणि उद्योगांनी गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं. करोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक लहान उद्योग कोलमडून पडले त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.

व्हाइट हाउस सोडण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार, पण ठेवली ‘ही’ अट :
  • अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाउस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक अट ठेवलीये. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं महत्त्वाचं विधान ट्रम्प यांनी केलं आहे.

  • निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी , जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी निश्चितपणे व्हाईट हाऊस सोडेन असं म्हटलं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असंही ट्रम्प म्हणाले.

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

  • दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ डिसेंबरपर्यंत कायम, ठाकरे सरकारचा निर्णय :
  • करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे. करोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून करोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

  • खरंतर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाउन लागू करायचा असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. यासंदर्भातली सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारीच दिली होती. केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. करोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

२८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.