चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मार्च २०२१

Date : 26 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर :
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर  ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

  • आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली

  • या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

  • ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन के०.ले

पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; उद्या प्राचीन मंदिराला देणार भेट : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना झाले. जगभरामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांनी मागील ४९७ दिवसांपासून एकही परदेश दौरा केला नव्हता. यापूर्वी मोदींनी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझीलचा दौरा केला होता. मागील वर्षी मोदींनी जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या आणि महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली.

  • बांगलादेशने गुरुवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाय दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान नवी दिल्ली आणि ढाका दरम्यान किमान पाच सहमती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण जयंती समारंभामध्ये सहभागी होणार आहे. तसेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ते आज सहभागी होणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मार्चच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रतिनिधिकांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी सामंजस्य करारांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण किमान पाच करारांवर स्वाक्षऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केलाय.

शेतकऱ्यांचा आज भारत बंद : 
  • केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंद पुकारल्याने देशातील काही भागांमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे काही भागांमधील बाजारपेठा बंद राहण्याचीही शक्यता आहे.

  • तथापि, विधानसभा असलेली चार राज्ये आणि पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे बंद पाळण्यात येणार नाही. देशव्यापी बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुकारण्यात येणार आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले.

  • संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना आणि वाहतूक व अन्य संघटनांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे, असेही राजेवाल म्हणाले. शेतकरी विविध ठिकाणी रेल्वे वाहतूक रोखणार असल्याचे ते म्हणाले.

देशभरात आणखी ५३,४७६ करोनाबाधितांची नोंद : 
  • गेल्या दोन दिवसांत देशातील करोनाबाधितांची संख्या १ लाखाने वाढली. गेल्या २४ तासांत ५३,४७६ नव्या बाधितांची नोंद झाली. या वर्षात आतापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ असून, देशातील बाधितांची एकूण संख्या एक कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

  • करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात झालेली ही १५३ दिवसांतील सर्वाधिक वाढ आहे. गेल्या २४ तासांत २५१ जण मृत्युमुखी पडल्यामुळे करोनामृत्यूंची संख्या वाढून १ लाख ६० हजार ६९२ इतकी झाली आहे.

  • यापूर्वी गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी २४ तासांच्या कालावधीत नव्या करोनाबाधितांची संख्या ५४,३६६ इतकी नोंदवली गेली होती.

  • करोनातून बरे झालेल्यांची संख्या एक कोटी १२ लाख ३१ हजार ६५० झाली असून, मृत्यू दर १.३६ टक्के इतका कमी झाला आहे.  गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील ९५, पंजाबमध्ये ३९, छत्तीसगडमधील २९, तमिळनाडू व कर्नाटकातील प्रत्येकी १२, तर केरळमधील १० जणांचा मृत्यू झाला आहेत.

भारतीय महिलांचे सुवर्णयश : 
  • राही सरनोबत, चिंकी यादव आणि मनू भाकर यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात बुधवारी निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर याच तिघींनी गुरुवारी सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या कामगिरीनंतर भारताने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांनिशी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे.

  • सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने पोलंडचा १७-७ असा धुव्वा उडवला. डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर झालेल्या या अंतिम लढतीत पोलंडच्या जोआनो इवोना वावरझोनोवस्का, ज्युलिटा बोरेक आणि अग्निस्झा कोरेजवो यांना कामगिरी उंचावता आली नाही.

  • त्याआधी अंजूम मुदगिल, श्रेया सक्सेना आणि गायत्री नित्यनादम यांच्या भारतीय महिला संघाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाला अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारताने ४३ गुण मिळवले. त्याउलट अनेता स्टॅनकिविझ, अलेक्झांड्रा झुटको आणि नतालिया कोचान्स्का यांच्या पोलंड संघाने ४७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. इंडोनेशियाच्या संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.

२६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.