चीनमधील झिंजियांग प्रांतात शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती अमेरिकेच्या यूएसजीएसकडून देण्यात आली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी होती. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे.
भूकंपाचे धक्के झिंजिंयाग क्षेत्रातील यूतियानन क्षेत्रानजीक जाणवले असल्याची माहिती चीनच्या माध्यमांकडून देण्यात आली. भूकंपाचे केंद्रस्थान १० किलोमीटर खोलावर होते. दरम्यान, युतियान हे क्षेत्र भारताच्या जवळ असलं तर भूकंपाच्या धक्क्यांचा भारतावर कोणताही परिणाम जाणवला नाही.
यापूर्वी मॅक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७ पेक्षाही अधिक होती. या भूकंपात ५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आतापर्यंत मॅक्सिको आणि आसपासच्या परिसरात त्सुनामीचा धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भारतातही काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या महिन्यात दिल्लीव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु त्याची तीव्रता मात्र कमी होती.
भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढतेय. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं म्हटलं आहे.
“चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरंच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी”, असं छोटू वसावा अहमदाबाद मिररशी बोलताना म्हणाले. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वसावा यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहून गुजरातमधील तीन भाजपा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.
भारतात गुरुवारी करोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे १७ हजार प्रकरणे नोंदवण्यात आली. यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या ४.७३ लाख इतकी झाली असून, मृतांची संख्या १५ हजारांच्या आसपास पोहचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
करोना संसर्गाच्या दैनंदिन वाढीचा विचार करता, गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १६ हजार ९२२ प्रकरणे नोंदवण्यात आल्याने आजवरची एकूण संख्या ४,७३,१०५ इतकी झाली. तर आणखी ४१८ जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ८९४ इतकी झाली आहे.करोनाग्रस्तांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सहावा दिवस होता.
या संख्येत २० जूनला १४५१६, २१ जूनला १५४१३, २२ जूनला १४८२१, २३ जूनला १४९३३, तर २४ जूनला १५९६८ इतकी वाढ झाली. याचाच अर्थ, करोना संसर्गाच्या प्रकरणांत २० जूनपासून ९२,५७३ रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे. तथापि, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणातील आरोप आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने मागे घेतल्यानंतर आता राष्ट्रकु ल स्पर्धेत देशाला दोन सुवर्णपदके मिळवून देणारी वेटलिफ्टर संजिता चानू हिला २०१८ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
२०१८ सालच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानुसार संजिताला अर्जुन पुरस्कार देण्यात येईल, असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. संजितावरील उत्तेजकांचे आरोप मागे घेण्यात आले तर तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात यावे, असा आदेश २०१८मध्येच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता.
‘‘संजितावरील उत्तेजकाचे आरोप मागे घेण्यात आल्यामुळे तिला आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. २०१७मध्ये अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतर संजिताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मे २०१८मध्ये संजिता उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती. त्याच वर्षी संजितावरील उत्तेजकाची सुनावणी झाल्यानंतर तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. वेटलिफ्टिंग महासंघाने गेल्या महिन्यातच तिच्याविरुद्ध पुरावे नसल्याने सर्व आरोप मागे घेतले होते.
सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेलं बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली होती.
मात्र हा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं जाण्याचे संकेत मिळत आहेत.
अशा परिस्थितीत बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात खेळवण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे आशिया चषकाचं यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने यंदाची स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम आणि आशिया चषक या स्पर्धा एकाच वेळी येणार असल्यामुळे पुन्हा एक नवीन समस्या निर्माण झाली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.