चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ सप्टेंबर २०२०

Date : 25 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आमदार-खासदार भेटायला आल्यास उठून उभं राहणं गरजेचं; नोकरशाहीतील अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक :
  • राजस्थानमधील सरकारी नोकरशाहीत काम करणाऱ्यांकडून खासदार आणि आमदारांना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी नाराजी व्यक्त करत निर्देश जारी केले आहेत. एखादा खासदार किंवा आमदार सरकारी अधिकाऱ्याला भेटायला आल्यास त्यांच्या सन्मानार्थ ते आल्यावर आणि ते निघताना अधिकाऱ्यांनी उठून उभं राहणं गरजेचे आहे. स्वरुप यांनी दिलेल्या या निर्देश आणि सुचनांने तातडीने पालन करण्यासंदर्भातील सांगण्यात आलं आहे.

  • मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि वेगवेगळ्या विभागांच्या सचिवांसाठी या संदर्भात एक सूचना पत्रकच जारी केलं आहे. नुकतंचं खासदार आणि आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात तक्रार करणारं एक पत्र मुख्य सचिवांना लिहिलं होतं. या पत्रामध्ये लोकनियुक्त नेत्यांनी नोकरशाहीमधील अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याच पत्रानंतर मुख्य सचिवांनी हे परिपत्रक जारी केलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे.

  • राज्यामध्ये पारदर्शी आणि उत्तरदायित्व असणारे आणि संवेदनशील प्रशासन व्यवस्था निर्माण करणे हे ही सरकारीच पहिली प्राथमिकता आहे असं मुख्य सचिवांनी जारी केलेल्या या पत्रकामध्ये म्हटलं आहे. खासदार आणि आमदार आपल्या क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधि म्हणून काम करतात. विकास आणि लोकांच्या समस्येसंदर्भात या लोकनियुक्त प्रतिनिधिंचे काम महत्वाचे असते. त्यामुळेच त्याना देण्यात येणारी वागणूक ही खूप विनम्र असणे गरजेचे आहे, असं सचिवांनी म्हटलं आहे.

दहशतवाद, व्यापारातील अडथळ्यांवर सार्क देशांनी मात केलीच पाहिजे :
  • सीमेपलीकडील दहशतवाद, संपर्क आणि व्यापारामध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करणे ही तीन आव्हाने असून सार्क देशांनी त्यावर मात केलीच पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. प्रादेशिक गटांच्या आभासी बैठकीत जयशंकर यांनी हे मत व्यक्त करून पाकिस्तानवर टीका केली.

  • दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या त्याचप्रमाणे पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींसह दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन जयशंकर यांनी सार्क देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीत केले.

  • ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि दक्षिण आशियाची भरभराट होण्यासाठी प्रयत्न करण्यास भारत बांधील असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी केला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेचे ७५ वे अधिवेशन सुरू असताना सार्क गटांच्या परराष्ट्रमंत्र्यांची अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये पकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हजर होते.

सत्तेच्या शांततापूर्ण हस्तांतरणाच्या आश्वासनास ट्रम्प यांचा नकार :
  • येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत डेमॉकॅट्रिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी आपला पराभव केल्यास सत्तेचे शांततेने हस्तांतरण करण्याचे आश्वासन देण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे.

  • या निवडणुकीच्या निकालांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकेल असे आपल्याला वाटत असल्याचे सांगून, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले ट्रम्प यांनी टपाली मतदानाबाबत पुन्हा शंका व्यक्त केली.

  • अमेरिकी नागरिकांना करोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त करीत अमेरिकेतील अनेक राज्ये टपालाद्वारे मतदानाला अनुकूलता दर्शवत आहेत. या देशात दोन लाखांहून अधिक लोक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

  • ‘अध्यक्ष महोदय, तुम्ही या निवडणुकीत जिंकलात, हरलात किंवा बरोबरी साधलीत, तरी निवडणुकीनंतर शांततेचे हस्तांतरण करण्याबाबत तुम्ही आज येथे वचन द्याल काय? लुइव्हिले शहरासह देशातील अनेक शहरांमध्ये दंगे होत आहेत. अशा परिस्थितीत, निवडणुकांनंतर सत्तेचे शांततेत हस्तांतरण होईल याची तुम्ही हमी द्याल काय?’ असा प्रश्न एका पत्रकाराने व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना विचारला. त्यावर, ‘काय होते ते आपण बघू या. मी टपाली मतांबाबत तक्रार केलेली आहे आणि ही मते म्हणजे अनर्थ आहे,’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन :
  • ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले, अशी माहिती स्टार इंडियाने एका पत्रकाद्वारे दिली.

  • “डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत”, असे स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले.

  • “डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील”, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली.

२५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.