चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जून २०२०

Date : 25 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशभरात २४ तासांत १६ हजार नवे रुग्ण :
  • गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५ हजार ९६८ रुग्णांची वाढ झाली असून तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा प्रतिदिन रुग्णवाढ १५ हजारांपेक्षा जास्त झाली. शनिवारी दिवसभरात १५ हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

  • गेल्या चोवीस तासांमध्ये ४६५ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू १४ हजार ४७६ झाले आहेत तर एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ५६ हजार १८३ झाली आहे. करोनाचे २ लाख ५८ हजार ६८४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ५६.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १० हजार ४९५ रुग्ण बरे झाले.

  • उपचाराधीन रुग्णसंख्या १ लाख ८३ हजार २२ इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा जास्त असून त्यातील फरक ७५ हजार ६६२ इतका आहे.

सहकारी बँकाही रिझव्‍‌र्ह बँकेच्या कक्षेत :
  • पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अडचणीत आल्यामुळे सहकारी बँकांवर नियंत्रण आणण्याच्या मागणीनुसार नागरी सहकारी बँका व बहुराज्यीय सहकारी बँका रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारित आणण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या संदर्भात वटहुकूम काढण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

  • गेल्या वर्षी पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर, नागरी व बहुराज्यीय सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेखीखाली आणून त्यांच्या वित्तीय व्यवहारांवर अंकुश ठेवण्याची जोरदार मागणी झाली होती. नागरी सहकारी बँकांमध्ये मध्यमवर्ग, नोकरदार, निवृत्तीधारक यांच्या ठेवी मोठय़ा प्रमाणात असतात. या बँका गैरआर्थिक व्यवस्थापनामुळे अडचणीत येतात व त्याचा फटका ठेवीदारांना बसतो.

  • मध्यमवर्ग ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात या उद्देशाने नागरी सहकारी बँका रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत. देशभरातील १५०० हून अधिक नागरी व बहुराज्यीय सहकारी बँकांमध्ये ८.६ कोटींहून जास्त ठेवीदारांनी पैसे ठेवलेले आहेत. या बँकांमध्ये ४.८४ लाख कोटींच्या ठेवी असून त्या नव्या निर्णयामुळे सुरक्षित राहतील, असे जावडेकर म्हणाले.

करोनाच्या धोक्यामुळे ‘या’ राज्यानं ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला :
  • देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात करोना प्रसार नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या पश्चिम बंगालमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढू लागली आहे. केंद्र सरकारनं अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम बंगालमधील करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा महिनाभर लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

  • पश्चिम बंगालमधील करोना बाधित रुग्णांची संख्या १५ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यातील करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, बहुजन समाज पक्षाचे मनोज होवलदार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते स्वपन बॅनर्जी, काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

  • कोलकत्त्यातील निबान्ना येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सहकारी बँकांतील ठेवींसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय :
  • शासकीय, नागरी सहकारी व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या दृष्टीनं मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा मोठा निर्णय केंद्रानं घेतला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

  • शासकीय बॅंका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांमधील ठेवींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारनं या बँका शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

२५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.