चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ एप्रिल २०२०

Date : 25 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशभरात चोवीस तासांत ५७ मृत्यू, १ हजार ४२९ नवे रुग्ण :
  • जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाबाधितांची संख्या देशात 24 हजार 506 वर पोहचली आहे. चोवीस तासांत 57 जणांचा मृत्यू तर 1429 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत आढळलेल्या 24 हजार 506 जणांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18 हजार 668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 5 हजार 063 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांची संख्या समाविष्ट आहे.

  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत जाहीर केलेला लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवला आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या 24 हजार 506  झाली आहे. पण जर भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर रुग्णांच्या संख्या एक लाखांहून अधिक असती अशी माहिती उच्चाधिकार गट-क्रमांक (1)चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.

  • त्यांनी म्हटलं आहे की, “लॉकडाउन लागू केला नसता तर देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक असला असता. त्यामुळे लॉकडाउन योग्य वेळी अमलात आणला गेला”. केंद्राच्या यंत्रणा युद्धपातळीवर राबत असल्या तरी करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्यात अपयश येत आहे. शुक्रवारी देशभरात नव्या 1752रुग्णांची भर पडली असून ही देशात एक दिवसात नोंदविण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे.

सुलतान चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा मे महिन्यात : 
  • करोनामुळे सध्या मैदानांवर शुकशुकाट असला तरी ऑनलाइन क्रीडा स्पर्धा खेळाडूंसह असंख्य नागरिकांचे मनोरंजन करण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच आयपीएस अकादमी आणि चेसबेस फाऊंडेशनतर्फे यंदा सुलतान खान चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शनिवार, ९ मे रोजी रात्री आठ वाजता ही स्पर्धा रंगणार आहे.

  • भारताचे माजी बुद्धिबळपटू मीर सुलतान खान यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी १ मेपर्यंत चेसबेस फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे असून विविध गटानुसार प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुष-महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्सना या स्पर्धेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. तीन मिनिटांची प्रत्येकी एक फेरीनुसार एकूण १० फे ऱ्यांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

  • या स्पर्धेद्वारे जमणारा निधी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. मोबाइल अथवा टॅब्लेट यांसारख्या उपकरणांवर मात्र ही स्पर्धा खेळता येणार नाही. एकूण १ लाखापेक्षा अधिक रकमेचे पारितोषिक या स्पर्धेदरम्यान देण्यात येणार असून प्रथम क्रमांकावरील विजेत्याला २०,००० रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक शाहिद अहमद यांच्याशी या ९०३८१३९५१० क्रमांकावर संपर्क साधावा.

आजपासून देशभरात दुकानं उघडणार; मॉल्स मात्र बंदच : 
  • करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला.

  • काही अटींसह सरकारनं आता दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

  • गृहमंत्रालयानं शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकानं काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान करोना व्हायरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसंच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकानं तसंच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही.

‘करोना’चा शिरकाव न झालेलं देशातील एकमेव राज्य, पर्यटकांना ऑक्टोबरपर्यंत ‘नो एंट्री’ :
  • करोना व्हायरसविरोधातील लढाईत सिक्किम सरकारने ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे करोना व्हायरसला अद्यापही सिक्किममध्ये शिरकाव करता आलेला नाही.

  • सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य असं आहे जिथं अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सात लाख लोकसंख्या असलेल्या हिमालयातल्या छोट्या राज्यात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी ऑक्टोबरपर्यंत सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सिक्किम प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सिक्किमशिवाय नागालँडमध्येही सध्या एकही करोनाबाधित नाही. नागालँडमध्ये एकाला करोनाची लागण झाली होती. पण एकमेव रुग्ण असल्याने त्यालाही आसाममध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता नागालँडमध्येही करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आहे.

  • सिक्किममध्ये करोनाचा फैलाव झाला नसल्याची माहिती देताना, देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते, असे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. “देशात जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनची घोषणा होण्याआधी म्हणजे 17 मार्च रोजीच राज्यात लॉकडाउन जाहीर केले होते. सिक्किमचे अनेक विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेतात. पण, ते सर्व जानेवारीमध्येच परतले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. करोनाची लागण नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच त्यांना घरी परत पाठवलं.” 

उत्तर प्रदेश सरकार मजुरांना परत आणणार :
  • करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार परत आणेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सांगितले आणि यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

  • इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या आणि तेथे १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांची यादी तयार करावी, जेणेकरून त्यांना टप्प्या-टप्प्यात परत आणता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

  • संबंधित राज्यांनी या मजुरांची तपासणी करून त्यांना उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत आणल्यानंतर त्यांना त्यांच्या खेडय़ांमध्ये पाठवण्यात येईल. मात्र आधी त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ात १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. यासाठी व्यवस्था करावी आणि ती ठिकाणे र्निजतुक करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

२५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.