चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ मे २०२१

Updated On : May 24, 2021 | Category : Current Affairs


नेपाळमध्ये करोना टाळण्यासाठी एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची आयोगाची शिफारस :
 • नेपाळमध्ये १२ ते १९ नोव्हेंबरदरम्यान वेळापत्रक निश्चित करण्यात आलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या प्रचारादरम्यान करोनाचा फैलाव होणे टाळण्यासाठी या निवडणुका एकाच टप्प्यात घ्याव्यात, असा सल्ला देशाच्या निवडणूक आयोगाने अडचणीत सापडलेले पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना दिला आहे.

 • एकदा निवडणुकीची तारीख जाहीर झाली, की निवडणुका यशस्वीरीत्या आयोजित करणे हे निवडणूक आयोगाचे घटनादत्त कर्तव्य आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार थपलिया यांनी पंतप्रधान ओली यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

 • ‘‘आमच्याकडे तयारीसाठी भरपूर वेळ असून, निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी अशी सूचना आम्ही सरकारला केली आहे,’’ असे थपलिया यांनी म्हटल्याचे ‘माय रिपब्लिक’च्या वृत्तात म्हटले आहे.

 • सरकारने निवडणुकीसाठी अनुकूल असे राजकीय वातावरण निर्माण करावे, शांतता व सुरक्षा कायम राखावी आणि करोना संसर्गाचा फैलाव होण्यास प्रतिबंध करावा यासह इतर सूचना निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सरकारला केल्याचेही त्यांनी सांगितले.

‘एमपीएससी’चा निकाल रखड ल्याने पशुवैद्यक विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव :
 • सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांच्या निकालाचा मार्ग मोकळा झाल्याची अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात होती.

 • मात्र, अद्यापही शासनाने पदभरतीसंदर्भात अंतिम निर्णय न घेतल्याने अठरा महिन्यांपासून पशुधन विकास अधिकारी पदाची परीक्षा होऊन निकाल रखडला आहे. तर शासनाने हे पद आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतल्याने याविरोधात महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंट असोसिएशनने महाराष्ट्र सरकार आणि आयोगाविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मुंबई येथे धाव घेतली आहे.

 • अठरा महिन्यांपासून पशुधन विकास अधिकारी पदासाठी एमपीएससीद्वारे झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शासनाने २४ मार्च २०२१च्या निर्णयानुसार जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात पशुवैद्यक पदवीधरांमध्ये प्रचंड आहे. त्यात आता मराठा आरक्षणच रद्द झाल्याने कंत्राटी पदभरती रद्द करून एमपीएससीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती.

 • मात्र, शासनाने अद्यापही आयोगाला परीक्षा, पदभरती आणि निकालासंदर्भात कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे पदभरतीची घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २१९२ पशुधन विकास अधिकारी गट-अ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या फक्त १६५७ पदांवर पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत तर जवळपास ५३५ मंजूर पदे रिक्त आहेत. तरीही शासनाने बर्ड फ्लू टळल्याचे कारण सांगून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.  रिक्त पदांसाठी एमपीएससीने ऑगस्ट २०१९ला ४३५ जागांची जाहिरात प्रसिद्ध करत डिसेंबर २०१९ मध्ये त्यांची परीक्षाही घेतली.  पशुवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मुंबई येथे भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

राज्याच्या राजधानीत प्रवेशासाठी राज्यातील लोकांनाच करोना चाचणी अनिवार्य :
 • एकीकडे प्रयोगशाळेवरील भार कमी करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या निरोगी व्यक्तीला करोना चाचणी अहवाल बंधनकारक करू नये, अशी सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने

 • के ली आहे. बृहन्मुंबई महापालिके ने मुंबई शहरात विमानाने जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल अनिवार्य केल्याने आश्चर्य व्यक्त के ले जात आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी  ही अट एकादाची मान्य करता येईल, परंतु राजधानीच्या शहरात उर्वरित महाराष्ट्रातील लोकांसाठी ही अट जाचक ठरत आहे. एकाच राज्यात राजधानी आणि उपराजधानीसाठी वेगळे नियम का, असा सवाल के ला जात आहे.

 • राज्याची राजधानी असल्याने मंत्रालयाशी संबंधित कामे मुंबईत होतात. तसेच प्रमुख कार्पोरेट कार्यालय, शासकीय कार्यालये येथे असल्याने राज्यभरातील लोकांना मुंबईत नियमित ये-जा करावी लागते. शिवाय महाराष्ट्रात करोनाची स्थिती मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये जवळपास सारखी आहे.

ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंना संपूर्ण सहकार्याचे पंतप्रधानांचे आदेश :
 • भारतातील करोना रुग्णसंख्या वाढत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

 • भारताचे विविध क्रीडा प्रकारांतील जवळपास १०० खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. तलवारबाजीमध्ये ऑलिम्पिक स्थान निश्चित करणारी भवानी देवी आणि अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी सध्याच्या काळातही सातत्याने सहकार्य केल्यामुळे शासन आणि क्रीडा मंत्रालयाचे शुक्रवारी आभार मानले. त्या पाश्र्वभूमीवर रिजिजू यांनी मत व्यक्त केले.

 • ‘देशातील स्थिती सध्या बिकट आहे. मात्र यामुळे ऑलिम्पिक पात्र खेळाडूंच्या सरावावर परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. पंतप्रधानांनी खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने सर्व ती आवश्यक पावले उचलण्यास परवानगी दिली आहे,’’ असे रिजिजू म्हणाले.

ला-लीगा फुटबॉल - अ‍ॅटलेटिको माद्रिदचे ११वे जेतेपद :
 • अ‍ॅटलेटिको माद्रिदने पिछाडीवरून मुसंडी मारत व्हॅलाडॉलिडचा २-१ असा पराभव करत ला-लीगा फुटबॉल स्पर्धेचे ११व्यांदा जेतेपद पटकावले.

 • जेतेपदासाठी अ‍ॅटलेटिको आणि रेयाल माद्रिद यांच्यात कडवी चुरस रंगलेली असताना रेयालने व्हिलारेयालविरुद्धची लढत २-१ अशी जिंकली होती. अ‍ॅटलेटिको माद्रिदला पराभव किंवा बरोबरी पत्करावी लागली असती तर दोन्ही संघांतील सरस कामगिरीच्या आधारावर रेयाल माद्रिद जेतेपदाचा मानकरी ठरला असता.

 • पण त्याच वेळेला अँजेल कोरिया (५७व्या मिनिटाला) आणि लुइस सुआरेझ (६७व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदने व्हॅलाडॉलिडचे आव्हान परतवून लावत सात वर्षांच्या कालावधीनंतर ला-लीगाचे जेतेपद प्राप्त केले.

 • या बरोबरच अ‍ॅटलेटिकोने बार्सिलोना आणि रेयाल माद्रिदची जेतेपदावरील गेल्या सात वर्षांपासूनची मक्तेदारी संपुष्टात आणली.

 • अ‍ॅटलेटिको माद्रिदने ३८ सामन्यांत ८६ गुणांची कमाई करत अग्रस्थान पटकावले. रेयाल माद्रिदला ८४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बार्सिलोना ७९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

लॉकडाउन उठवल्यानंतर लंडनमध्ये काय झालं :
 • करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये युरोपात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले होते. त्यामुळे युरोपातील जवळपास सर्वच देशांमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र, भारतात दुसऱ्या लाटेचा तडाखा बसत असताना लंडनमध्ये मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटवला जात आहे.

 • लंडन, शेफील्ड या शहरांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचं दिसत आहे. नेमकं कसं आहे या शहरांचं चित्र? सांगताय थेट शेफील्डमधून संकल्प शिरोडकर.

२४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)