चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ ऑगस्ट २०२०

Date : 24 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सात दिवसांमध्ये देशात साडेचार लाख नव्या रुग्णांची नोंद
  • जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून देशातही करोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल साडेचार लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर यादरम्यान ६ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यूही झाला.

  • या संख्येकडे पाहिल्यास गेल्या सात दिवसांमधील रुग्णांची वाढलेली संख्या ही भयावह असल्याचं दिसत आहे. परंतु दुसरीकडे देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या इतर देशांच्या तुलनेत मात्र कमी आहे.

  • आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशात ६२ हजारर ०४२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३१ लाखांच्या वर पोहोचली आहे. तर रविवारी देशात ८५६ जणांच्य मृत्यूची नोंद झाली. ११ ऑगस्टनंतर पहिल्यांदा देशात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ९०० पेक्षा कमी नोंदवली गेली.

चित्रीकरणासाठी नियमावली जाहीर :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या चित्रीकरणास परवानगी देताना आदर्श नियमावली जारी केली. त्यानुसार अंतर नियमाचे पालन आणि मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रपट आणि मालिका    निर्मिती संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि आदर्श नियमावली जाहीर केली. जावडेकर म्हणाले की प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे चित्रिकरणाचे काम सोपे होईल आणि करोना विषाणू उद्रेकाची झळ बसलेल्या चित्रपट निर्मितीतील कामगारांचे काम सुरू होईल.

  • आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाशी चर्चा केल्यानंतरच चित्रिकरणासाठी आदर्श नियमावली जारी करण्यात आली, असेही जावडेकर यांनी सांगितले.

  • करोना संसर्गाचा धोका असल्याने चित्रपट-मालिकांचे चित्रिकरण करताना कलाकार सोडून इतरांनी अंतर नियमाचे पालन आणि मुखपपट्टय़ांचा वापर करणे अनिवार्य आहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.

टपाल पेटीत सापडलेले गांधीजींचे चष्मे विकले गेले अडीच कोटींना :
  • इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये शुक्रवारी लिलाव झाला. या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (२,६०.००० पौंड) इतकी किंमत मिळली. विशेष म्हणजे चार आठवड्यांपूर्वी चष्म्यांची ही जोडी एका लिलाव कंपनीच्या टपाल पेटीत आढळून आली होती. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.

  • युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले. एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले आहेत. याबाबत माहिती देताना ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या टपाल पेटीत एका व्यक्तीने एका चिठ्ठीसह हे चष्मे टाकले होते. यातील चिठ्ठीत त्यानं म्हटलं होतं की, स्वतः गांधीजींनी त्यांच्या काकांना सन १९२० मध्ये दक्षिण अफ्रिकेत असताना हे चष्मे भेट दिले होते. गरजवंतांना स्वतःजवळील वस्तू भेट देण्याची गांधीजींची ही वृत्ती सर्वांनाच माहिती आहे.

  • ज्यावेळी हे चष्मे लिलावासाठी काढायचे असे लिलाव कंपनीने ठरवले तेव्हा त्यांना सुरुवातीला वाटलं की, हे चष्मे साधारण १५,००० पौंड अर्थात १४ लाख रुपयांपर्यंत विकले जातील. मात्र, अंतिमतः ते अपेक्षेपेक्षा २० पट जास्त किंमतींना म्हणजेच अडीच कोटी रुपयांना विकले गेले.

BSF चे टेक अपग्रेडेशन, ४३६ ड्रोन आणि ड्रोन विरोधी सिस्टिम खरेदीची योजना :
  • बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे पूर्णवेळ संचालक म्हणून राकेश अस्थाना यांची नियुक्ती होताच बीएसएफच्या टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशनला सुरुवात झाली. सीमेवर टेहळणीसाठी ४३६ छोटया आणि स्क्षूम ड्रोन्स तसेच ड्रोन विरोधी सिस्टिमला मंजुरी देण्यात आली आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी शस्त्रास्त्र घेऊन येणारे कुठलेही ड्रोन पाडण्यासाठी ड्रोन विरोधी सिस्टिमची भारत-पाकिस्तान सीमेवर नुकतीच चाचणी घेण्यात आली.

  • व्यापक एकीकृत सीमा व्यवस्थापन योजनेतंर्गत पाकिस्तान, बांगलादेश सीमेवरील बीएसएफच्या १९२३ चौक्या सेन्सर्स, सीसीटीव्ही आणि ड्रोन फीडने सुसज्ज करण्यात येतील. यातल्या १५०० चौक्या ड्रोन्स उडवण्यासाठी आणि ड्रोन्स विरोधी सिस्टिम वापरण्यासाठी सक्षम आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, छोटया आणि स्क्षूम ड्रोन्सची किंमत जवळपास ८८ कोटी रुपये आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाब सीमेवर बीएसएफ सध्या सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने स्वदेशीन ड्रोन विरोधी सिस्टिमची चाचणी घेत आहे. मागच्या वर्षभरापासून पाकिस्तान चिनी ड्रोन्सच्या मदतीने पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमध्ये जिहादींपर्यंत रायफल, पिस्तुल, ग्रेनेड पोहोचवत आहे.

अमरावती विद्यापीठात पाच वर्षांपासून पीएच.डी. नोंदणी बंद :
  • अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. ची नोंदणी गेल्या पाच वर्षांपासून बंद असताना संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत असून प्रवेश शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रवेश शुल्काचे काय केले जाते, असा सवाल विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

  • पीएच.डी. साठी नोंदणी बंद असल्याने प्रवेश घेऊनही काहीच फायदा नाही. जानेवारी २०२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयांची देखील अद्याप नोंदणी झालेली नाही. यामुळे नियमावलीचे उल्लंघन होत आहे. पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी आरक्षणानुसार विद्यापीठातील संलग्नित संशोधन केंद्र दिले आहेत की नाही, याचा खुलासा व्हायला हवा.

  • नोंदणीच न झाल्याने अनेक विद्यार्थी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या फेलोशिप आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करू शकलेले नाहीत. त्याची नुकसानभरपाई विद्यापीठ देणार काय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासून आतापर्यंत पीएच.डी.साठी एकही फेलोशिप दिलेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश शुल्कात वाढ का केली, याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

  • विद्यापीठाने पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अंकेक्षण केले का, असाही सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधकांची संपूर्ण माहिती वर्षनिहाय जाहीर करावी, नवीन विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत.

फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड - भारत उपांत्यपूर्व फेरीत :
  • चेन्नई : आर. प्रज्ञानंद आणि दिव्या देशमुख यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या बलाढय़ चीनचा ४-२ असा पराभव करत फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उपांत्यपूर्व फे रीतील आपले स्थान निश्चित के ले आहे.

  • भारताचा उपांत्यपूर्व फे रीचा सामना २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. चार डाव बरोबरीत आणि २० वर्षांखालील गटात दोन विजय मिळवत भारताने आगेकू च के ली आहे. १५ वर्षीय प्रज्ञानंदने लियू यान याच्यावर सरशी साधली. त्यानंतर १० आणि १२ वर्षांखालील माजी जगज्जेती दिव्या देशमुख हिने जिनर झू हिच्यावर विजय मिळवला.

  • भारताने या विजयासह अ-गटात १७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल पटावर भारताचा कर्णधार विदित गुजराथी याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डिंग लिरेन याला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. त्यानंतर पी. हरिकृष्णने यांगयी यू याच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. भारताची अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी हिने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या यिफान होऊ हिला बरोबरीत रोखले. त्यानंतर द्रोणावल्ली हरिकाने माजी जगज्जेती वेनजून जू हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला.

२४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.