संपूर्ण देशावर करोना संकट असताना आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. करोना संकटाच्या काळात सण-उत्सवांवर निर्बंध आले असल्याने यावेळी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.
प्रशासनाकडूनही नियमांचं पालन करत शिस्तबद्दपणे गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो”.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!,”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
यावरुनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार जयराम रमेश यांनी सरकार याच वेगाने कंत्राटं देत राहिलं तर लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. यावरुनच केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करताना जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं आहे.
करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) बटण दाबण्यासाठी मतदारांना हातमोजे उपलब्ध करून देण्यात येणार असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना मतदानाच्या दिवशी अखेरच्या एका तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. वापर केल्यानंतर विल्हेवाट लावता येतील असे हातमोजे देण्यात येण्याची शक्यता आहे.
जो परिसर संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तेथील मतदारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. मतदान केंद्रांचे मतदानाच्या आधीच्या दिवशी र्निजतुकीकरण करणे बंधनकारक करण्याची शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे.
प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर थर्मल चाचणी यंत्र बसविण्यात येणार असून निवडणूक अथवा निमवैद्यकीय कर्मचारी मतदारांची थर्मल चाचणी करणार आहेत. मतदान केंद्रात १५०० ऐवजी जास्तीत जास्त एक हजार मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे.
‘जेईई २०२०’ आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत असताना, आता भाजपाचे दिग्गज नेते व राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे नीट व जेईई सारख्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी या संबधी एक ट्विट करत म्हटले की, “मी नुकतीच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना सुचवले आहे की, नीट आणि अन्य परीक्षा दिवाळी नंतर घेतल्या जाव्यात. परीक्षांची तारीख निश्चित करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर सोपवलेल असल्याने, यामध्ये काही अडचण यायला नको. मी तातडीने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र पाठवणार आहे.”
तसेच, अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी सध्या परीक्षा घेण्यास विरोध करत असलेल्यांना उद्देशुन म्हटले, “मी या अगोदरच ट्विटद्वारे सांगितले आहे की, नीट परीक्षा दिवाळीनंतर घेण्यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मंत्रीमहोदय आता एका तातडीची बैठकीत आहेत. पाहू आता काय होतं.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर अतिशय शेवटच्या क्षणी मला तुमच्याकडून हस्तक्षेप करण्यास सांगण्यात आले आहे.” याचबरोबर सुब्रमण्यम स्वामींनी असे देखील म्हटले की, जेव्हा मी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे म्हटले, याचा अर्थ जेईई इत्यादी सारख्या अन्य सर्व परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात.”
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे. या यादीमध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या चार महत्वाच्या बँकाचा समावेश आहे. या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. मात्र आता सरकारला समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
सरकारच्या तिजोरीमध्ये पुरेश्या प्रमाणात पैसा असवा या उद्देशाने या बँकांमधील समभागांची विक्री करुन पैसा उभा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले. करोनामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असून त्यामधून सावकरण्यासाठी या निधीचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने अर्थमंत्रालयाला नुसतेच एक पत्र पाठवून खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग आणावा अशी सूचना केली होती. पैसा उभारण्यासाठी आणि सरकारी बँकांची परिस्थिती स्थीर ठेवण्यासाठी सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील पाचच बँकांमध्ये गूंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून इतर बँकांचे खासगीकरण केले जाणार असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे. या वर्षाअखेरीस पर्यंत या बँकांचे खासगीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.
भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला ६-० असे सहज हरवले. मग व्हिएतनामवर ४-२ असा आणि उझबेकिस्तानवर ५.५-०.५ असा विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत. पहिल्या स्थानावरील भारताच्या खात्यावर १८ डावांअखेरीस सर्वाधिक १५.५ गुणांची जमा आहेत.
पाचवेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने झिम्बाब्वे आणि व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत सहभाग घेतला नाही. मात्र उझबेकिस्तानविरुद्ध त्याला नॉडिरबेक याकूबोएवविरुद्ध ७६ चालींत बरोबरी स्वीकारावी लागली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.