चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 सप्टेंबर 2023

Date : 21 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारचं सतर्कतेचं आवाहन; मार्गदर्शक सूचना केल्या जारी!
  • भारत व कॅनडा यांच्यातील वाद हळूहळू वाढू लागला आहे. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणावरून दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असून आपापल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत आहेत. या वादात आधी दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता आपापल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. आधी कॅनडानं आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन केलं असताना आता भारतानं कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तिथल्या परिस्थितीसंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

  • जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भारताचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं भारताच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. उत्तरादाखल भारत सरकारनं हे सर्व आरोप फेटाळतानाच कॅनडातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं नमूद करत कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.
  • दुसऱ्याच दिवशी कॅनडानं आपल्या नागरिकांसाठीच्या प्रवासासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत त्यात जम्मू-काश्मीरचा मुद्दा समाविष्ट केला. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न असून तिथे प्रवास करताना खबरदारी घेण्याची सूचना कॅनडा सरकारनं नागरिकांना केली. कॅनडाच्या या कृतीवर भारताकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते? याकडे लक्ष लागलेलं असतानाच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचनापत्र जारी केलं आहे.

कॅनडातील भारतीयांसाठी काय आहेत सूचना?

  • अरिंदम बागची यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सूचनांचं परिपत्रक ट्वीट केलं आहे. “कॅनडातील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना”, असं या पत्रकाच्या सुरुवातीलाच नमूद केलं आहे.
आता जंगलातला वाघ अवघ्या ३० सेकंदात मोबाईल आणि संगणकावर येणार, काय आहे हे ‘ट्रेलगार्ड एआय’ तंत्रज्ञान
  • भारतातील वाघांच्या अधिवासातील मानव-वन्यजीव संघर्षाचे आव्हान वाढत असतानाच आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा अलर्ट तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, ग्लोबल टायगर फोरम, रिझॉल्व्ह ही स्वयंसेवी संस्था आणि क्लेमसन युनिव्हर्सिटीने ‘ट्रेलगार्ड एआय’ या नावाने ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान तयार केले आहे. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येणे साेपे होणार आहे.
  • भारतातील वाघांची संख्या वेगाने वाढत आहे. इतरही वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेर जायला लागले आहेत. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार, भारतात तीन हजार ६८२ वाघ आहेत. जगभरातील वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. यातील २६ टक्के वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजेच संरक्षित क्षेत्राच्या सीमेवर आणि बफर क्षेत्रात आढळतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षावर अजूनही आळा घालता आलेला नाही. या संघर्षात माणसे, पाळीव जनावरे जखमी होतात, मृत्युमुखी पडतात. त्यामुळे गावकरी वाघांना मारण्यासाठी विषप्रयोग, वीजप्रवाह यासारख्या गोष्टींचा वापर करतात. हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनेच नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
  • उत्तर भारतातील कान्हा-पेंच आणि तेराई-आर्क या सर्वाधिक वाघ असणाऱ्या लँडस्केपमध्ये आणि जवळपास पाच व्याघ्रप्रकल्पांमध्ये मे २०२२ पासून ‘ट्रेलगार्ड एआय’ वापरण्यात येत आहे. भारतात या प्रणालीची चाचणी घेण्यापूर्वी हे नवीन तंत्रज्ञान दक्षिण आफ्रिकेत प्रभावीपणे वापरण्यात आले. सुरुवातीला हे तंत्रज्ञान जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, त्यात आणखी संशोधन केल्यानंतर हत्ती, गेंडा, अस्वल, रानडुक्कर यासारखे सर्व प्राणी तसेच पक्ष्यांच्या प्रतिमादेखील यात टिपल्या जातात, हे स्पष्ट झाले. हे तंत्रज्ञान वाघांचा अधिवास असणाऱ्या राज्यांमध्ये उपयुक्त ठरू शकते.
  • वन्यजीव संरक्षणासाठीदेखील ते उपयुक्त ठरू शकते. एवढेच नाही तर २४ बाय ७ ते काम करत असल्याने वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी फिरणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना ज्या मर्यादा येतात, त्याही याद्वारे टाळल्या जाऊ शकतात.
बाप्पांची आरती ‘सुखकर्ता दुखहर्ता’चे रचियता कोण? असा आहे इतिहास व अर्थ
  • प्रत्येक कार्यात पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाचा असतो. तो सगळ्यांचा प्रमुख आहे. बुद्धीचा देवता, विघ्नहर, संकटमोचक असलेल्या बाप्पाला भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पुजले जाते.
  • ‘सुखकर्ता दुखहर्ता’ म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा हे श्री गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही आरती नित्य पूजेतही म्हटली जाते, ‘जोगिया’ रागात ही आरती रचली आहे. विशेष म्हणजे देशी भाषेमध्ये या आरतीची रचना करण्यात आली आहे.
  • सुख देणारा, दुःख हरण करणारा असा हा गजानन त्याची कृपा झाली की प्रेमाचा वर्षाव भक्तावर करतो. सर्वांगाला उटी शेंदूराची लावलेली आहे. त्याच्या कंठात मोतयांची माळ आहे. हे देवा तुझा जयजयकार असो. तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  • तुझ्या कपाळावर रत्नजडित मुकूट आहे. कुंकू केशर, मिश्रित चंदनाची उटी लावलेली आहे. हिरे जडीत मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसतो. तसेच पायात घुंगरांचे वाळे असल्यामुळे मधुर मंजुळध्वनी रुणझुणत आहे.
  • मोठे पोट आणि पीतांबर नेसलेला अशा तुझ्या कमरेला नागाचा करगोटा आहे. तिन नेत्र असलेला, सरळ सोंड वाकडे तोंड असा तुझा अवतार मनमोहक आहे. अशा देवा मी तुझा दास माझ्या घरी आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वांकडून पुजला जाणारा तु मला प्रसन्न हो.
  • असा या आरतीचा संक्षिप्त अर्थ असून हे पद समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिले आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून समर्थांना ही आरती लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे मानले जाते.
तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…
  • बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
  • तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.
  • एकूण परीक्षेची ५७ सत्रे झालीत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये निकालाची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आहे.
नंबर १ मोहम्मद सिराज! आशिया कपमधील कामगिरीचे मिळाले बक्षीस, शुबमनचेही होणार…
  • भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सिराजने हनुमान उडी घेत पहिले स्थान पटकावले आहे, त्याला आठ स्थानांचा फायदा झाला. तो थेट नवव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला. आशिया कप फायनलमध्ये जबरदस्त गोलंदाजीचा फायदा सिराजला झाला. त्याने अंतिम सामन्यात २१ धावांत सहा विकेट्स घेतल्या.
  • टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ज्याला ‘मिया’ म्हणून लाडाने ओळखतात असा मोहम्मद सिराज वन-डे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या जादुई कामगिरीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला पहिल्या स्थानावरून मागे खेचतत आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. सिराजने हे स्थान दुसऱ्यांदा मिळवले आहे.
  • मोहम्मद सिराजने याआधी याच वर्षी जानेवारीत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले होते, त्यानंतर मार्चमध्ये जोश हेझलवूडने त्याची जागा घेतली होती. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप फायनलमध्ये सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे त्याला बक्षिस मिळाले आहे. या गोलंदाजाने आशिया कपमध्ये एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजांनाही मागे टाकले आहे.
  • अफगाणिस्तानचे फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि राशिद यांनी एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सुधारणा केली आहे. सिराज व्यतिरिक्त, अव्वल १० मध्ये फक्त दोनच गोलंदाज होते ज्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने क्रमवारीत बरीच प्रगती केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले दोन सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला महाराजांनी शेवटचे तीन सामने जिंकून मालिका काबीज करण्यास मदत केली. या डावखुऱ्या फिरकीपटूने पाचव्या एकदिवसीय सामन्यात ३३ धावांत चार विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने एकूण आठ विकेट्स घेतल्या. तो सध्या १५व्या स्थानावर आहे. त्याची एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.

 

ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड :
  • चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली. सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

  • ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. ‘‘ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणता चित्रपट पाठवायाचा याबाबत दीर्घ चर्चा झाली. एस. एस. राजमौलीचा ‘आरआरआर’, रणबीर कपूर अभिनित ‘ब्रह्मास्त्र’, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि आर. माधवन यांचे दिग्दर्शन असलेला ‘रॉकेटरी’ या चित्रपटांवर चर्चा झाल्यानंतर ‘चेल्लो शो’ या चित्रपटाची एकमताने निवड करण्यात आली,’’ असे एफएफआयचे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी सांगितले.

  • ऑस्कर पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.

‘ईडी’ची नवी ओळख :
  • ३ जुलै २०२२- महाराष्ट्रात नवे युती सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या अधिवेशन सत्रात ‘ईडी’..‘ईडी’..असा घोष सभागृहात करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांच्या गटाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे भाजपशी हातमिळवणी केली, असे विरोधकांना सूचित करायचे होते.

  • ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने न्यायालयीन दस्तावेज, ‘ईडी’ची निवेदने आणि गेल्या १८ वर्षांतील दाखल गुन्हे, अटक, छापे किंवा चौकशी अहवालांची तपासणी केली. त्यावरून असे दिसते, की ‘ईडी’ची नवी ओळख फारशी चुकीची नाही. या काळात तब्बल १४७ राजकीय नेत्यांची चौकशी करण्यात आली. यापैकी ८५ टक्क्यांहून अधिक नेते विरोधी पक्षांचे होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या १८ वर्षांत ‘सीबीआय’ने केलेल्या कारवाईविषयी केलेल्या तपशीलवार अभ्यासातही हेच साम्य आढळले. 

  • २०१४ मध्ये ‘एनडीए’ सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘ईडी’ने विरोधी पक्ष नेत्यांसह त्यांच्या आप्तस्वकीयांच्या केलेल्या चौकशीतही झपाटय़ाने वाढ झाली. १२१ दिग्गज राजकीय नेत्यांवर ‘ईडी’ची कारवाई झाली असल्याचे या तपासणीत दिसले. या काळात ‘ईडी’ने ११५ प्रमुख विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल केले, छापे टाकले, चौकशी केली किंवा अटक केली. हे प्रमाण ९५ टक्क्यांवर जाते. ‘सीबीआय’च्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे ‘ईडी’ने ही कारवाई केली. हे चित्र ‘यूपीए’ राजवटीच्या (२००४ ते २०१४) चित्राविरुद्ध आहे. या काळात ‘ईडी’ने अवघ्या २६ राजकीय नेत्यांची चौकशी केली होती. यामध्ये १४ (५४ टक्के) विरोधकांचा समावेश होता.

  • २००५ मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) लागू झाल्यानंतर ‘ईडी’च्या कारवाईच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. त्याअंतर्गत जामिनासाठी कडक अटींसह इतर तरतुदींमुळे आता अटक करण्याचा, आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार ‘ईडी’ला मिळाला आहे. ‘ईडी’च्या तपास अधिकाऱ्यांसमोर नोंदवलेला जबाब पुरावा म्हणून न्यायालयात स्वीकारला जातो.

चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान :
  • वाई येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन श्रीमती चेतना सिन्हा यांना अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

  • जागतिकहवामान बदलाचे परिणाम आज ग्रामीण भागामध्ये विशेषत: शेती व्यवसायावर जाणवत आहेत. यापुढे या समस्येवर काम करण्याचा मानस ‘क्लिंटन ग्लोबल  इनिशियेटिव्ह’ या कार्यक्रमात श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.

  • भारतातील माण देशामधील ग्रामीण भागातील हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणाऱ्या परिणामावर या समस्येचे निवारण करणे गरजेचं आहे.  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचा जो उपक्रम माण देशी राबवित असून त्याची दहा लाख महिलांपर्यंत व्याप्ती कशी होत गेली. या उपक्रमामुळे दहा लाख ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य कसे बदलत गेले याबद्दल सविस्तर माहिती श्रीमती सिन्हा यांनी सांगितली.  

  • याबरोबरच माण देशी ग्रामीण तरुण मुलींना खेळाच्या माध्यमातून जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. करोनाच्या साथीच्या संकटानंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी माण देशीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवा कार्य सुरू केले असल्याची माहिती  दिली.

एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल, आयसीसीची ट्विटरवर मोठी घोषणा :

कसे असतील आयसीसीचे नवे नियम

  • खेळाडू चेंडूवर थुंक लावू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे.
  • फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या बाजू (क्रीज) बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.
  • मर्यादित आणि कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी२० मध्ये त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार वेळ संपल्याची (टाईम आऊटची) मागणी करण्यास पात्र असेल.
  • गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू अवैध (नो-बॉल) ठरवला जाईल.
  • गोलंदाजीसाठी धावण्याच्या दरम्यान, क्षेत्ररक्षणाच्या बाजूने कोणत्याही प्रकारची अनुचित कृती केल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड देऊ शकतात.
  • जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी साथीदार फलंदाज (नॉन-स्ट्रायकर) क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला धावबाद केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास फलंदाजावर अन्याय झाला असं मानलं जायचं.
  • टी२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.
ज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदची दमदार कामगिरी :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नामांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या ज्युलियस बेअर जनरेशन चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेची दमदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्याला अमेरिकेच्या १५ वर्षीय ख्रिस्तोफर योकडून पराभव पत्करावा लागला.

  • १७ वर्षीय प्रज्ञानंदने पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे वॅसिल इव्हान्चुक, यान क्रिस्टोफ-डुडा आणि बोरिस गेलफंड या अनुभवी खेळाडूंवर मात केली. त्यामुळे आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर प्रज्ञानंद गुणतालिकेत अन्य तीन खेळाडूंसह दुसऱ्या स्थानावर होता.

  • जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने तीन सामने जिंकत आणि एक लढत बरोबरीत सोडवत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. मॅग्नसने भारताच्या अर्जुन एरिगेसीवरही मात केली. मात्र, अर्जुनने पहिल्या फेरीतील पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना सलग तीन लढती जिंकल्या.

२१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.