पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं.
वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान मंदिराचा शोध लागला आहे. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते, अशी माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.
मंदिराच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडलेत. याशिवाय, तज्ज्ञांना मंदिराच्या जागेजवळ पाण्याचा कुंडही सापडला आहे. हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या कुंडाचा वापर करत असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
ग्लासगो शहरातील १९८०च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांची ही पदार्पणातील कादंबरी आहे.
स्टुअर्ट यांनी स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रुपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्रोद्योगात असलेल्या या लेखकाने ग्लासगो शहर आणि त्या भवतीच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले. तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या शहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे.
दुबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम सहा लेखकात होते, पण त्यांच्या ‘बन्र्ट शुगर’या कादंबरीला बुकरचा मान मिळाला नाही. झिम्बाब्वेचे लेखक त्सित्सी दांगारेम्ब्वा यांची ‘धिस मोर्नेबल बॉडी’, डायन कुक यांची ‘दी विल्डरनेस’, माझा मेंगिस्टे यांची ‘दी श्ॉडो किंग’, ब्रँडन टेलर यांची ‘रिअल लाइफ’ या कादंबऱ्या शर्यतीत होत्या. स्टुअर्ट यांनी कादंबरी आपल्या आईला अर्पण केली आहे.
लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट या संस्थेतून स्टुअर्ट पदवीधर झाले. नंतर ते फॅशन डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यासाठी न्यूयॉर्कला आले. कालव्हीन क्लेन, राल्फ लॉरेन, गॅप या उत्पादनांसाठी त्यांनी काम केले असून फावल्यावेळात त्यांनी एक दशकापूर्वी लेखन सुरू केले होते.
चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.
करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. बायडेन यांनी गुरुवारी सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे, चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.
सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ. जगातील इतर देश व अमेरिका मिळून काही सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे, ज्या चीनला समजतील असे त्यांनी म्हटले आहे.
करोना आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य सरकारनं शाळा बंद ठेवत ऑनलाईन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. चार ते पाच महिने लोटल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागानं २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी इयत्तेचे शाळेत वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याची नोंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी शाळा उघडण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या आदेशानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल ट्विट करून अधिक माहिती दिली आहे. यात जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
“महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात.
करोना प्रभावित जिल्ह्यातील शाळा सुरू करताना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य, शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे,” असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी एटीपी फायन्सल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
जोकोव्हिचला यंदा विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्याने गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत जर्मनीच्या सातवा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हवर ६-३, ७-६ असा विजय मिळवला.
नदालने पाच वर्षांत प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. गटवार साखळीतील अखेरच्या लढतीत नदालने ग्रीसचा गतविजेता स्टेफानोस त्सित्सिपासला ६-४, ४-६, ६-२ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत नदाल विरुद्ध मेदवेदव आणि जोकोव्हिच विरुद्ध डॉमिनिक थिम अशा लढती रंगतील.
आजचा सामना
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.