चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जुलै २०२१

Date : 21 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात करोनाकाळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू : 
  • देशातील करोनाबळींची अधिकृत संख्या ४,१४,००० आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत करोनाकाळात देशात ४० लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसला तरी करोनाने मृत्यूच्या सरकारी आकड्यापेक्षा अनेक पटींनी बळी घेतल्याचे संकेत या अहवालातून मिळाले आहेत.

  • अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. करोनाकाळाच्या सुरुवातीपासून तीन माहितीस्त्रोतांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील अतिरिक्त मृत्यूनोंदणीचा आधार संशोधकांनी घेतला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वयानुसार मृत्युदर आणि भारतातील दोन सेरो सर्वेक्षणांची आकडेवारी पडताळण्यात आली आहे. शिवाय़, देशातील १,७७,००० घरांतील ८,६८,००० जणांचा समावेश असलेल्या ग्राहक सर्वेक्षणाचा आधार संशोधकांनी घेतला आहे. गेल्या चार महिन्यांतील या घरांतील सदस्यांच्या मृत्यूची नोंदही त्यात होते.

धर्मापेक्षा सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे : 
  • करोनाच्या काळात धर्मापेक्षा सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे आहे, असे नमूद करून बकरी ईदनिमित्त देवनार कत्तलखान्यातील ‘कुर्बानी’च्या संख्येवर पालिकेने घातलेल्या निर्बंधांच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मंगळवारी नकार दिला.

  • ‘कुर्बानी’च्या संख्येवर मर्यादा असल्याची पूर्वसूचना पालिकेने दिली नाही. त्यामुळे या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर देवनार कत्तलखान्यात ‘कुर्बानी’साठी प्राणी आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिके ने ‘कु र्बानी’च्या संख्येत वाढ करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी के ली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान सध्या नागरिकांच्या जिवाचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेने हे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

  • पालिकेतर्फे सांगण्यात आले की, बकरी ईदनिमित्त २१ ते २३ जुलै दरम्यान देवनार कत्तलखाना सकाळी सहा ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘कुर्बानी’साठी खुला ठेवला आहे. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले असून गेल्या वर्षी दिवसाला १५० ‘कुर्बानीं’ना परवानगी दिली होती. या वर्षी ही संख्या ३०० केली आहे. आता गणपती, नवरात्री यासह विविध धर्माचे सण सुरू होतील.  तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्यानेच निर्बंध घातले आहेत.

अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी : 
  • अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले.

  • अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती.

  • बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते.  बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न  पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

मिशीगनची वैदेही डोंगरे ‘मिस इंडिया यूएसए’ : 
  • मिशीगन येथील वैदेही डोंगरे या पंचवीस वर्षांच्या विद्यार्थिनीस मिस इंडिया यूएसए २०२१ किताबाने गौरवण्यात आले आहे. जॉर्जियाची आर्शी लालानी ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली असून नुकतीच ही सौंदर्य स्पर्धा झाली.

  • डोंगरे ही मिशीगन विद्यापीठातून पदवीधर झालेली असून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. ती एका नामांकित कंपनीत व्यवसाय विकास व्यवस्थापक  आहे.   महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच साक्षरता यावर भर देण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेतला, असे तिने सांगितले. तिला कथकमधील चमकदार कामगिरीसाठी मिस टॅलेंटेड पुरस्कार मिळाला होता.

  • लालानी (वय २०) हिनेही चांगली कामगिरी केली असून तिने दुसरा क्रमांक मिळवला. तिला मेंदूत गाठ असूनही तिने हे यश मिळवले आहे. उत्तर कॅरोलिनातील मीरा कासारी हिला तिसरा क्रमांक मिळाला. या वेळी १९९७ मधील मिस वर्ल्ड  डायना हेडेन या प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या.

  • तीस राज्यांतील ६१ जण या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी यापूर्वी मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए, मिस टीन इंडिया यूएसए स्पर्धांत भाग घेतला होता. या तीनही गटांतील विजेत्यांना मुंबईच्या प्रवासाची तिकिटे मोफत देण्यात आली आहेत. न्यूयॉर्क येथील अमेरिकी भारतीय धर्मात्मा व नीलम सरण यांनी जागितक सौंदर्य स्पर्धा म्हणून चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिस इंडिया यूएसए ही स्पर्धा सुरू केली होती.

राज्यातील ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू : 
  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

  • राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती https://admission.dvet.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध आहे. तसेच महाआयटीआय या अॅoपद्वारे विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारेही प्रवेश अर्ज भरता येईल.

  • डीव्हीईटी आणि राज्य मंडळ यांच्यातील करारानुसार दहावीच्या सर्व परीक्षार्थ्यांची माहिती डीव्हीईटीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी अर्ज भरताना दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद के ल्यास विद्यार्थ्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप भरली जाईल. प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कागदपत्र तपासणी, प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जाण्याची गरज नाही. दहावीचे गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल, भारताची ‘नॅशनल क्रश’ही चमकली :
  • भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली. आता मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. १६ वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते.

  • महिला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०३च्या सरासरीने २०६ धावा केल्या. या मालिकेत ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होती. २००५मध्ये ती पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली होती.

  • गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरलेली वेस्ट इंडीजची स्टेफनी टेलर चार स्थानांनी घसरत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली, ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. भारताची ‘नॅशनल क्रश’ म्हणजेच स्मृती मंधाना ७०१ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मिताली आणि मंधाना व्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेले नाही.

  • गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी ही पहिल्या दहा क्रमांकात असणारी एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तिला पाचवे स्थान मिळाले आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर आहेत.

२१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.