चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जुलै २०२०

Date : 21 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
संयुक्तअरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप :
  • संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील  कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.

  • ‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान १.३ टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५८ वाजता सोडण्यात आले. यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत. त्याच्या सौरपट्टय़ा उघडण्यात आल्या असून मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रक्षेपण सेवेने यान प्रक्षेपित केले आहे. दुबईच्या अल खवानीज केंद्राला यानाकडून संदेश प्राप्त झाले आहेत. सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान ४९ कोटी ५० लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.

  • संयुक्तअरब अमिरातीचे डिजिटल अर्थव्यवस्था मंत्री ओमर सुलतान अल ओलामा यांनी सांगितले की, या प्रकल्पात कोविड १९ चा मोठा अडथळा होता. त्यावर मात करण्यात यश आले आहे. सर्व सामग्री जपानमध्ये प्रक्षेपणापूर्वी पाठवणे गरजेचे होते. २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच  यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते. हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा - आनंदची सलामी स्विडलरशी :
  • पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद चेस २४ लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला असून सलामीच्या सामन्यात त्याला रशियाच्या पीटर स्विडलरशी झुंज द्यावी लागणार आहे.

  • करोनाच्या साथीमुळे गेले तीन महिने जर्मनीमध्ये अडकलेला भारताचा ग्रँडमास्टर आनंद मायदेशी परतला असून तो पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होत आहे.

  • राऊंड-रॉबिन सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होणार असून नंतर आनंदला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, व्लादिमिर क्रॅमनिक, अनिश गिरी, पीटर लेको, इयान नेपोमनियाची, बोरिस गेलफंड, डिंग लिरेन आणि वॅसिल इव्हानचुक यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. ही स्पर्धा म्हणजे मॅग्नस कार्लसन चेस टूरचा भाग असून विजेता ९ ते २० ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन :
  • मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.

  • लालजी टंडन यांना मागच्या आठवडयात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

  • श्वासोश्वास करण्यास त्रास होत असल्याने तसेच तापामुळे लालजी टंडन यांना सर्वप्रथम ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते तसेच त्यांचे डायलासिस सुरु होते” असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

बीसीसीआयच्या आयपीएल आयोजनाबद्दल ब्रॉडकास्टर्स नाराज - जाणून घ्या काय आहे कारण :
  • आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआयने आपली तयारी सुरु केली आहे. २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर अशा तात्पुरत्या तारखा बीसीसीआयने नक्की केल्या आहेत. मात्र आयपीएल सामन्यांचं प्रक्षेपण करण्याचे हक्क असलेली Star Sports वाहिनी बीसीसीायच्या या आयोजनाबद्दल नाराज असल्याचं समोर आलं होतं. बीसीसीआयने स्पर्धेच्या आयोजनात कपात न करता दिवाळीपर्यंत आयोजन करावं अशी Star India ची इच्छा होती. बीसीसीआयने या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.

  • “गेल्या काही वर्षांपासून दिवाळी ही संकल्पना बदलेली आहे. तुम्हील BARC (बार्क) ची आकडेवारी तपासलीत तर तुम्हाला लक्षात येईल दिवाळीच्या दिवसांमध्ये रेटिंग्ज फारशी चांगली येत नाहीत. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून आम्हीही खेळाडूंना दिवाळीच्या काळात सुट्टी देऊन परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी देतो. यासंदर्भात Star India च्या अधिकाऱ्यांसोबत बसून नक्की चर्चा केली जाऊ शकते. याच एका कारणामुळे आयपीएलचं आयोजन हे दिवाळीपर्यंत खेचण्यात आलेलं नाही.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

  • करोनामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती अद्याप सुधरलेली नसल्यामुळे यंदाच्या स्पर्धेचं आयोजन हे UAE मध्ये केलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबद्दल अधिकृत माहिती देणार आहे.

२१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.